फोटो सौजन्य: @Parth_Go (X.com)
भारतीय मार्केटमध्ये विविध सेगमेंटमध्ये कार ऑफर केल्या जातात. यात ग्राहकांकडून सर्वात जास्त डिमांड ही एसयूव्ही सेगमेंटमधील कार्सना मिळते. हीच डिमांड पाहता, अनेक ऑटो कंपन्या मार्केटमध्ये अनेक उत्तम आणि हाय परफॉर्मन्स एसयूव्ही ऑफर करत असतात. Skoda ने देखील मार्केटमध्ये अनेक उत्तम कार ऑफर केल्या आहेत. सध्या मार्केटमध्ये कंपनीच्या Kylaq एसयूव्हीला दमदार मागणी मिळताना दिसत आहे. तसेच कंपनीने या कारच्या मायलेजबाबत काही महत्वाचे दावे केले होते. Kylaq ने दावा केला होता की MT व्हेरिएंटचा मायलेज 19.05 किलोमीटर प्रति लिटर तर AT व्हेरिएंटचा मायलेज19.68 किलोमीटर प्रति लिटर आहे.
8.25 लाख ते 13.99 लाख (एक्स-शोरूम) किंमत असलेली, Skoda Kylaq एका टर्बो-पेट्रोल इंजिनसह लाँच करण्यात आले आहे. नुकतेच या कॉम्पॅक्ट एसयूव्हीचे वास्तविक फ्युएल एफिशियन्सी टेस्ट केल्या आहेत आणि त्याचे निकाल खालीलप्रमाणे आहेत.
HSRP नंबर प्लेट बसावा अन्यथा…,काय आहे सरकारचा निर्णय?
Skoda Kylaq मध्ये 1.0-लिटर, तीन-सिलेंडर, टर्बो-पेट्रोल इंजिन आहे, जे 115hp आणि 178Nm पॉवर देते. या कारमध्ये 6-स्पीड मॅन्युअल किंवा 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिकचा पर्याय आहे. Kylaq चा दावा केलेला ARAI मायलेज MT साठी 19.05kpl आणि AT साठी 19.68kpl होता.
या एसयूव्हीची शहरात टेस्टिंग घेण्यात आली. स्कोडा क्यलॅक मॅन्युअलने (MT)10.6kpl मायलेज दिले तर ऑटोमॅटिकने (AT) 8.7kpl मायलेज दिले. या दोन्ही व्हर्जनमध्ये इंधनाची -बचत करणारे ऑटो इंजिन स्टॉप/स्टार्ट टेक आहे जे शहरातील कार्यक्षमतेला मदत करते, परंतु केबिन टेम्परेचर राखण्यासाठी सिस्टम जास्त काळ कार बंद ठेवत नाही. Kylaq ला ‘इको’ ड्राइव्ह मोड देखील मिळत नाही.
हायवे वरील टेस्टिंगमध्ये, ऑटोमॅटिकच्या व्हेरिएंटमधील 13.36kpl मायलेजच्या तुलनेत Skoda Kylaq मॅन्युअलने 15.12kpl मायलेज दिला. मजेदार गोष्ट म्हणजे, मॅन्युअल इंजिन सहाव्या गिअरमध्ये सुमारे 2500 आरपीएम वेगाने 100 किमी प्रतितास वेगाने फिरते, तर ऑटोमॅटिक इंजिन 2000 आरपीएमच्या जवळपास असते.
भल्याभल्या VVIP लोकांकडे नसतील, अशा आलिशान कार PM Modi यांच्या ताफ्यात; किंमत 10 कोटी रुपये
या कारमध्ये शाइन करणारी काळी फ्रंट ग्रिल, 17 इंच अलॉय व्हील्स, एलईडी हेडलाइट्स, एलईडी डीआरएल, एलईडी टेल लाइट्स, ड्रायव्हर आणि को-ड्रायव्हरसाठी सहावी इलेक्ट्रिकली ॲंडजस्टेबल सीट्स, फ्रंट व्हेंटिलेटेड सीट्स, सिंगल पेन इलेक्ट्रिक सनरूफ, 20.32 सेमी डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, वायरलेस आहे. यात चार्जिंग, 25.6 सेमी इन्फोटेनमेंट सिस्टम, ट्रंकमध्ये तीन किलो क्षमतेचा हुक यासारख्या फीचर्ससह सुसज्ज आहे.