Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दोन चाकांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी! आज आहे ‘जागतिक सायकल दिवस’

आज जगभरातील वाहतुकीच्या इतिहासात सायकलला एक महत्त्वाचं स्थान आहे. साधी स्वस्त आणि पर्यावरणपूरक असलेली ही सायकल केवळ वाहतुकीचे साधन नाही, तर आधुनिक दुचाकी उद्योगाची जननी म्हणून हिला ओळखले जाते. आज 3 जून सर्व जगभरात जागतिक सायकल दिवस म्हणून साजरा केला जातो.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Jun 03, 2026 | 03:36 PM
दोन चाकांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी! आज आहे ‘जागतिक सायकल दिवस’
Follow Us
Follow Us:

आज जगभरातील वाहतुकीच्या इतिहासात सायकलला एक महत्त्वाचं स्थान आहे. साधी स्वस्त आणि पर्यावरणपूरक असलेली ही सायकल केवळ वाहतुकीचे साधन नाही, तर आधुनिक दुचाकी उद्योगाची जननी म्हणून हिला ओळखले जाते. आज 3 जून सर्व जगभरात जागतिक सायकल दिवस म्हणून साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रांनी २०१८ साली 3 जून या दिवशी जागतिक सायकल दिवस करण्याचे नियोजिले. सायकलीचे वाहतुकीसाठी पर्यावरणपूरक, साधे आणि बहुगुणसंपन्न फायदे, आजच्या दिवशी साजरे केले जातात. आज आपण पाहणार आहोत याच सायकलची जन्मकथा,

अगदी आपल्या लहानपणीही आपण सायकल नक्कीच  चालवली असणार. आपल्या मागच्या आणि त्यांच्याही मागच्या पिढीने सायकलचा वेगवेगळ्या पद्धतीने अनुभव घेतलाच आहे. सायकल चालवण्याची जागा आता टू व्हीलरने किंवा कारने घेतली असली तरी , सायकलच्या आठवणी नेहमीच आपल्या मनात राहतील.

World Bicycle Day : ‘सायकलींचे शहर’ म्हणून पुण्याची ओळख नावापुरतीच …

सायकलचा जन्म 1817 मध्ये जर्मनीतील संशोधक कार्ल फॉन ड्राइस यांनी तयार केलेल्या “ड्राइसिन” या दोन चाकांच्या वाहनातून झाला. त्या वाहनाला पेडल नव्हतं; चालकाला जमिनीवर पाय मारून ते पुढे न्यावं लागत असे. पुढे 1860 च्या दशकात फ्रान्समध्ये पेडलयुक्त सायकल विकसित झाली आणि त्यानंतर सायकलचे आधुनिक स्वरूप आकाराला आले. औद्योगिक क्रांतीदरम्यान धातू प्रक्रिया, चाकांचे तंत्रज्ञान आणि यांत्रिक अभियांत्रिकीमध्ये झालेल्या प्रगतीमुळे सायकल अधिक मजबूत, सुरक्षित आणि सर्वसामान्यांसाठी परवडणारी बनली.

भारतामध्ये सायकलचा प्रसार ब्रिटिश काळात सुरू झाला. स्वातंत्र्यानंतर देशाच्या वाहतूक व्यवस्थेत सायकलने महत्त्वाची भूमिका बजावली. ग्रामीण भागातील शेतकरी, विद्यार्थी, कामगार आणि लघुउद्योजक यांच्यासाठी सायकल हे सर्वात विश्वासार्ह वाहन ठरले. आजही भारत हा जगातील सर्वात मोठ्या सायकल उत्पादक देशांपैकी एक आहे. पंजाबमधील लुधियाना हे भारतीय सायकल उद्योगाच प्रमुख केंद्र मानलं जातं. हिरो, अॅटलस आणि एव्हॉन यांसारख्या कंपन्यांनी लाखो भारतीयांना परवडणारी वाहतूक उपलब्ध करून दिली.

World Bicycle Day 2025: रोज चालवा सायकल, 5 आजार पळतील दूर

विशेष म्हणजे सायकल उद्योगानेच भारतीय दुचाकी उद्योगाची पायाभरणी केली. सायकल निर्मितीसाठी विकसित झालेली चाके, फ्रेम, चेन, गिअर आणि उत्पादन तंत्रज्ञान याच आधारावर पुढे मोपेड, स्कूटर आणि मोटरसायकल उद्योग विकसित झाला. अनेक ऑटो-कंपोनंट उत्पादक कंपन्यांनी सुरुवात सायकलच्या सुट्या भागांपासूनच केली होती.

आज इलेक्ट्रिक वाहने आणि अत्याधुनिक मोटरसायकलींचे युग असले तरी सायकलचे महत्त्व कमी झालेले नाही. आरोग्य, पर्यावरण आणि शाश्वत वाहतूक यासाठी जगभर पुन्हा सायकलकडे पाहिलं जात आहे. दोन चाकांच्या उद्योगाचा हा पाया भविष्यातही तितकाच मजबूत राहणार आहे. सायकल ही केवळ एक वाहन नसून भारतीय दुचाकी उद्योगाच्या यशोगाथेची पहिली पायरी आहे.

Web Title: World bicycle day success story of bicycle

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 03, 2026 | 03:36 PM

Topics:  

  • automobile
  • Two Wheeler
  • World Bicycle Day

संबंधित बातम्या

थारप्रेमींसाठी क्रेझी बातमी! Mahindra Thar Facelift, Vision.S आणि BE.07 लवकरच येणार मार्केटमध्ये! पाहा डिटेलमध्ये माहिती
1

थारप्रेमींसाठी क्रेझी बातमी! Mahindra Thar Facelift, Vision.S आणि BE.07 लवकरच येणार मार्केटमध्ये! पाहा डिटेलमध्ये माहिती

TVS Apache RR 310 आणि RTR 310 Black Diamond Edition लाँच; किंमत ₹2.48 लाखांपासून सुरु! पाह काय आहेत फीचर्स
2

TVS Apache RR 310 आणि RTR 310 Black Diamond Edition लाँच; किंमत ₹2.48 लाखांपासून सुरु! पाह काय आहेत फीचर्स

Tata Sierra Dark Edition लाँच; किंमत ₹13.99 लाखांपासून, मिळणार खास ब्लॅक थीम
3

Tata Sierra Dark Edition लाँच; किंमत ₹13.99 लाखांपासून, मिळणार खास ब्लॅक थीम

Royal Enfield Meteor 350 vs Triumph Tracker 400: किंमत, पॉवर आणि फीचर्समध्ये काय आहे फरक?
4

Royal Enfield Meteor 350 vs Triumph Tracker 400: किंमत, पॉवर आणि फीचर्समध्ये काय आहे फरक?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.