Yamaha कडून विशेष गणेश चतुर्थी ऑफर्सची घोषणा फोटो सौजन्य: iStock
महाराष्ट्रभरात गणेशोत्सवाचा जल्लोष सुरू होण्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. गणपती बाप्पाच्या आगमनाने संपूर्ण राज्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, या पार्श्वभूमीवर यामाहा कंपनीने महाराष्ट्रातील ग्राहकांसाठी विशेष गणेश चतुर्थी ऑफर्स जाहीर केल्या आहेत. या ऑफर्समुळे ग्राहकांना त्यांच्या आवडत्या यामाहा स्कूटर किंवा बाईक खरेदी करण्याची एक उत्तम संधी उपलब्ध होणार आहे.
यामाहा या सणासुदीच्या काळात ग्राहकांसाठी खास डिझाइन केलेल्या फायद्यांच्या पॅकेजसह आला आहे. या ऑफर्समध्ये आकर्षक Price Benefits, कमी व्याजदरावर फायनान्सिंग योजना, कमी डाउन पेमेंट स्कीम्स आणि दीर्घकालीन वॉरंटी यांचा समावेश आहे. त्यामुळे या गणेशोत्सवात तुमच्या स्वप्नातील यामाहा दुचाकी घरी आणण्याचा हा योग्य क्षण आहे.
2 नव्या रंगाच्या पर्यायांसह Tata Punch EV, आता मिळणार अधिक फास्ट चार्जिंग; पहा फिचर्स
यामाहा कंपनीने आपल्या संपूर्ण मेड-इन-इंडिया स्कूटर व बाईकच्या श्रेणीवर 10 वर्षांची टोटल वॉरंटी उपलब्ध करून दिली आहे. या विशेष वॉरंटी उपक्रमात 2 वर्षे स्टॅण्डर्ड वॉरंटी आणि अतिरिक्त 8 वर्षांची एक्स्टेंडेड वॉरंटी समाविष्ट आहे. यामुळे यामाहाचे ग्राहक केवळ दुचाकीच नाही तर दीर्घकालीन संरक्षण व निश्चिंत राइडिंग अनुभव देखील खरेदी करतात.
दिवाळीत मोदी सरकार GST कमी करणार? काय असेल Maruti Alto, Swift, Dzire आणि WagonR ची नवी किंमत?
हायब्रिड स्कूटर श्रेणी (RayZR Fi, Fascino 125 Fi) आणि Aerox 155 Version S स्कूटर आता जवळपास 1,00,000 किमी वॉरंटी कव्हरेजसह उपलब्ध आहेत. तर संपूर्ण मेड-इन-इंडिया बाईक रेंज (FZ Series, R15 आणि MT-15) 1,25,000 किमीपर्यंतच्या उद्योग-अग्रणी वॉरंटी कव्हरेजसह येते.
यामाहाच्या स्टायलिश डिझाईन, उत्कृष्ट परफॉर्मन्स आणि विश्वासार्हतेसाठी प्रसिद्ध असलेल्या दुचाकी आता अधिक परवडणाऱ्या व सोप्या फायनान्स योजनांमध्ये उपलब्ध आहेत.