
किंमत आणि गिअरबॉक्सचे ऑप्शन
2026 टोयोटा फॉर्च्युनर लीडर एडिशन 4×2 मॅन्युअल आणि 4×2 ऑटोमॅटिक अशा 2 व्हेरिएंटमध्ये अव्हेलेबल आहे. मॅन्युअल व्हेरिएंटची किंमत 36.51 लाख रुपये, तर ऑटोमॅटिक व्हेरिएंटची किंमत 38.72 लाख रुपये आहे. या दोन्ही किंमती एक्स-शोरूम आहेत. या एडिशनमध्ये प्रामुख्याने लूकवर भर देण्यात आला असून, फॉर्च्युनरच्या दमदार व्यक्तिमत्त्वाला आणखी आकर्षक बनवण्याचा प्रयत्न केला आहे.
एक्सटीरियरला मिळाली ब्लॅक थीम
या स्पेशल एडिशनमध्ये सिग्नेचर फ्रंट ग्रिल, खास हूड एम्ब्लेम आणि बॉडी-साइड मोल्डिंग देण्यात आले आहे. याशिवाय ग्लॉस ब्लॅक अलॉय व्हील्स, ब्लॅक टेलगेट गार्निश, ब्लॅक रूफ आणि ब्लॅक अँटेना यामुळे गाडीला स्पोर्टी लूक मिळतो. सुपर व्हाइट, प्लॅटिनम व्हाइट पर्ल आणि अॅटिट्यूड ब्लॅक अशा 3 रंगांमध्ये ही एसयूव्ही मिळते. त्यामुळे पांढऱ्या रंगासोबत ब्लॅक अॅक्सेंट आवडणाऱ्या कस्टमर्सनाही हा पर्याय आकर्षित करू शकतो.
इंटिरियर आणि फीचर्समध्ये काय खास?
केबिनमध्ये ब्लॅक आणि मरून रंगाचे सीट अपहोल्स्ट्री, डोअर ट्रिम्स, इल्यूमिनेटेड स्कफ प्लेट्स आणि अॅम्बियंट लाइटिंग देण्यात आले आहे. टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टमचाही समावेश आहे. रेग्युलर मॉडेलमधील एलईडी हेडलॅम्प्स, एलईडी फॉग लॅम्प्स, पॉवर टेलगेट, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स, ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोल आणि 8-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम यांसारखी फीचर्सही अपेक्षित आहेत. मात्र, या स्पेशल एडिशनच्या संपूर्ण फीचर लिस्टची डिलिव्हरीपूर्वी डीलरकडून खात्री करणे योग्य ठरेल.
MG Hector Tomahawk EV भारतात लाँच! ५१७ किमी रेंज अन् रु. १३.९९ लाखांपासून किंमत सुरु!
2.8-लिटर डिझेल इंजिनचा दमदार परफॉर्मन्स
या एडिशनमध्ये 2.8-लिटर 1GD-FTV डिझेल इंजिन मिळते. मॅन्युअल गिअरबॉक्ससोबत हे इंजिन 201 hp पॉवर आणि 420 Nm टॉर्क देते. ऑटोमॅटिक व्हेरिएंटमध्ये टॉर्क 500 Nm आहे. दोन्ही व्हेरिएंटमध्ये 6-स्पीड गिअरबॉक्स असून, एसयूव्हीमध्ये 7 जणांना बसण्याची सोय आहे. सेफ्टीसाठी 7 एअरबॅग्ज, व्हेईकल स्टॅबिलिटी कंट्रोल, हिल असिस्ट, ट्रॅक्शन कंट्रोल, रिव्हर्स कॅमेरा आणि पार्किंग सेन्सर्स यांसारखी फीचर्स अपेक्षित आहेत.
एकूणच, नवीन टोयोटा फॉर्च्युनर लीडर एडिशनमध्ये इंजिनपेक्षा डिझाइन आणि स्टाइलिंगमधील बदलांवर जास्त भर देण्यात आला आहे. प्रीमियम एसयूव्हीमध्ये वेगळा ब्लॅक लूक शोधणाऱ्या कस्टमर्ससाठी हे एडिशन आकर्षक ठरू शकते.