फोटो सौजन्य: @mahindraesuvs (X.com)
महिंद्रा इलेक्ट्रिक ओरिजिन एसयूव्हीने इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण माइलस्टोन गाठला आहे. या अत्याधुनिक एसयूव्हीने जागतिक दर्जाच्या वैशिष्ट्यांसह आणि नवे मापदंड स्थापित केले आहेत. महिंद्रा इलेक्ट्रिकने या एसयूव्हीसाठी ग्राहकांकडून मिळालेल्या उत्तम प्रतिसादामुळे, Mahindra XEV-9E आणि BE 6 यांची सर्व पॅक्ससाठी नावनोंदणी १४ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ९ वाजल्यापासून सुरू करण्याची घोषणा केली आहे.
या एसयूव्हीच्या उत्पादनासाठी टप्प्याटप्प्याने वाढवण्याची योजना आखण्यात आली असून, ग्राहकांना विविध किंमतीमध्ये वेगवेगळ्या व्हेरियंट आणि पॅक्सची निवड करण्याची संधी मिळेल. या अत्याधुनिक इलेक्ट्रिक वाहने ग्राहकांच्या विविध आवश्यकता आणि पसंतीसाठी उपलब्ध असतील.
सतत FASTag रिचार्ज करण्याची डोकेदुखी थांबणार? केंद्रीय मंत्री नितिन गडकरी म्हणाले…
महिंद्रा ओरिजिन एसयूव्हीच्या प्रत्येक व्हेरियंटसाठी किंमती आणि वितरणाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार, 59 केडब्ल्यूएच बॅटरी पॅक असलेल्या पॅक वन आणि पॅक टू ची किंमत ₹ १८.९० लाख ते ₹ २४.९० लाख दरम्यान आहे, तर ७९ केडब्ल्यूएच बॅटरी पॅक असलेल्या पॅक थ्री ची किंमत ₹ २६.९० लाख पासून सुरू होईल.
वितरणाची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने होईल, आणि ग्राहकांना पुढील काही महिन्यांमध्ये त्यांच्या वाहनांची डिलिव्हरी मिळेल. पॅक थ्री ची डिलिव्हरी मार्च २०२५ पासून सुरू होईल, आणि इतर सर्व पॅक्स जुलै ते ऑगस्ट २०२५ दरम्यान वितरित केले जातील.
महिंद्रा इलेक्ट्रिक ओरिजिन एसयूव्हीसाठी दोन चार्जर पर्याय उपलब्ध आहेत – ₹ ५०,००० (७.२ केडब्ल्यू चार्जर) आणि ₹ ७५,००० (११.२ केडब्ल्यू चार्जर). हे चार्जर्स आणि त्यांच्या इंस्टॉलेशनचा खर्च किंमतीत समाविष्ट नाही. संस्थात्मक ऑर्डरसाठी (२ किंवा अधिक वाहने) चार्जर घेणे पर्यायी असते.
व्हिएतनामच्या ऑटो कंपनीचा भारतात जलवा, Tata Nano पेक्षाही छोटी इलेक्ट्रिक कार करणार लाँच
ग्राहकांना विविध आकर्षक रंगांमध्ये या एसयूव्हीची निवड करता येईल. बीई-६ आणि एक्सईव्ही-९ई व्हेरिएंटसाठी उपलब्ध रंगांमध्ये एव्हरेस्ट व्हाइट, डीप फॉरेस्ट, टॅन्गो रेड, नेब्युला ब्लू, डेजर्ट मिस्ट, रुबी वेल्वेट, फायरस्टॉर्म ऑरेंज, आणि स्टेल्थ ब्लॅक या रंगांचा समावेश आहे. काही रंगांमध्ये सॅटिन फिनिश देखील उपलब्ध आहे.
महिंद्रा इलेक्ट्रिक ओरिजिन एसयूव्ही ग्राहकांना एक प्रगत, पर्यावरणपूरक आणि अत्याधुनिक प्रवास अनुभव प्रदान करत आहे. ग्राहक ६ फेब्रुवारी २०२५ पासून अधिकृत वेबसाइटवर (https://www.mahindraelectricsuv.com/) जाऊन त्यांच्या पसंतीचे मॉडेल आणि व्हेरिएंट निवडू शकतात.
महिंद्रा इलेक्ट्रिकने या नवीन इलेक्ट्रिक वाहनांच्या वितरणासाठी नवीन मापदंड स्थापित केले आहेत, आणि ग्राहकांच्या वाढती मागणीला पूर्ण करण्यासाठी उत्पादनाची गती वाढवली जाणार आहे.