फोटो सौजन्य: Social Media
भारतात लक्झरी कार्स आणि त्यांना बनवणाऱ्या कंपनीची नेहमीच चर्चा होताना दिसत असते. या लक्झरी कार्स देशातील अनेक प्रतिष्ठित व्यक्ती आणि सेलिब्रेटीजकडून वापरली जाते. तसे पाहायला गेले, तर भारतात लक्झरी कार्स उपलब्ध करून देणाऱ्या अनेक ऑटो कंपनीज आहेत. यातीलच एक कंपनी म्हणजे रतन टाटा यांची जग्वार कंपनी.
जग्वार कंपनी ही आपल्या स्टायलिश आणि लक्झरी कार्ससाठी ओळखली जाते. कंपनीने अनेक उत्तम कार्स भारतीय मार्केटमध्ये आणल्या आहेत. देशाचे सर्वात मोठे उद्योगपती राहिलेले रतन टाटा यांनी जग्वार कंपनी 2008 साली विकत घेतली.
रतन टाटा यांनी ही कंपनी फोर्डला भेडसावणाऱ्या आर्थिक संकटामुळे विकत घेतली होती. आता टाटाची जग्वार इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये आपले पहिले पॉल टाकण्यास सज्ज होत आहे. सुरुवातीला जग्वार तीन ईव्ही मॉडेल्सची टेस्टिंग करत आहे. यासोबतच जग्वारची पहिली ईव्ही 2026 मध्ये बाजारात येण्याची शक्यता आहे.
येणार काळ हे इलेक्ट्रिक वाहनांचा असल्यामुळे प्रत्येक ऑटो कंपनी आता आपले इलेक्ट्रिक वाहन मार्केटमध्ये आणत आहेत. तसेच ग्राहकांची इलेक्ट्रिक कारसाठीची मागणी सुद्धा वाढताना दिसत आहे. म्हणूच आता जग्वार कंपनीने इलेक्ट्रिक कार मारकेमध्ये आणायचा विचार केला आहे.
जग्वारच्या पहिल्या फोर-डोर इलेक्ट्रिक सेडानची कॉन्सेप्ट मॉडेल डिसेंबर 2024 मध्ये युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकामध्ये सादर केले जाऊ शकते. या कारच्या लाँचिंगसह, जॅग्वार इलेक्ट्रिक कार बाजारात प्रवेश करेल. ही कार Audi e tron आणि पोर्श टायकनला जागतिक बाजारपेठेत टक्कर देऊ शकते. सध्या ऑटोमेकर्सनी ही कार लाँच करण्याची कोणतीही अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही.
जग्वारने अलीकडे बाजारात अनेक कार्स विकणे बंद केले आहे. आता वाहन निर्माते पुढील महिन्यात I-Pace आणि E-Pace ची विक्रीही थांबवणार आहेत. यापूर्वीचे F-Type, XE आणि XF बंद करण्यात आले आहेत. Jaguar चे F-Pace हे शेवटचे मॉडेल शिल्लक आहे, जे 2025 पर्यंत बंद केले जाऊ शकते. याचाच अर्थ पुढील दोन वर्षे जग्वारचे कोणतेही नवीन मॉडेल बाजारात येणार नाही.
जॅग्वारला इलेक्ट्रिक कारसह एक मोठी योजना राबवायची आहे. जग्वार आपल्या ईव्हीसह लक्झरी कार कंपनी बेंटलेशी स्पर्धा करणार आहे. या कारचे इलेक्ट्रिक मॉडेल व्यावसायिक वाहनांपेक्षा बरेच वेगळे असू शकते. जग्वारची पहिली इलेक्ट्रिक कार बरीच महाग असू शकते. या कारमध्ये सर्व अत्याधुनिक फीचर्स समाविष्ट करता येतील.