Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nissan ची Spinny सोबत पार्टनरशिप! यामुळे ग्राहकांना ‘हा’ फायदा होणार

Nissan या आघाडीच्या वाहन उत्पादक कंपनीने स्पिनीसोबत हातमिळवणी केली आहे. या भागीदारीमुळे स्पिनी निसानच्या भारतातील सर्व डीलरशिप्ससाठी ‘प्रिफर्ड एक्सचेंज पार्टनर प्लॅटफॉर्म’ म्हणून कार्य करेल.

  • By मयुर नवले
Updated On: Sep 05, 2025 | 10:06 PM
Nissan ची Spinny सोबत पार्टनरशिप!

Nissan ची Spinny सोबत पार्टनरशिप!

Follow Us
Close
Follow Us:

निसान मोटर इंडिया प्रा. लि. (NMIPL) ने भारतातील आघाडीच्या फुल-स्टॅक वापरलेल्या कार प्लॅटफॉर्म स्पिनीसोबत धोरणात्मक पार्टनरशिप केली आहे. यामुळे स्पिनी निसानच्या भारतातील सर्व डीलरशिप्ससाठी ‘प्रिफर्ड एक्सचेंज पार्टनर प्लॅटफॉर्म’ म्हणून काम करेल. ऑटोमोबाईल OEM आणि राष्ट्रीय स्तरावरील वापरलेल्या कार अ‍ॅग्रीगेटर यांच्यातील ही पहिलीच भागीदारी असून, ग्राहकांना अधिक चांगले एक्सचेंज फायदे देण्यासोबतच डीलर भागीदारांसाठी नवीन व्यवसाय संधी निर्माण करणार आहे.

ग्राहक-केंद्रित या पुढाकाराचा उद्देश निसान मोटर इंडियाच्या डीलरशिप नेटवर्कची कामगिरी आणि नफा वाढवणे हा आहे. या भागीदारीअंतर्गत, जे ग्राहक स्पिनीच्या माध्यमातून – निसान डीलरशिपवर किंवा थेट स्पिनीच्या प्लॅटफॉर्मवरून – आपली जुनी वाहने एक्सचेंज करतील, त्यांना नवीन निसान वाहन खरेदी करताना विशेष एक्सचेंज फायदे मिळतील.

इथे GST कमी झाला आणि तिथे Maruti Wagon R ची किंमत झटकन पडली, आता फक्त द्यावे लागेल…

स्पिनीची वाहन मूल्यांकन टीम ग्राहकांच्या मागणीनुसार निसान डीलरशिपवर उपस्थित राहील. त्यामुळे वाहन मूल्यांकनाची प्रक्रिया सोपी, पारदर्शक आणि वेळेवर पार पडेल. एक्सचेंज क्लेम प्रक्रियाही अधिक सुलभ करण्यात आली आहे. स्पिनीने जारी केलेले ‘बायिंग लेटर’ हे वैध एक्सचेंज पुरावा म्हणून स्वीकारले जाईल, ज्यामुळे ग्राहकांना RC ट्रान्सफर डॉक्युमेंटेशनची काळजी घ्यावी लागणार नाही.

या पार्टनरशिपमुळे निसान डीलर नेटवर्कला वापरलेल्या कारची इन्व्हेंटरी लिक्विडेट करण्यासाठी आणि संयुक्त मार्केटिंग मोहिमांद्वारे अधिक लीड्स निर्माण करण्यासाठी नवी संधी मिळेल. स्पिनी आपल्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर निसानच्या एक्सचेंज ऑफर्सला प्रमुख स्थान देईल, तर निसान आपल्या प्रचार मोहिमांमध्ये स्पिनी ब्रँडिंगचा समावेश करेल.

या निमित्ताने निसान मोटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक सौरभ वत्सा म्हणाले, “निसान मोटर इंडियामध्ये आम्ही आमच्या ग्राहक आणि डीलर पार्टनरशिपसाठी अधिक मूल्य निर्माण करण्यास कटिबद्ध आहोत. स्पिनीसोबतची भागीदारी आमच्या वाहन एक्सचेंज इकोसिस्टमला बळकटी देण्यासाठी, ग्राहक अनुभव उंचावण्यासाठी आणि डीलरशिपच्या वाढीसाठी महत्त्वाचे पाऊल आहे.”

