फोटो सौजन्य: iStock
आपली स्वतःची कार असावी असे सगळ्यांनाच वाटते. पण हेच स्वप्न साकार करण्यासाठी अनेक जण दिवसरात्र कष्ट करत असतात. जर तुम्ही सुद्धा येत्या काळात कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची ठरणार आहे. कारण येत्या काळात काही बेस्ट कार्स मे 2025 मध्ये लाँच होणार आहे. पुढील महिन्यात किया, एमजी, टाटा, आणि फोक्सवॅगन सारखे मोठे ब्रँड भारतीय बाजारात त्यांच्या नवीन कार लाँच करणार आहेत.
यामध्ये एक नवीन MPV, एक प्रीमियम हॅचबॅक, एक लांब पल्ल्याची EV आणि एक स्पोर्टी GTI कार समाविष्ट आहे. या सर्व कार्सच्या लाँचिंगची तारीख, इंजिन आणि फीचर्सबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
Hyundai आणि Tata ला मागे सोडत ‘या’ कंपनीच्या SUV वर ग्राहक पडलेत तुटून, विक्रीत दिसली मोठी वाढ
किया इंडियाने त्यांच्या लोकप्रिय MPV Carens चे नवीन व्हर्जन Clavis या नावाने लाँच करण्याची घोषणा केली आहे. या कारचे डिझाइन 8 मे 2025 रोजी जाहीर केले जाईल, तर किंमत 2 जून 2025 रोजी जाहीर केली जाईल. ही नवीन एमपीव्ही लेव्हल 2 ADAS, 360-डिग्री कॅमेरा, 6 एअरबॅग्ज, 12.3-इंच इन्फोटेनमेंट सिस्टम, 10.25-इंच डिजिटल ड्रायव्हर कन्सोल आणि पॅनोरॅमिक सनरूफ सारख्या प्रीमियम फीचर्ससह सुसज्ज असेल. क्लॅव्हिस ही तिन्ही इंजिन पर्यायांसह लाँच केली जाणार आहे, ज्यात पेट्रोल, टर्बो पेट्रोल आणि डिझेल यांचा समावेश असेल.
टाटा अल्ट्रोज ही भारतीय मार्केटमध्ये एक विश्वासार्ह प्रीमियम हॅचबॅक म्हणून आधीच नाव कमावले आहे. आता त्याचे फेसलिफ्ट व्हर्जन 21 मे 2025 रोजी लाँच होणार आहे. फेसलिफ्ट मॉडेलमध्ये नवीन एक्सटिरिअर डिझाइन, डायमंड कट अलॉय व्हील्स आणि अपडेटेड इंटिरिअरसह अनेक नवीन फीचर्स असतील. अल्ट्रोज ही भारतातील एकमेव हॅचबॅक आहे, जी डिझेल इंजिन पर्यायासह येते, ज्यामुळे चांगली इंधन कार्यक्षमता हवी असलेल्या ग्राहकांसाठी ती एक उत्तम पर्याय बनते.
फोक्सवॅगन लवकरच भारतात त्यांची दुसरी GTI, गोल्फ जीटीआय लाँच करण्याची तयारी करत आहे. लाँचिंगची तारीख अद्याप निश्चित झालेली नसली तरी, ही कार मे 2025 मध्ये मार्केटमध्ये येऊ शकते अशी अपेक्षा आहे. गोल्फ जीटीआयमध्ये 2.0-लिटर टर्बो पेट्रोल इंजिन असेल, जे 261 बीएचपी आणि 370 एनएम टॉर्क निर्माण करते. ही कार अशा ग्राहकांसाठी आहे जे स्पोर्टी हँडलिंग, पॉवरफुल परफॉर्मन्स आणि प्रीमियम डिझाइन शोधत आहेत.
अनेक फीचर्सने सुसज्ज तरी किंमत कमीच, Toyota Innova चा Exclusive Edition लाँच
एमजी विंडसर ईव्हीने भारतीय इलेक्ट्रिक वाहन मार्केटमध्ये आधीच आपली मजबूत पकड निर्माण केली आहे. आता कंपनी या कारचे लॉंग रेंज व्हर्जन लाँच करण्याची तयारी करत आहे. या नवीन व्हेरियंटमध्ये 50.6 किलोवॅट प्रति तास बॅटरी पॅक असेल, जो एका चार्जवर सुमारे 460 किलोमीटरची रेंज देईल. या लॉंग रेंजद्वारे, एमजी अशा ग्राहकांना करते जे चार्जिंगची चिंता न करता लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी इलेक्ट्रिक कार खरेदी करू इच्छितात.