Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 6 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Royal Enfield Himalayan 440: जुना रांगडा अंदाज आणि नवीन पॉवर; सप्टेंबर २०२६ मध्ये लाँच होण्याची शक्यता!

रॉयल एनफिल्ड आपली नवीन हिमालयन ४४० ही ॲडव्हेंचर बाइक सप्टेंबर २०२६ पर्यंत लाँच करण्याची शक्यता आहे. स्क्रॅम ४४० च्या प्लॅटफॉर्मवर आधारित या बाइकमध्ये ४४३ सीसी इंजिन आणि ६-स्पीड गिअरबॉक्स मिळेल, जी हिमालयान ४५० पेक्षा अधिक परवडणारी असेल.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Aug 06, 2026 | 02:50 PM
Royal Enfield Himalayan 440: जुना रांगडा अंदाज आणि नवीन पॉवर; सप्टेंबर २०२६ मध्ये लाँच होण्याची शक्यता!
Follow Us
Follow Us:
  • दमदार इंजिन क्षमता: यात स्क्रॅम ४४० प्रमाणे ४४३ सीसी एअर-कूल्ड इंजिन, २५.४ पीएस पॉवर आणि हायवेसाठी ६-स्पीड गिअरबॉक्स मिळण्याची शक्यता आहे.
  • ऑफ-रोडिंग डिझाइन: खडतर रस्त्यांसाठी पुढे २१-इंच अन् मागे १७-इंच स्पोक व्हील्स, लांब ट्रॅव्हल सस्पेन्शन आणि उंच विंडस्क्रीन मिळण्याची शक्यता आहे.
  • परवडणारी अपेक्षित किंमत: सप्टेंबर २०२६ मध्ये लाँच होणाऱ्या या बाइकची किंमत सुमारे ₹२.४० लाख ते ₹२.५० लाख राहण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

रॉयल एनफिल्ड प्रेमींसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. कंपनी आपली नवीन ॲडव्हेंचर बाइक Royal Enfield Himalayan 440 मार्केटमध्ये आणण्याच्या तयारीत आहे. ही बाइक जानेवारी २०२५ मध्ये लाँच झालेल्या स्क्रॅम ४४० च्या प्लॅटफॉर्मवर आधारित असेल. जर तुम्हाला हिमालयन ४५० पेक्षा जास्त परवडणारी आणि साधी-सोपी ऑफ-रोडिंग बाइक हवी असेल, तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे.

दमदार इंजिन आणि हायवे परफॉर्मन्स

या नवीन बाइकमध्ये स्क्रॅम ४४० प्रमाणेच ४४३ सीसी, एअर/ऑइल-कूल्ड, सिंगल-सिलेंडर इंजिन पाहायला मिळेल. हे इंजिन २५.४ PS ची पॉवर आणि ३४ Nm चा टॉर्क जनरेट करते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यात ६-स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे, ज्यामुळे हायवेवर लांबच्या प्रवासादरम्यान बाइक चालवणे जास्त सोपे आणि आरामदायी होईल.

Royal Enfield Upcoming Bikes: नव्या ६ बाइक्ससह रॉयल एनफिल्ड बाजारात धुमाकूळ घालणार! पाहा कोणत्या असतील या दमदार बाईक्स

मजबूत हार्डवेअर आणि डिझाइन

ऑफ-रोडिंग आणि लांबच्या प्रवासाची गरज लक्षात घेऊन यात पुढे २१-इंच आणि मागे १७-इंच स्पोक व्हील्स दिले जाण्याची शक्यता आहे. यासोबतच खडतर रस्त्यांवर सहज प्रवास करण्यासाठी लांब ट्रॅव्हल असणारे सस्पेन्शन आणि हायवेवर वाऱ्याच्या वेगापासून बचाव करण्यासाठी उंच विंडस्क्रीन दिली जाईल.

किंमत आणि लाँच टाईमलाईन

नवी हिमालयान ४४० सप्टेंबर २०२६ च्या सुमारास भारतीय बाजारात लाँच होण्याची शक्यता आहे. तिची अपेक्षित किंमत ₹ २.४० लाख ते ₹ २.५० लाख (एक्स-शोरूम) असू शकते. हिमालयान ४५० ची किंमत जास्त असल्याने ही ४४० व्हर्जन बजेट ग्राहकांसाठी अत्यंत आकर्षक पर्याय ठरेल.

Royal Enfield Shotgun 650 लिमिटेड एडिशनची अवघ्या 3 मिनिटांत सर्व विक्री; भारतातील सर्व 25 युनिट्स सोल्ड आउट!

हिमालयान ४४० चे वैशिष्ट्य काय?

जुन्या हिमालयान ४११ चा रांगडा लुक आणि त्याचा लो-एंड टॉर्क रायडर्सच्या खूप पसंतीस पडला होता. नवीन हिमालयान ४४० मध्ये त्याच जुन्या ४११ ची धाटी जपली जाईल, पण मोठ्या इंजिन आणि ६-स्पीड गिअरबॉक्समुळे तिची क्षमता पूर्वीपेक्षा जास्त असेल. ज्यांना जास्त हाय-टेक फीचर्स नको आहेत, पण एक मजबूत अन् विश्वासार्ह ॲडव्हेंचर बाइक हवी आहे, त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय ठरेल. याशिवाय रॉयल एनफिल्डची हिमालयान ७५० देखील टेस्टिंगदरम्यान दिसून आली असून ती पुढील वर्षी लाँच होण्याची शक्यता आहे.

Web Title: Royal enfield himalayan 440 launch timeline price engine features auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 06, 2026 | 02:50 PM

Topics:  

  • automobile
  • Royal Enfield Bullet

संबंधित बातम्या

MG Hector Hawk: २८ ऑगस्टला भारतात लाँच होणार नवीन लक्झरी SUV; ईव्ही आणि हायब्रिड अवतारात मिळणार नवीन पर्याय!
1

MG Hector Hawk: २८ ऑगस्टला भारतात लाँच होणार नवीन लक्झरी SUV; ईव्ही आणि हायब्रिड अवतारात मिळणार नवीन पर्याय!

भारतात CNG बाईक का खरेदी करावी? विविध परिस्थितींमध्ये ही का ठरू शकते सर्वोत्तम पर्याय?
2

भारतात CNG बाईक का खरेदी करावी? विविध परिस्थितींमध्ये ही का ठरू शकते सर्वोत्तम पर्याय?

BYD ची नवी लक्झरी ई-कार!  टोयोटा वेलफायरला टक्कर देण्यासाठी BYD ची लक्झरी MPV ‘Denza D9’ यंदाच्या दिवाळीत भारतात होणार लाँच
3

BYD ची नवी लक्झरी ई-कार!  टोयोटा वेलफायरला टक्कर देण्यासाठी BYD ची लक्झरी MPV ‘Denza D9’ यंदाच्या दिवाळीत भारतात होणार लाँच

Ather ची इलेक्ट्रिकल मोटरसायकल २०२८ च्या ही नंतर लांबणीवर; कंपनीचे ‘EL’ स्कूटर प्लॅटफॉर्मवर जास्त लक्ष केंद्रित
4

Ather ची इलेक्ट्रिकल मोटरसायकल २०२८ च्या ही नंतर लांबणीवर; कंपनीचे ‘EL’ स्कूटर प्लॅटफॉर्मवर जास्त लक्ष केंद्रित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.