अनेकदा आपण गाडी गॅरेजमध्ये किंवा सर्व्हिस सेंटरला देतो, पण तिथे नक्की कोणत्या सेवा दिल्या जातात, याबद्दल आपल्याला सविस्तर माहिती नसते. गाडीचा परफॉर्मन्स उत्तम राहण्यासाठी आणि तिचे आयुष्य वाढवण्यासाठी नियमित सर्व्हिसिंग अत्यंत आवश्यक आहे. एका सर्वसाधारण कार सर्व्हिसमध्ये प्रामुख्याने खालील गोष्टींचा समावेश होतो,
1.इंजिन ऑइल आणि फिल्टर बदलणे
हा सर्व्हिसिंगचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. इंजिनचे घर्षण कमी करण्यासाठी जुने इंजिन ऑइल काढून नवीन ऑइल टाकले जाते. सोबतच, ऑइल फिल्टर आणि एअर फिल्टर साफ केले जातात किंवा आवश्यकतेनुसार बदलले जातात.
2.फ्लूइड्स टॉप-अप
गाडीतील सर्व महत्त्वाच्या फ्ल्युईडची पातळी तपासली जाते. यामध्ये कूलंट, ब्रेक ऑइल, पॉवर स्टिअरिंग फ्लूइड आणि विंडशील्ड वॉशर लिक्विड कमी असल्यास ते पुन्हा टॉप-अप केले जाते.
फक्त मायलेज आणि इंजिन नाही! नवीन कार खरेदी करताना तुमच्या गाडीत असायलाच हवीत ‘ही’ 5 खास फीचर्स
3.ब्रेक आणि सस्पेन्शन तपासणी
सुरक्षिततेच्या दृष्टीने ब्रेक पॅड्स, ब्रेक डिस्क आणि लायनर्सची तपासणी केली जाते. ब्रेक पॅड्स झिजले असल्यास ते बदलले जातात. तसेच गाडीचे सस्पेन्शन शॉक अॅब्जॉर्बर्स व्यवस्थित काम करत आहेत की नाही, हे पाहिले जाते.
4.टायर आणि अलाइनमेंट
टायर्समधील हवेचा दाब तपासला जातो. टायर्सची झिज सारखी व्हावी म्हणून टायर रोटेशन केले जाते. याशिवाय, गाडी एका बाजूला ओढली जाऊ नये म्हणून व्हील अलाइनमेंट आणि व्हील बॅलन्सिंग केले जाते.
‘कारच्या वायपर’चा शोध लावला होता या महिलेने! ही आहे‘मेरी अँडरसन’ यांच्या क्रांतिकारी शोधाची गोष्ट
5.इलेक्ट्रिकल आणि बॅटरी चेक
बॅटरीचे व्होल्टेज आणि तिचे आरोग्य तपासला जाते. तसेच हेडलाईट्स, टेललाईट्स, इंडिकेटर्स, हॉर्न आणि वायपर्स योग्यरित्या चालत आहेत की नाही, याची खात्री केली जाते.
6.वॉशिंग आणि क्लीनिंग
सर्व्हिसिंगच्या शेवटी, गाडी बाहेरून हाय-प्रेशर वॉटरने स्वच्छ धुऊन पॉलिश केली जाते आणि आतून व्हॅक्यूम क्लीनरने सीट व मॅट्स साफ केल्या जातात. एका संपूर्ण कार सर्व्हिसमध्ये गाडीच्या इंजिनपासून ते अगदी लहान बल्बपर्यंत प्रत्येक गोष्टीची बारकाईने तपासणी केली जाते, जेणेकरून तुमचा प्रवास सुरक्षित आणि सुखकर होईल.






