Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बुलेट प्रेमींसाठी खुशखबर! RE रॉयल एनफिल्ड क्लासिक 350 2026, नवीन फीचर्ससह लाँच, किंमत ₹1.87 लाखांपासून सुरु

रॉयल एनफिल्डने प्रॅक्टिकल फीचर्ससह आपली लोकप्रिय २०२६ क्लासिक ३५० बाईक ₹१.८७ लाखांच्या सुरुवातीच्या किमतीत भारतात लाँच केली असून, यात स्लिपर क्लच आणि टाईप-सी चार्जिंग पोर्ट देण्यात आले आहेत. बाईकच्या जुन्या रेट्रो डिझाईन आणि ३४९ सीसी इंजिनमध्ये कोणताही बदल न करता ग्राहकांच्या दैनंदिन सोयीसाठी हे नवीन अपडेट्स जोडण्यात आले आहेत.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Jul 16, 2026 | 03:46 PM
बुलेट प्रेमींसाठी खुशखबर! RE रॉयल एनफिल्ड क्लासिक 350 2026, नवीन फीचर्ससह लाँच, किंमत ₹1.87 लाखांपासून सुरु
Follow Us
Follow Us:

भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रातील दुचाकी दिग्गजांपैकी रॉयल एनफिल्डने आपली सर्वात लोकप्रिय बाईक ‘क्लासिक ३५०’ चे २०२६ मधील अपडेटेड व्हर्जन भारतात लाँच केले आहे. या नव्या मॉडेलची एक्स-शोरूम किंमत १.८७ लाख रुपयांपासून सुरू होऊन टॉप व्हेरिएंटसाठी २.२३ लाख रुपयांपर्यंत जाते. आजपासूनच ही बाईक देशभरातील रॉयल एनफिल्डच्या डीलरशिप्सवर उपलब्ध झाली आहे.

कंपनीने बाईकच्या मूळ रेट्रो डिझाइनमध्ये कोणताही मोठा बदल न करता, ग्राहकांच्या दैनंदिन गरजेचा विचार करून काही महत्त्वाचे आणि प्रॅक्टिकल फीचर्स यामध्ये जोडलेले आहेत.

काय आहेत नवीन अपडेट्स?

नव्या २०२६ क्लासिक ३५० मध्ये प्रामुख्याने दोन मोठे बदल करण्यात आले आहेत, जे ड्युअल-चॅनल एबीएस Dual-Channel ABS असणाऱ्या सर्व व्हेरिएंट्समध्ये पाहायला मिळतील,

  • असिस्ट आणि स्लिपर क्लच: ट्रॅफिकमध्ये गाडी चालवताना यामुळे क्लच दाबणे सोपे होईल आणि अचानक गती कमी करताना मागचे चाक लॉक होणार नाही, ज्यामुळे रायडिंग अधिक सुरक्षित होईल.
  • USB टाईप-सी फास्ट चार्जिंग पोर्ट: प्रवास करताना किंवा नेव्हिगेशन वापरताना मोबाईल चार्ज करण्यासाठी आता कंपनीने इन-बिल्ट टाईप-सी फास्ट चार्जिंग पोर्ट दिला आहे.
रॉयल एनफिल्डची कमाल! जून २०२६ मध्ये २७ टक्के वाढीसह विकल्या १.१४ लाख गाड्या

इंजिन आणि तांत्रिक बाजू

बाईकमध्ये पूर्वीसारखेच परिचयाचे ३४९ सीसीचे सिंगल-सिलेंडर, एअर/ऑईल-कूल्ड जे-सिरीज इंजिन वापरण्यात आले आहे. हे इंजिन ६,१०० आरपीएमवर २०.२ बीएचपी पॉवर आणि ४,००० आरपीएमवर २७ एनएम टॉर्क जनरेट करते. हे इंजिन ५-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. इंजिनमध्ये इतर कोणताही खास बदल न करता, ते पूर्वीच्या स्वरूपातच ठेवण्यात आले आहे.