Tata Motors चा आरोग्य उपक्रम कुपोषित मुलांसाठी ठरला आशेचा किरण, बरे होण्‍याचे प्रमाण ८७ टक्क्यांनी वाढले

स्पिनीचे संस्थापक आणि CEO नीराज सिंग म्हणाले, “निसानसोबतची आमची भागीदारी भारतात कार मालकी आणि अपग्रेड अनुभव नव्याने परिभाषित करण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. आम्ही विश्वास, पारदर्शकता आणि सुलभतेवर भर देतो, आणि OEMsसोबत मिळून असे इकोसिस्टम निर्माण करतो जिथे प्रत्येक ग्राहक आत्मविश्वासाने व्यवहार करू शकेल.”

निसान मॅग्नाइट KURO स्पेशल एडिशन लाँच

दरम्यान, निसान मोटर इंडियाने अलीकडेच बहुप्रतीक्षित निसान मॅग्नाइट KURO स्पेशल एडिशन लाँच केली आहे. दिल्लीतील एक्स-शोरूम किंमत ₹८.३० लाखांपासून सुरू होणारी ही प्रीमियम SUV ‘Boldest Black’ डिझाइन तत्त्वज्ञानाचे प्रतीक आहे. आकर्षक ब्लॅक एक्सटीरियर, प्रीमियम इंटीरियर थीम आणि जपानी डिझाइन एलिमेंट्समुळे ती ग्राहकांना भुरळ घालते.

महत्त्वाचे म्हणजे, नवीन निसान मॅग्नाइटला Global NCAP कडून ५-स्टार ओव्हरऑल पॅसेंजर सेफ्टी रेटिंग मिळाले आहे. ४०+ स्टँडर्ड सेफ्टी फीचर्स, ६ एअरबॅग्स, ABS+EBD, ESC, TCS, HSA, TPMS आणि मजबूत बॉडी स्ट्रक्चर यामुळे ती भारतातील आणि दक्षिण आफ्रिकेमधील सर्वात सुरक्षित SUV पैकी एक ठरते. आज निसान मॅग्नाइट ६५+ देशांमध्ये उपलब्ध आहे आणि कॉम्पॅक्ट SUV सेगमेंटमध्ये नवा बेंचमार्क प्रस्थापित करत आहे.

Web Title: Nissans partnership with spinny what will benefit customers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 05, 2025 | 10:06 PM

Topics:  

  • auto news
  • automobile

संबंधित बातम्या

Tata Motors चा आरोग्य उपक्रम कुपोषित मुलांसाठी ठरला आशेचा किरण, बरे होण्‍याचे प्रमाण ८७ टक्क्यांनी वाढले
1

Tata Motors चा आरोग्य उपक्रम कुपोषित मुलांसाठी ठरला आशेचा किरण, बरे होण्‍याचे प्रमाण ८७ टक्क्यांनी वाढले

नवीन Maruti Victoris समोर Grand Vitara चा निभाव लागेल का? फीचर्स आणि मायलेजच्या बाबतीत कोणती कार बेस्ट?
2

नवीन Maruti Victoris समोर Grand Vitara चा निभाव लागेल का? फीचर्स आणि मायलेजच्या बाबतीत कोणती कार बेस्ट?

व्हेंटिलेटेड सीट्स आणि प्रीमियम फीचर्सने सुसज्ज अशी Citroen Basalt X भारतात लाँच
3

व्हेंटिलेटेड सीट्स आणि प्रीमियम फीचर्सने सुसज्ज अशी Citroen Basalt X भारतात लाँच

Yamaha R15 मध्ये मोठा अपडेट, पहिल्यांदाच भारतात पाहायला मिळणार…
4

Yamaha R15 मध्ये मोठा अपडेट, पहिल्यांदाच भारतात पाहायला मिळणार…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.