फोटो सौजन्य: X
अगदी काहीच महिन्यापूर्वी राज्य सरकारने HSRP नंबर प्लेट राज्यातील वाहनांसाठी अनिवार्य केली आहे. हा निर्णय लागू झाल्यानंतर अनेक वाहन चालकांमध्ये तारांबळ उडाली होती. यामुळे मग राज्य सरकाने HSRP नंबर प्लेट लावण्याची नवीन मुदत 30 जून केली आहे. हाय सेक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेटमुळे (HSRP) वाहनांची सुरक्षा अधिक वाढते. पण जर तुम्ही जुन्याच नंबर प्लेटसह वाहन वापरात असलात तर आता ती नंबर प्लेट बदलण्याची वेळ आली आहे. तुम्ही HSRP नंबर प्लेट तुमच्या घरबसल्या सहजपणे ऑनलाइन बुक करू शकता. चला याची प्रोसेस जाणून घेऊयात.
हाय सिक्युरिटी नंबर प्लेट (HSRP) ही अॅल्युमिनियमपासून तयार केलेली विशेष प्रकारची नंबर प्लेट असते. यात एक युनिक क्रमांक, होलोग्राम आणि लेसरने कोरलेला खास कोड असतो. यासोबत एक रंगीत स्टिकरही लावले जाते, ज्यामध्ये वाहनाची माहिती दिली जाते. जसे इंधनाचा प्रकार, नोंदणी क्रमांक, नोंदणीची तारीख इत्यादी. अशा प्रकारची प्लेट गाडी चोरीला गेल्यास तिचा मागोवा घेण्यासाठी खूपच उपयुक्त ठरते.
1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणीकृत असलेल्या वाहनांसाठी HSRP बसवणे अनिवार्य आहे. हा नियम दुचाकी, तीनचाकी आणि चारचाकी वाहनांसह सर्व प्रकारच्या वाहनांसाठी लागू करण्यात आला आहे, मग ते खाजगी असो वा व्यावसायिक.
ऑफिशियल वेबसाइटवर जावा: HSRP बुक करण्यासाठी, तुम्हाला वाहन उत्पादकाच्या (OEM) अधिकृत वेबसाइट (https://bookmyhsrp.com/) ला भेट द्यावी लागेल.
राज्य आणि वाहन प्रकार निवडा: वेबसाइटला भेट दिल्यानंतर, प्रथम तुमचे राज्य निवडा आणि नंतर वाहनाचा प्रकार (दुचाकी किंवा चारचाकी) निवडा.
वाहनाची माहिती भरा: यानंतर, तुम्हाला तुमच्या वाहनाचे आरसी नंबर, इंजिन नंबर आणि चेसिस नंबर सारखे तपशील काळजीपूर्वक भरावे लागतील. ही सर्व माहिती तुमच्या नोंदणी प्रमाणपत्रावर (RC) दिलेली आहे.
फिटमेंटचे स्थान आणि स्लॉट निवडा: तुम्हाला हाय सिक्युरिटी नंबर प्लेटची डिलिव्हरी कुठे पाहिजे आहे याची माहिती भरा व तारीख आणि टाइम स्लॉट निवडा.
May 2025 मध्ये लाँच होणार ‘या’ 4 मोठ्या कंपन्यांच्या मोठ्या कार्स
पेमेंट करा: नंतर तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने फी भरावी लागेल. साधारणपणे दुचाकींसाठी 300 ते 400 रुपये आणि चारचाकी वाहनांसाठी 500 ते 600 रुपये शुल्क आकारले जाते.
बुकिंग पावती मिळवा: हाय सिक्युरिटी नंबर प्लेटसाठी पैसे भरल्यानंतर, तुम्हाला एक पावती मिळेल, जी तुम्ही प्रिंट करू शकता किंवा PDF म्हणून सेव्ह करू शकता. जेव्हा तुम्ही ही नंबर प्लेट लावायला जाल तेव्हा तुम्हाला ही पावती दाखवावी लागेल.