याशिवाय बाईकची चेसिस, सस्पेंशन, ब्रेकिंग सिस्टीम, १३ लिटरची इंधन टाकी आणि १७० मिमीचा ग्राउंड क्लिअरन्स यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

टॉप मॉडेलमधील फीचर्स

निवडलेल्या व्हेरिएंटनुसार ग्राहकांना एलईडी हेडलॅम्प, एलईडी पायलट लॅम्प्स, ॲडजस्टेबल ब्रेक आणि क्लच लेव्हर्स, गिअर पोझिशन इंडिकेटर आणि ‘ट्रिपर नेव्हिगेशन पॉड’ सारखे फीचर्स मिळतील, जे रॉयल एनफिल्ड ॲपद्वारे टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन दाखवते. जून २०२६ मध्ये कंपनीने एकूण १.१४ लाख गाड्यांची विक्री करत २७% वाढ नोंदवली आहे, ज्यामध्ये क्लासिक ३५० चा वाटा मोठा आहे.

Royal Enfield चा महाधमाका! नव्या Bullet 650 ने भारतात केला ग्रँड एंट्री… दमदार इंजिन अन् क्लासिक लूकवर सर्वच घायाळ

रंग आणि स्पर्धा

१९५० च्या दशकातील रॉयल एनफिल्ड G2 बाईकवरून प्रेरित असलेली ही क्लासिक ३५० तिच्या जुन्या गोल इंधन टाकी आणि रेट्रो लूकसह बाजारात दिसेल. ग्राहक ही बाईक रेडडिच रेड, हॅल्शियन ब्लॅक, मद्रास रेड, जोधपूर ब्लू, मेडालियन ब्रॉन्झ, कमांडो सँड, गन ग्रे, स्टील्थ ब्लॅक आणि एमराल्ड ग्रीन अशा विविध आकर्षक रंगांमध्ये खरेदी करू शकतात.

रॉयल एनफिल्डच्या पोर्टफोलिओमध्ये ही बाईक ‘बुलेट ३५०’ आणि ‘गोअन क्लासिक ३५०’ च्या दरम्यानचे स्थान घेते. भारतीय बाजारपेठेत या बाईकची थेट स्पर्धा होंडा CB350,  जावा ३५० आणि ट्रायम्फ स्पीड टी४ या गाड्यांशी आहे.

Web Title: Royal enfield classic 350 re launched in india booking available

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 16, 2026 | 03:45 PM

Topics:  

  • automobile
  • royal enfield

संबंधित बातम्या

मारुती सुझुकीचा मोठा टप्पा! इन-प्लांट रेल्वे सायडिंगमधून 10 लाख वाहनांची केली डिलिव्हरी
1

मारुती सुझुकीचा मोठा टप्पा! इन-प्लांट रेल्वे सायडिंगमधून 10 लाख वाहनांची केली डिलिव्हरी

टाटा सिएरा Legend Series लाँच; किंमत 11.99 लाखांपासून, मिळणार प्रीमियम फीचर्स
2

टाटा सिएरा Legend Series लाँच; किंमत 11.99 लाखांपासून, मिळणार प्रीमियम फीचर्स

कावासाकीची नवी Eliminator 500 SE! ब्लॅक लूकसह दमदार क्रूझरची एंट्री; जाणून घ्या फीचर्स आणि बरंच काही
3

कावासाकीची नवी Eliminator 500 SE! ब्लॅक लूकसह दमदार क्रूझरची एंट्री; जाणून घ्या फीचर्स आणि बरंच काही

हिरोच्या नवीन बाइक्सची तयारी! XPulse 421 पासून Karizma XMR 250 पर्यंत, जाणून घ्या डिटेल मध्ये
4

हिरोच्या नवीन बाइक्सची तयारी! XPulse 421 पासून Karizma XMR 250 पर्यंत, जाणून घ्या डिटेल मध्ये

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.