Annual Fastag Pass मुळे अजूनही गोधळलेले आहात? Nitin Gadkari यांनी दिले अवघड प्रश्नाची सोपी उत्तरं
पूर्वी टोल प्लाझावर टोल टॅक्स भरण्यासाठी लांबच लांब रांगा लागलेल्या असायच्या. याच रांगा टाळण्यासाठी सरकारने फास्टॅगची सुरुवात केली. मात्र, सतत फास्टॅग रिचार्ज करणे देखील लोकांसाठी डोकेदुखी ठरत होत होते. म्हणूनच सरकार आता फास्टॅगचा वार्षिक पास आणण्याच्या तयारीत आहे.
रोजच्या Fastag च्या कटकटीला टाटा बाय बाय करत केंद्र सरकारने फास्टटॅगचा वार्षिक पास आणण्याची तयारी करत आहे. याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने दिली आहे. 18 जून 2025 रोजी नितीन गडकरी यांनी केलेल्या घोषणेनंतरही लोकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. अशा अनेक प्रश्नांची उत्तरे केंद्रीय मंत्र्यांनी स्वतः दिली आहेत. नितीन गडकरी यांनी कोणत्या प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत, त्याबद्दल आज आपण जाणून घेऊयात.
किती टेपा मारता राव ! Skoda Kylaq चा दावा 19.05kpl मायलेजचा, प्रत्यक्षात मात्र भलताच रिझल्ट आला समोर
फास्टॅगचा वार्षिक पास एक वर्ष किंवा 200 ट्रिपसाठी वैध असेल. वार्षिक पास अॅक्टिव्ह केल्यानंतर, 200 ट्रिप पूर्ण किंवा एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला हा पास पुन्हा रिचार्ज करावा लागेल.
नाही, हा पास इतर कोणत्याही वाहनावर ट्रान्स्फर करता येणार नाही. हा पास फक्त ज्या वाहनाचा फास्टॅग नोंदणीकृत आहे त्यावरच काम करेल. दुसऱ्या वाहनावर हा फास्टटॅग वापरल्यास तो डिअॅक्टिव्हेट होईल.
🛣️ FASTag Annual Pass Scheme – FAQS#FASTagBasedAnnualPass #FAQS #PragatiKaHighway #FASTagUpdate #FASTag pic.twitter.com/KnLJzFCaY7
— Office Of Nitin Gadkari (@OfficeOfNG) June 19, 2025
ज्या वाहनांच्या चेसिस नंबरवर फास्टॅग जारी केला आहे त्यांना वार्षिक पासची सुविधा मिळू शकणार नाही.
हो, वार्षिक पास घेतल्यानंतर, ज्या मोबाइल नंबरवर फास्टॅग रजिस्टर आहे, त्यावर सर्व सूचना एसएमएसद्वारे मिळतील.
भल्याभल्या VVIP लोकांकडे नसतील, अशा आलिशान कार PM Modi यांच्या ताफ्यात; किंमत 10 कोटी रुपये
नाही, वार्षिक फास्टॅग पाससाठी नवीन फास्टॅग घेण्याची आवश्यकता नाही. वार्षिक पास फक्त विद्यमान फास्टॅगवरच अॅक्टिव्ह केला जाऊ शकतो. परंतु यासाठी, फास्टॅग विंडशील्डवर योग्यरित्या बसवलेला असावा आणि वैध रजिस्ट्रेशन नंबरशी जोडला गेला पाहिजे. तसेच, फास्टॅग ब्लॅकलिस्ट देखील होऊ नये.
नाही, सर्व फास्टॅग वापरकर्त्यांसाठी वार्षिक पास अनिवार्य नसले. ज्यांना फास्टॅगसह वार्षिक पासची सुविधा नको आहे त्यांनी टोल प्लाझा येथे त्याच दराने फास्टटॅग चार्जेस भरावे.