फोटो सौजन्य: @TheANI_Official (X.com)
भारतीय मार्केटमध्ये अनेक उत्तम कार उत्पादक कंपन्या आहेत, ज्या बेस्ट कार ऑफर करत असतात. यातही विशेष मागणी एसयूव्ही कारला असते. भारतात अनेक उत्तम एसयूव्ही उत्पादक कंपन्या आहेत. महिंद्रा ही त्यातीलच एक.
महिंद्राने देशात अनेक उत्तम एसयूव्ही ऑफर केल्या आहेत. Mahindra Scorpio N ही तर ग्राहकांची विशेष आवडती एसयूव्ही आहे. ही देशातील सर्वात आलिशान एसयूव्हींपैकी एक आहे, जी लोकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. कंपनीची ही कार 6-सीटर आणि 7-सीटर कॉन्फिगरेशनसह येते. ही कार भारतीय बाजारात पेट्रोल आणि डिझेल दोन्ही पॉवरट्रेनसह उपलब्ध आहे. महिंद्रा स्कॉर्पिओ एनची एक्स-शोरूम किंमत 13.99 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 25.15 लाख रुपयांपर्यंत जाते.
महिंद्रा स्कॉर्पिओ एन खरेदी करण्यापूर्वी, तुम्हाला या कारचे कोणते मॉडेल खरेदी करायचे आहे हे ठरवणे महत्त्वाचे आहे. जर तुम्ही या महिंद्रा कारचा Z2 पेट्रोल व्हेरिएंट खरेदी केला, ज्याची किंमत 16.61 लाख रुपये आहे. ही कार खरेदी करण्यासाठी तुम्हाला 14,95,777 लाख रुपयांचे लोन मिळेल.
या कार लोनवर आकारले जाणारे व्याज तुम्ही हे लोन किती काळ घेत आहात यावर अवलंबून असते. त्या मर्यादेनुसार तुम्हाला दरमहा EMI जमा करावा लागेल.
जर तुम्ही ही कार खरेदी करण्यासाठी 1 लाख रुपये डाउन पेमेंट म्हणून जमा केले तर तुम्हाला 4 वर्षांसाठी 9.8 टक्के व्याजदराने दरमहा सुमारे 39,461 रुपये जमा करावे लागतील.
अरेरेरे किती वाईट ! Fortuner सोबत भिडायला गेलेल्या ‘या’ SUV ला एका सुद्धा ग्राहकाने खरेदी केले नाही
जर तुम्ही 2 लाख रुपये डाउन पेमेंट केले तर 9.8 टक्के व्याजदराने पाच वर्षांच्या कार लोनवर तुम्हाला दरमहा बँकेत 30,915 रुपये जमा करावे लागतील. जर तुम्ही हे लोन 6 वर्षांसाठी घेतले तर तुम्हाला दरमहा 26,933 रुपये द्यावे लागतील.
जर तुम्ही महिंद्रा स्कॉर्पिओ खरेदी करण्यासाठी सुरुवातीला 3 लाख रुपये डाउन पेमेंट केले तर तुम्हाला 5 वर्षांच्या कर्जावर 9.8 टक्के व्याजदराने दरमहा सुमारे 25,091 रुपये द्यावे लागतील. अशा परिस्थितीत, जर तुमचा पगार 60-70 हजार रुपये असेल तर तुम्ही ही कार खरेदी करण्याचा विचार करू शकता.