मार्केटमध्ये नवनवीन कार्सचे लाँचिंग होत असते. मात्र ज्याप्रमाणे नवीन कार मार्केटमध्ये दाखल होत असतात, त्याचप्रमाणे जुन्या कार्स देखील बंद होत असतात. यामागे अनेक कारण असतात. जसे की ग्राहकांची मागणी घटने किंवा कारचे पार्ट्स कालबाह्य होणे. नुकतेच आघाडीची ऑटो कंपनी Volkswagen आपल्या एका एसयूव्हीचे प्रोडक्शन बंद करण्याचा विचार करत आहे.
लवकरच फोक्सवॅगन त्याच्या लोकप्रिय फ्लॅगशिप एसयूव्ही Touareg चे उत्पादन बंद करण्याची तयारी करत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 2026 पर्यंत त्याचे उत्पादन पूर्णपणे बंद केले जाईल. ही कार 2002 मध्ये पहिल्यांदा लाँच करण्यात आली होती. तेव्हापासून याचे तीन जनरेशन सादर करण्यात आल्या आहेत. फोक्सवॅगन, पोर्श आणि ऑडी यांनी संयुक्तपणे ही कार विकसित केली आहे. चला या कारबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
फक्त 1 रुपयाचं नाणं आणि होईल हजारांची बचत, ‘अशाप्रकारे’ करा टायर चेक; अपघात होणारच नाही
2002 मध्ये पहिल्यांदा Volkswagen Touareg लाँच करण्यात आली होती. ती फोक्सवॅगन, पोर्शे आणि ऑडी यांनी संयुक्तपणे विकसित केली होती. ती Cayenne आणि Q7 च्या प्लॅटफॉर्मवर विकसित करण्यात आली होती. ही कार एका शक्तिशाली इंजिनसह लाँच करण्यात आली होती. याचे 5.0-लिटर डिझेल V10 इंजिन 350hp पॉवर आणि 850Nm टॉर्क जनरेट करते आणि 6.0-लिटर पेट्रोल W12 इंजिन 450hp पॉवर आणि 600Nm टॉर्क जनरेट करते.
कंपनी कोणती रिप्लेसमेंट एसयूव्ही सादर करेल याबद्दल अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही, याचा अर्थ असा होऊ शकतो की प्रीमियम एसयूव्ही 24 वर्षांच्या प्रोडक्शननंतर निवृत्त होऊ शकते.
Touareg टप्प्याटप्प्याने बंद झाल्यानंतर, Volkswagen Tayron ही युरोप आणि इतर प्रमुख बाजारपेठांसाठी कार निर्मात्याची सर्वात मोठी SUV असेल. 2023 च्या अखेरीस सादर करण्यात आलेली, Tayron दोन आणि तीन-रो सीटिंग कॉन्फिगरेशनमध्ये येते आणि 2018 मध्ये सादर करण्यात आलेल्या सध्याच्या जनरेशनच्या Touareg पेक्षा अधिक आधुनिक प्लॅटफॉर्मवर तयार केली आहे. 2025 च्या अखेरीस कंपनी भारतात Tayron लाँच करण्याची योजना आखत आहे.
मार्केट गाजवण्यासाठी लवकरच येत आहे KTM 160 Duke, कंपनीने प्रदर्शित केला टिझर
2009 मध्ये फोक्सवॅगनने भारतात पहिल्या जनरेशनची Touareg लाँच केली, ज्याची किंमत डिझेल V6 साठी 51.85 लाख रुपये होती. नंतर डिझेल V8 आणि V10 पॉवरप्लांट लाँच करण्यात आले आणि 2012 मध्ये दुसऱ्या जनरेशनची Touareg ने त्याची जागा घेतली. तेव्हा भारतात याची किंमत 58.5 लाख रुपयांपासून सुरू झाली होती आणि ती डिझेल आणि पेट्रोल V6 इंजिनसह देण्यात आली. 2019 मध्ये भारतात तिसऱ्या जनरेशनची Touareg लाँच होण्याची चर्चा होती, परंतु फोक्सवॅगनने ती भारतीय बाजारात आणली नाही.