फोटो सौजन्य: @Xroaders_001 (X.com)
भारतीय मार्केटमध्ये इलेक्ट्रिक कारला चांगली मागणी मिळत आहे. म्हणूनच अनेक देश विदेशातील कार उत्पादक कंपन्या नवनवीन फीचर्स असणाऱ्या इलेक्ट्रिक कार लाँच करत आहे. आता व्हिएतनामची इलेक्ट्रिक कार उत्पादक कंपनी Vinfast देखील भारतीय मार्केटमध्ये आपल्या इलेक्ट्रिक कार लाँच करण्याच्या तयारीत आहे.
जानेवारी 2025 मध्ये झालेल्या भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2025 मध्ये व्हिएतनामच्या इलेक्ट्रिक कार उत्पादक कंपनी विनफास्टने त्यांच्या अनेक कारचे प्रदर्शन केले. यासोबतच, कंपनीने VinFast VF 6 आणि VinFast VF 7 देखील सादर केली होती, जे ते २०२५ च्या सणासुदीच्या हंगामात भारतात लाँच करू शकते.
या Electric Bike समोर सुपरबाईक्सचं काहीच चालेना ! फुल्ल चार्जमध्ये देते 332 km ची रेंज
Vinfast पुढील वर्षात म्हणजेच 2026 मध्ये भारतात त्यांची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार VinFast VF 3 लाँच करेल. ही कार टाटा नॅनोपेक्षा लहान दिसते, पण त्यात चार लोकं आरामात प्रवास करू शकतात. चला जाणून घेऊया, VinFast VF 3 मध्ये कोणते फीचर्स देण्यात येणार आहेत.
विनफास्ट व्हीएफ 3 मध्ये बॉक्सी डिझाइन आहे, ज्याच्या दोन्ही बाजूला दोन दरवाजे आहेत, जे एमजी कॉमेट ईव्ही प्रमाणेच आहेत. यात काळ्या रंगाची बंद ग्रिल आणि हॅलोजन हेडलाइट्ससह क्रोम बार आहेत. यात ऑल ब्लॅक फ्रंट आणि रिअर बंपर आहे, जो बॉडी क्लॅडिंगसह प्रदान केला आहे. यात पुढील आणि मागील बाजूस ब्लॅक-आउट भाग आहे, ज्यामध्ये हॅलोजन टेल लाईट्ससह क्रोम बार आहे.
VinFast VF 3 च्या केबिनमध्ये, तुम्हाला एक जाड दिसणारे 2-स्पोक स्टेअरिंग व्हील आणि 10-इंच फ्लोटिंग टचस्क्रीन मिळते. यामध्ये दिलेला फ्लोटिंग टचस्क्रीन ड्रायव्हरसाठी डिस्प्ले म्हणूनही काम करतो. त्याचे ग्लोबल-स्पेक मॉडेल पूर्णपणे काळ्या रंगाचे केबिन थीम आणि 4 सीट देते.
या कारमध्ये मागच्या सीटवर जाण्यासाठी पुढच्या सीट्स फोल्ड केल्या जाऊ शकतात. यात मॅन्युअल एसी आणि फ्रंट पॉवर विंडो देखील आहेत. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी, VF 3 मध्ये अनेक एअरबॅग्ज, EBD सह ABS आणि मागील पार्किंग सेन्सर सारखी अत्याधुनिक फीचर्स देण्यात आली आहेत.
Zepto ला मानला बॉस ! iPhone नंतर आता चक्क करणार ‘या’ लक्झरी कंपनीच्या कारची डिलिव्हरी
VinFast VF 3 च्या भारतातील किंमती कंपनीने अद्याप जाहीर केलेल्या नाहीत, परंतु त्यात असलेल्या फीचर्सचा आणि सुविधांचा विचार करता, त्याची किंमत 7 लाख ते 10 लाख रुपयांच्या दरम्यान असण्याची अपेक्षा आहे. भारतीय बाजारपेठेत, ही कार एमजी कॉमेट, टाटा टियागो ईव्ही, सिट्रोएन ईसी३ आणि टाटा टिगोर ईव्हीशी स्पर्धा करेल.
फोटो सौजन्य – @@Xroaders_001 (X.com)