काय सांगता ! चक्क 'ही' Electric Bike घरबसल्या ॲमेझॉनवर बुक कराल, खास 20 हजारांची सवलतही उपलब्ध
भारतातील आघाडीची स्वदेशी इलेक्ट्रिक बाईक उत्पादक कंपनी, ओबेन इलेक्ट्रिकने त्यांच्या अत्यंत लोकप्रिय शहरी प्रवासी इलेक्ट्रिक बाईक ‘रॉर ईझेड’ आता ॲमेझॉन या आघाडीच्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर उपलब्ध केल्याची अधिकृत घोषणा केली आहे. देशभरात इलेक्ट्रिक वाहनांचा स्विकार वाढवण्याच्या दृष्टीने आणि डिजिटल प्लॅटफॉर्मचा अधिक प्रभावी वापर करण्याच्या उद्देशाने ओबेनने हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.
या लाँचच्या माध्यमातून ओबेन इलेक्ट्रिकने ई-कॉमर्सच्या प्रचंड व्याप्तीचा आणि ग्राहकांमध्ये असलेल्या विश्वासाचा फायदा घेत इलेक्ट्रिक वाहन मालकी अधिक सुलभ आणि प्रवेशयोग्य केली आहे. विशेषतः डिजिटल युगातील तरुण ग्राहक आणि पहिल्यांदाच इव्ही खरेदी करणाऱ्यांसाठी हा उपक्रम एक मोठा बदल घडवणारा ठरतो.
‘रॉर ईझेड’ ही इलेक्ट्रिक बाईक २ व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध असून, 3.४ केडब्ल्यूएच मॉडेलची किंमत ₹१,१९,९९९ आणि ४.४ केडब्ल्यूएच मॉडेलची किंमत ₹१,२९,९९९ इतकी ठेवण्यात आली आहे. याशिवाय, या दोन्ही व्हेरिएंट्सवर सध्या ₹२०,००० पर्यंतची सवलत ग्राहकांना दिली जात आहे.
‘एवढी’ सॅलरी असेल तर हमखास खरेदी करा Mahindra Scorpio N, किती करावे लागेल डाउन पेमेंट?
ओबेन इलेक्ट्रिकच्या संस्थापक आणि सीईओ, मधुमिता अग्रवाल म्हणाल्या, “रॉर ईझेडला ॲमेझॉनवर आणणे हा ग्राहकांच्या बदलत्या खरेदी पद्धतींशी जुळवून घेण्याचा धोरणात्मक निर्णय आहे. ग्राहक आता मोटार वाहनांसारख्या मोठ्या खरेदीसाठीही ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर विश्वास ठेवतात. त्यामुळे ई-कॉमर्सच्या माध्यमातून आम्ही अधिक थेट, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ग्राहकांपर्यंत पोहोचू शकतो.”
त्या पुढे म्हणाल्या, “ॲमेझॉनवरील उपलब्धता हे इलेक्ट्रिक वाहन स्वामित्व अधिक व्यापक आणि सोयीस्कर बनवण्याच्या आमच्या मिशनचा भाग आहे – विशेषतः त्यांच्यासाठी, ज्यांनी आजवर कधीही इलेक्ट्रिक दुचाकी खरेदी केलेली नाही.”
हा डिजिटल विस्तार ओबेन इलेक्ट्रिकच्या एकूण व्यवसाय धोरणाचा महत्त्वपूर्ण भाग आहे. कंपनीने आपल्या शोरूम नेटवर्क आणि डिजिटल उपस्थिती यामध्ये संतुलन साधत नव्या पिढीतील, किमतीबाबत जागरूक आणि तंत्रज्ञानप्रेमी ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
या सर्व वैशिष्ट्यांमुळे रॉर ईझेड ही एक परिपूर्ण, आधुनिक आणि स्टायलिश इलेक्ट्रिक दुचाकी ठरते, जी आजच्या शहरी प्रवाशाच्या गरजा पूर्ण करण्यास समर्थ आहे.