Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 5 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Oben Rorr EVO Electric : मार्केट गाजवण्यासाठी Ready! रेंज जाणून व्हाल आवक्; म्हणाल “गाडी आताच book करू”

भारतातील आघाडीच्या स्वदेशी इलेक्ट्रिक मोटरसायकल उत्पादकांपैकी एक असलेल्या ओबेन इलेक्ट्रिकने, पहिल्या 10 हजार ग्राहकांसाठी आपली नवीन Rorr EVO बाजारात लॉन्च केली आहे. याचे नेमके काय फिचर्स आहेत ते जाणून घेऊयात.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 30, 2026 | 04:14 PM
Oben Rorr EVO Electric : मार्केट गाजवण्यासाठी Ready! रेंज जाणून व्हाल आवक्; म्हणाल “गाडी आताच book करू”
Follow Us
Follow Us:
  • मार्केट गाजवण्यासाठी Ready! रेंज जाणून व्हाल आवक्
  • म्हणाल “गाडी आताच book करू”
भारतात सध्या CNG च्या तुलनेत कमी असलं तरी इलेक्ट्रिक वाहनांचा बऱ्यापैकी पसंती मिळत आहे. सध्या इलेक्ट्रीक वाहनांनी ग्राहकांचं काहीसं लक्ष वेधून देखील घेतलं आहे. अशातच आता भारतातील आघाडीच्या स्वदेशी इलेक्ट्रिक मोटरसायकल उत्पादकांपैकी एक असलेल्या ओबेन इलेक्ट्रिकने, पहिल्या 10 हजार ग्राहकांसाठी आपली नवीन Rorr EVO बाजारात लॉन्च केली आहे. याचे नेमके काय फिचर्स आहेत ते जाणून घेऊयात.

इलेक्ट्रीक मोटारसायकल असली तरी या गाडीचे फिचर्स पाहून ती विकत घ्यावी असं नक्कीच वाटेल. Rorr EVO ही रोजच्या वापरासाठी सर्वात जास्त सोयीस्कर आहे असं या कंपनीचं म्हणणं आहे. फक्त फिटर्सच नाही तर या मोटरसायकलचं डिझाईन देखील तितकेच भारी आहेत.

Ampere ची Magnus Neo Electric Scooter लाँच; फुल चार्ज केल्यावर मिळतेय 118 किमीची रेंज…

ओबेन रोर ईव्हीओ इलेक्ट्रिक मोटरसायकल: डिझाइन
पुढच्या बाजूला सिग्नेचर फ्रंट पोझिशन लॅम्पसह प्रोजेक्टर हेडलॅम्प आहे. त्यामुळे रस्त्यावरुन जाताना या गाडीचा रुबाब अधिक दिसून येतो. Oben Rorr EVO Electric मोटरसायकलच्या फिचर्सबाबत सांगायचं तर 180 किमी रेंज AL Ride Mode हे सगळं यात देण्यात आलं आहे. या गाडीला त्याच कंपनीचं म्हणजेच ओबेन प्लग (फास्ट चार्जर) वापरून हे फक्त 90 मिनिटांत चार्जिंग होते. दैनंदिन चार्जिंगसाठी यात ओबेन पोर्ट, त्याचा ऑनबोर्ड चार्जर, दिलेला आहे. विशेष म्हणजे, स्थिर स्थितीतून ताशी 40 किमीचा वेग गाठायला याला फक्त 3 सेकंद लागतात.

याच्या रायडींग मोडला Smart IQ आहे. त्यामुळे रायडिंगच्या पद्धतींचे रिअल-टाइममध्ये रेंज 15 % पर्यंत वाढवण्यासाठी पॉवर डिलिव्हरीला ऑप्टिमाइझ करतो.रायडरच्या वर्तनानुसार आपोआप जुळवून घेत, स्मार्टआयक्यू  मॅन्युअल सेटिंग्ज कराव्या लागत नाही , ज्यामुळे परफॉर्मन्स जास्त वाढतो.

बॅटरी सिस्टिम

या मोटरसायकलला पॉवर देण्यासाठी IP68-रेटेड मोटर वापरली आहे. Rorr EVO मध्ये ओबेनची स्वतःची 3.4 kWh क्षमतेची उच्च-कार्यक्षमता असलेली LFP बॅटरी बसवलेली आहे. ही बॅटरी पारंपरिक लिथियम-आयन बॅटरीच्या तुलनेत 50% जास्त हिट कमी करते आणि मोटारसायकलीचे आयुष्य वाढवते. ही बॅटरी अधिक चांगल्या आघात प्रतिरोधकतेसाठी एका मजबूत ॲल्युमिनियम संरचनेत बसवलेली आहे आणि त्यावर 8 वर्षांची वॉरंटी आहे, ज्यामुळे दीर्घकाळ मालकीचा विश्वास वाढतो.

