Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rolls Royce च्या कारवरील या लोगोबद्दल तुम्हाला माहिती आहे का? ही आहे ‘Sprit Of Ecstasy’ ची कहाणी

जगातील सर्वात आलिशान आणि नामांकित कार ब्रँड्सपैकी एक असलेल्या Rolls-Royce Cars च्या कारच्या बोनटवर दिसणारी पंख पसरल्या सारख्या स्त्रीची मूर्ती अनेकांचे लक्ष वेधून घेते. या प्रसिद्ध प्रतीकाला "Spirit of Ecstasy" असे म्हणतात. ही केवळ एक शोभेची मूर्ती नसून तिच्यामागे प्रेमकथा, कला आणि इतिहासाची एक अनोखी कहाणी दडलेली आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Jun 03, 2026 | 09:19 PM
Rolls Royce च्या कारवरील या लोगोबद्दल तुम्हाला माहिती आहे का? ही आहे ‘Sprit Of Ecstasy’ ची कहाणी
Follow Us
Follow Us:

जगातील सर्वात आलिशान आणि नामांकित कार ब्रँड्सपैकी एक असलेल्या Rolls-Royce Cars च्या कारच्या बोनटवर दिसणारी पंख पसरल्या सारख्या स्त्रीची मूर्ती अनेकांचे लक्ष वेधून घेते. या प्रसिद्ध प्रतीकाला “Spirit of Ecstasy” असे म्हणतात. ही केवळ एक शोभेची मूर्ती नसून तिच्यामागे प्रेमकथा, कला आणि इतिहासाची एक अनोखी कहाणी दडलेली आहे.

प्रेमकथेतून जन्मलेले प्रतिक

१९०० च्या दशकाच्या सुरुवातीला ब्रिटीश व्यक्ती जॉन वाल्टर एडवर्ड स्कॉट मॉन्टॅग्यू यांना त्यांच्या कारसाठी एक खास प्रतिक किंवा लोगो तयार करून घ्यायचा होता.त्यासाठी त्यांनी चार्ल्स रॉबिन्सन सायक्स यांची मदत घेतली. सायक्स यांनी तयार केलेल्या मूर्तीसाठी त्यांना जी प्रेरणा मिळाली ती मॉन्टॅग्यू यांच्या सेक्रेटरी आणि कथित प्रेमिका एलनोर वेलस्को यांच्याकडून. सुरुवातीला या मूर्तीचे नाव The Whisper असे ठेवण्यात आले होते. त्यानंतर त्याच संकल्पनेतून “Spirit of Ecstasy” ची या प्रतीकाची निर्मिती झाली.

‘या’ व्यक्तीने एकाच दिवशी खरेदी केली 3 Rolls–Royce – Navarashtra

१९११ मध्ये अधिकृत पदार्पण

1911 साली रोल्स-रॉईस यांनी या मूर्तीला आपल्या वाहनांचे अधिकृत प्रतीक म्हणून स्वीकारले. मूर्तीतील स्त्री पुढे झेपावत असल्यासारखी दिसते. तिचे वस्त्र वाऱ्यात उडत असल्याचा भास होतो. हे दृश्य वेग, सौंदर्य, स्वातंत्र्य आणि अभिजातता यांचे प्रतीक मानले जाते. या प्रतीकाने रोल्स-रॉईस आपल्या दर्जाची  आणि प्रमाणाची साक्ष देते.

काळानुसार बदल

गेल्या शंभर वर्षाच्या काळात या मूर्तीच्या आकारात आणि साहित्यामध्ये अनेक बदल झाले आहेत. सुरुवातीला ही मूर्ती चांदी किंवा धातूपासून बनवली जात होती. आज काही विशेष मॉडेल्समध्ये ती स्टेनलेस स्टील, क्रिस्टल किंवा सोन्याच्या फिनिशमध्येही उपलब्ध आहे. आधुनिक रोल्स-रॉईस कारमध्ये ही मूर्ती कोणी स्पर्श केल्यास बोनटमध्ये आपोआप आत सरकते, ज्यामुळे चोरी किंवा नुकसान होण्याचा धोका कमी होतो.

भारतात Rolls Royce च्या सर्वात स्वस्त मॉडेलची किंमत किती?

केवळ लोगो नाही, तर एक ओळख

जगभरात अनेक कार कंपन्यांचे लोगो प्रसिद्ध आहेत, पण “Spirit of Ecstasy” ही एकमेव अशी ओळख आहे जी कारच्या बोनटवर त्रिमितीय शिल्पाच्या स्वरूपात दिसते. त्यामुळे ती केवळ लोगो नसून रोल्स-रॉईसच्या वैभवशाली परंपरेचे आणि कारागिरीचे जिवंत प्रतीक बनली आहे. आजही “Spirit of Ecstasy” चा लोगो कम मूर्ती पाहताच लोकांच्या मनात लक्झरी, प्रतिष्ठा आणि रोल्स-रॉईसची अद्वितीय ओळख जागी होते.

 

Web Title: Rolls royace car logo sprit of ecstasy auto sector

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 03, 2026 | 09:17 PM

Topics:  

  • automobile
  • cars

संबंधित बातम्या

या बहाद्दराने पूर्ण केली १८,००० किमी ची सायकल राइड! स्वतःबरोबरच दुसऱ्यांनाही केले सायकल वापरण्यासाठी प्रोत्साहित!
1

या बहाद्दराने पूर्ण केली १८,००० किमी ची सायकल राइड! स्वतःबरोबरच दुसऱ्यांनाही केले सायकल वापरण्यासाठी प्रोत्साहित!

अँबेसेडरची सुरुवात इथूनच! जुन्या भारताची ओळख बनलेली हिंदुस्तान लँडमास्टर आजही का खास आहे?
2

अँबेसेडरची सुरुवात इथूनच! जुन्या भारताची ओळख बनलेली हिंदुस्तान लँडमास्टर आजही का खास आहे?

चीनमध्ये लाँच होतेय ‘टिकटॉक’ कार! जाणून घ्या या कारबद्दल सर्वकाही
3

चीनमध्ये लाँच होतेय ‘टिकटॉक’ कार! जाणून घ्या या कारबद्दल सर्वकाही

दोन चाकांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी! आज आहे ‘जागतिक सायकल दिवस’
4

दोन चाकांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी! आज आहे ‘जागतिक सायकल दिवस’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.