Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 11 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nissan Tekton की Kia Seltos? कोणती गाडी खरेदी करणं ठरेल फायद्याचा व्यवहार? जाणून घ्या दोन्हीमधील फरक

Nissan Tekton vs Kia Seltos: भारतीय कॉम्पॅक्ट एसयूव्ही बाजारात निसान लवकरच नवीन टेक्टॉन एसयूव्ही घेऊन येत आहे. या नव्या एसयूव्हीची थेट टक्कर किया सेल्टोस सोबत होणार असून, दोन्ही गाड्यांमधील महत्त्वाचे फरक जाणून घेणे खरेदीपूर्वी आवश्यक आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 11, 2026 | 11:22 AM
Nissan Tekton की Kia Seltos? कोणती गाडी खरेदी करणं ठरेल फायद्याचा व्यवहार? जाणून घ्या दोन्हीमधील फरक

Nissan Tekton की Kia Seltos? कोणती गाडी खरेदी करणं ठरेल फायद्याचा व्यवहार? जाणून घ्या दोन्हीमधील फरक

Follow Us
Follow Us:
  • निसान टेक्टॉन आणि किया सेल्टोस मध्ये इंजिन, फीचर्स आणि किंमतीत मोठा फरक आहे.
  • निसान टेक्टॉन कमी किमतीत दमदार टर्बो-पेट्रोल पर्याय देऊ शकते.
  • डिझेल इंजिन आणि प्रीमियम फीचर्ससाठी किया सेल्टोस अजूनही मजबूत पर्याय आहे.
भारतीय एसयूव्ही बाजारात कॉम्पॅक्ट एसयूव्हीची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ग्राहकांची ही वाढती मागणी लक्षात घेऊन Nissan त्यांच्या नवीन Tekton SUV सह बाजारात पुनरागमन करत आहे. या गाडीची स्पर्धा थेट Kia Seltos सोबत केली जाणार आहे. ही आधीपासूनच या कॅटेगरीमधील लोकप्रिय गाड्यांपैकी एक आहे. जर तुम्ही आता नवीन गाडी खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि टेक्टॉन एसयूव्ही की किया सेल्टोस या दोन्हीमध्ये गोंधळला असाल, तर ही बातमी वाचा. गाडी खरेदी करण्यापूर्वी या दोन्हीमधील अंतर समजून घेणं अतिशय गरजेचं आहे.

कार सर्व्हिसिंगमध्ये नक्की काय काय केले जाते? जाणून घ्या संपूर्ण माहिती

गाड्यांचा आकार

किया सेल्टोस ही लांबी, रुंदी आणि व्हीलबेसच्या बाबतीत निसान टेक्टॉन पेक्षा मोठी आहे. सेल्टोस रस्त्यावर जास्त मोठी आणि प्रिमियम दिसते. तर दुसरीकडे, टेक्टॉन जास्त ग्राउंड क्लीयरेंस देतो. ज्यामुळे खराब रस्त्यांवर देखील गाडी चालवणं अतिशय सोपं होतं. याशिवाय, टेक्टॉनमध्ये मोठे बूट स्पेस मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे मोठ्या प्रवासादरम्यान जास्त सामान ठेऊ शकतो.  (फोटो सौजन्य: Pinterest) 

इंजिन आणि परफॉर्मंस

निसान टेक्टॉनमध्ये दोन टर्बो पेट्रोल इंजिन मिळणार आहे. पहिले 1.0 लीटर टर्बो पेट्रोल इंजिन असणार आहे, जे सुमारे 100 बीएचपीची पावर ऑफर करणार आहे. यासोबतच 6-स्पीड मॅनुअल गियरबॉक्स मिळणार आहे. दुसरे 1.3 लीटर टर्बो पेट्रोल इंजिन असणार आहे, जे 160 बीएचपी पावर ऑफर करणार आहे. या इंजिनसोबत 6-स्पीड मॅनुअल आणि 7-स्पीड वेट क्लच डीसीटी ऑटोमॅटिक गियरबॉक्स पर्याय मिळणार आहेत.

किया सेल्टोसमध्ये 1.5 लीटर नॅचुरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन आहे, जे 115 बीएचपीची पावर ऑफर करते. याशिवाय 1.5 लीटर टर्बो पेट्रोल इंजिन देखील दिले आहे. जे 150 बीएचपीची शक्ती देते. यामध्ये मॅनुअल, सीव्हिटी आणि डिसीटी गियरबॉक्सचे पर्याय मिळणार आहेत. किया सेल्टोसची विशेषत: म्हणजेच यामध्ये 115 बीएचपी क्षमत असणारे 1.5 लीटर डीझेल इंजिन देखील आहे, ज्यासोबत मॅनुअल आणि टॉर्क कन्वर्टर ऑटोमॅटिक गियरबॉक्सचा पर्याय उपलब्ध आहे. ज्या ग्राहकांना डिझेल इंजिन पाहिजे, त्यांच्यासाठी सध्या किया सेल्टोस एक चांगला पर्याय ठरू शकते.

गाड्यांचे फीचर्स

दोन्ही गाड्या अतिशय मॉडर्न आणि प्रीमियम आहेत. दोन्हीमध्ये पॅनोरमिक सनरूफ, डुअल-जोन क्लाइमेट कंट्रोल, ADAS सेफ्टी फीचर्स, वेंटिलेटेड सीट्स आणि अनेक ॲडव्हांस टेक्नोलॉजी फीचर्स देखील पाहायला मिळणार आहेत. किया सेल्टोसमध्ये हेड-अप डिस्प्ले (HUD) आणि अधिक इलेक्ट्रिक सीट ॲडजस्टमेंट यांसारखे एक्स्ट्रा फीचर्स ऑफर केले जातात. तर दुसरीकडे निसान टेक्टॉनमध्ये पावर्ड टेलगेट आणि पावर्ड फ्रंट पॅसेंजर सीट सारखे फीचर्स देण्यात आले आहेत.

जून २०२६ मध्ये ‘या’ सेडान गाड्यांची झाली बंपर विक्री; डिझायर, अमेझ आणि ऑराने मारली बाजी!

किती आहे किंंमत?

निसान टेक्टॉन जास्त चांगला पर्याय ठरणार आहे. याची सुरुवातीची किंमत सुमारे 10.40 लाख रुपये आहे. तर याच्या टॉप मॉडेलची किंमत सुमारे 18.50 लाख रुपये आहे. तर किया सेल्टोसची किंमत सुमारे 11 लाखांपासून 22 लाख रुपयांपर्यंत आहे. कमी किंमतीत दमदार फीचर्स आणि पावरफुल इंजिन पाहिजे असेल तर तुम्ही टेक्टॉनची निवड करू शकता. तर ज्यांना अधिक फीचर्स, डिझेल इंजिन आणि ब्रँड व्हॅल्यू हवी आहे, त्यांच्यासाठी किया सेल्टोस ही एक उत्कृष्ट एसयूव्ही आहे.

Web Title: Nissan tekton or kia seltos which suv is better for you know the difference

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 11, 2026 | 11:22 AM

Topics:  

  • Kia Seltos
  • SUV
  • SUV cars

संबंधित बातम्या

भारतात BMW च्या इलेक्ट्रिक कारांची वाढती लोकप्रियता;  २०२६ मध्ये BMW ची प्रत्येक चौथी विक्री EV ची
1

भारतात BMW च्या इलेक्ट्रिक कारांची वाढती लोकप्रियता;  २०२६ मध्ये BMW ची प्रत्येक चौथी विक्री EV ची

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.