सुरक्षितता आणि कनेक्टिव्हिटी हे देखील रोर इव्होच्या अनुभवाचे अविभाज्य भाग आहेत. या मोटरसायकलमध्ये ‘फॉल अलर्ट विथ इमर्जन्सी असिस्ट’ हे वैशिष्ट्य सादर करण्यात आले आहे, जे पडणे ओळखते आणि ओबेन ॲपद्वारे अलर्ट पाठवते, तसेच आवश्यक असल्यास आपत्कालीन संपर्कांना सूचित करते. अतिरिक्त सुरक्षा वैशिष्ट्यांमध्ये युनिफाइड ब्रेक असिस्ट (UBA), ड्रायव्हर अलर्ट सिस्टीम (DAS), सुरक्षित चार्जिंग आणि सुधारित स्थिरतेसाठी रुंद मागील टायर यांचा समावेश आहे.

इलेक्ट्रिक SUV सेगमेंटमध्ये खळबळ! Tesla च्या Model YL ची भारतात एन्ट्री, काय आहेत फीचर्स?

Rorr EVO मध्ये 5-इंचाचा कलर TFT डिस्प्ले आहे, जो नेव्हिगेशन, राइड डेटा आणि कॉल, टेक्स्ट व म्युझिकसाठी स्मार्ट अलर्ट्स देतो. ओबेन इलेक्ट्रिक ॲपद्वारे, रायडर्सना राइड हिस्ट्री, जिओ-फेन्सिंग, रिमोट डायग्नोस्टिक्स, थेफ्ट प्रोटेक्शन, ‘फाइंड माय Rorr’ आणि 24 तास सर्व्हिस सपोर्ट मिळतो. यासोबतच, त्यांना 68 हजार पेक्षा जास्त चार्जिंगच्या नेटवर्कचा ॲक्सेस मिळतो, ज्यामुळे एक पूर्णपणे कनेक्टेड मालकीचा अनुभव सुनिश्चित होतो.

ओबेन रोर इव्हो इलेक्ट्रिक मोटरसायकल: रंग आणि किंमत
रोर इव्हो पल्स रेड, न्यूट्रॉन ब्लू, मॅग्नेटिक ब्लॅक आणि फोटॉन व्हाईट या चार रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. ही मोटरसायकल पहिल्या 10 हजार ग्राहकांसाठी 99 हजार 999 रुपये (एक्स-शोरूम) या प्रास्ताविक किमतीत उपलब्ध आहे, त्यानंतर तिची किंमत 1 लाख 24 हजार 999 रुपये (एक्स-शोरूम) असेल. फक्त 777 रुपयांमध्ये बुकिंग आता सुरू झाले असून, देशभरातील ओबेनच्या 150 शोरूम्समध्ये जून 2026 पासून टेस्ट राईड आणि ग्राहकांना डिलिव्हरी देण्यास सुरुवात होणार आहे.

Web Title: Oben rorr evo electric ready to conquer the market you will be amazed to know the range you will say lets book the car now

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 30, 2026 | 04:14 PM

Topics:  

  • auto mobile news
  • Marathi News
  • navrashtra news

संबंधित बातम्या

Top Woman Entrepreneurs In India: उद्योग जगतावर अधिराज्य गाजवतात ‘या’ महिला; ‘कँडेरे हुरुन इंडिया’ कडून यादी जाहीर
1

Top Woman Entrepreneurs In India: उद्योग जगतावर अधिराज्य गाजवतात ‘या’ महिला; ‘कँडेरे हुरुन इंडिया’ कडून यादी जाहीर

Pune News: मुसळधार पावसाने खचलेल्या करंजाळे रस्त्याची युद्धपातळीवर दुरुस्ती; प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासन सज्ज
2

Pune News: मुसळधार पावसाने खचलेल्या करंजाळे रस्त्याची युद्धपातळीवर दुरुस्ती; प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासन सज्ज

Plastic Currency : भारतीयांच्या हातात कधी येणार प्लास्टिकच्या नोटा? RBI गव्हर्नरने दिली महत्त्वाची माहिती
3

Plastic Currency : भारतीयांच्या हातात कधी येणार प्लास्टिकच्या नोटा? RBI गव्हर्नरने दिली महत्त्वाची माहिती

Raigad News: महाडकरांसाठी आनंदाची बातमी! शहरात ‘अपेक्स टर्फ’चे उद्घाटन; फुटबॉल-क्रिकेटसाठी मिळणार दर्जेदार सुविधा
4

Raigad News: महाडकरांसाठी आनंदाची बातमी! शहरात ‘अपेक्स टर्फ’चे उद्घाटन; फुटबॉल-क्रिकेटसाठी मिळणार दर्जेदार सुविधा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.