Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Renault Duster तुमच्यासाठी किती सुरक्षित? नुकतेच झालेल्या BNCAP Crash Test मध्ये मिळाले ‘इतके’ रेटिंग्स

नुकतेच रेनॉल्ट डस्टरची Crash Test पूर्ण झाली. यानिमित्ताने आज आपण या कारला किती सेफ्टी रेटिंग मिळाली त्याबद्दल जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Apr 20, 2026 | 07:13 PM
फोटो सौजन्य: Pinterest

फोटो सौजन्य: Pinterest

Follow Us
Follow Us:
  • रेनॉल्ट डस्टर ही देशातील एक लोकप्रिय कार
  • क्रॅश टेस्टमध्ये कारने मारली बाजी
  • मिळाली 5 स्टार रेटिंग
जेव्हा कधी कर खरेदीदार नवीन कार खरेदी करण्यास जातो तेव्हा तो कारची किंमत आणि मायलेज बघण्यासोबतच त्यातील सेफ्टी फीचर्स देखील आवर्जून बघतो. म्हणूनच हल्ली अनेक कंपन्यांनी त्यांच्या कारमध्ये दमदार सेफ्टी फीचर्स समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक ऑटो कंपन्या त्यांच्या कारचे क्रॅश टेस्ट देखील करत असतात. नुकतेच रेनॉल्ट डस्टरची सुद्धा क्रॅश टेस्ट करण्यात आली.

भारतीय बाजारात नुकतीच लाँच झालेली Renault Duster आता सेफ्टीच्या बाबतीतही चर्चेत आली आहे. Bharat NCAP (BNCAP) कडून या एसयूव्हीचे क्रॅश टेस्ट करण्यात आले असून, त्याचे निकाल जाहीर केले गेले आहे.

EV मार्केट गाजवण्यासाठी आम्ही पण सज्ज! Hyundai ची नवीन कार टेस्टिंग दरम्यान स्पॉट

Renault Duster ची क्रॅश टेस्ट

रेनोकडून ऑफर केली जाणारी Duster SUV ची BNCAP ने मार्च 2026 मध्ये क्रॅश टेस्ट केली होती. आता या टेस्टची अधिकृत रेटिंग समोर आली आहे.

किती मिळाली रेटिंग?

Renault Duster ला क्रॅश टेस्टमध्ये पूर्ण 5-स्टार सेफ्टी रेटिंग मिळाली आहे. यामुळे ही SUV प्रौढ आणि लहान मुलांसाठी सुरक्षित असल्याचे स्पष्ट झाले आहे.

प्रौढांसाठी ही कार किती सुरक्षित?

BNCAP च्या चाचणीत Duster ला फ्रंटल इम्पॅक्ट टेस्टमध्ये 14.49 आणि साइड मूव्हेबल बॅरियर टेस्टमध्ये 16 गुण मिळाले आहेत. एकूण 32 पैकी 30.49 गुण मिळवत या SUV ने उत्कृष्ट कामगिरी केली आहे.

Hyundai VENUE चा स्पेशल एडिशन लाँच! जाणून घ्या वैशिष्ट्य आणि किंमत

मुलांसाठी किती सुरक्षित?

मुलांच्या सुरक्षेसाठीही या SUV ला चांगले गुण मिळाले आहेत. डायनॅमिक स्कोअरमध्ये 24, CRS इंस्टॉलेशनमध्ये 12 आणि व्हेईकल असिस्टन्स सेफ्टी (VAS) टेस्टमध्ये 9 गुण मिळाले आहेत. एकूण 49 पैकी 45 गुण मिळवत ही SUV मुलांसाठीही सुरक्षित ठरली आहे.

सेफ्टी फीचर्स कसे आहेत?

रेनोने Duster मध्ये 360-डिग्री कॅमेरा, फॉग लॅम्प, इलेक्ट्रिक पावर टेलगेट, Level-2 ADAS, 35 पेक्षा जास्त सेफ्टी फीचर्स, सहा एअरबॅग्स, ABS, EBD, ISOFIX चाइल्ड अँकरेज यांसारखे अनेक आधुनिक सुरक्षा फीचर्स दिले आहेत.

किंमत किती?

Renault Duster ची एक्स-शोरूम किंमत 10.49 लाख रुपयांपासून सुरू होते, तर टॉप व्हेरिएंटसाठी 18.49 लाख रुपये मोजावे लागतात.

कोणाशी आहे स्पर्धा?

या SUV चा मुकाबला Hyundai Creta, Kia Seltos, Honda Elevate, Skoda Kushaq, Tata Sierra, MG Hector आणि Maruti Victoris यांसारख्या एसयूव्हींशी होत आहे.

Web Title: Renault duster got 5 star safety rating in bncap crash test

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 20, 2026 | 07:13 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • Renault

संबंधित बातम्या

JSW Group आणि Skoda Auto Volkswagen यांचा संयुक्त उपक्रम! भारतातील उत्पादनाला मिळणार मोठी चालना
1

JSW Group आणि Skoda Auto Volkswagen यांचा संयुक्त उपक्रम! भारतातील उत्पादनाला मिळणार मोठी चालना

कावासाकीच्या बाइक्सवर सप्टेंबरमध्ये मोठी सूट! तब्बल Rs. 2.89 लाखांपर्यंत सूट मिळणार! पाहा ऑफर्स
2

कावासाकीच्या बाइक्सवर सप्टेंबरमध्ये मोठी सूट! तब्बल Rs. 2.89 लाखांपर्यंत सूट मिळणार! पाहा ऑफर्स

BMW i5 लाँग व्हीलबेस भारतात लाँच! ₹79.60 लाखांत मिळणार ही लक्झरी इलेक्ट्रिक सेडान!
3

BMW i5 लाँग व्हीलबेस भारतात लाँच! ₹79.60 लाखांत मिळणार ही लक्झरी इलेक्ट्रिक सेडान!

शाओमीच्या नव्या SUVची एन्ट्री! 1,705 km रेंजसह N70 आणि N90  मार्केटमध्ये दाखल
4

शाओमीच्या नव्या SUVची एन्ट्री! 1,705 km रेंजसह N70 आणि N90  मार्केटमध्ये दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.