फोटो सौजन्य: iStock
भारतीय मार्केटमध्ये रॉयल एन्फिल्डची एक वेगळीच क्रेझ पाहायला मिळते. विशेषतः तरुणांमध्ये ही क्रेझ वाढतच चालली आहे. प्रत्येक तरुणाचे स्वप्न असते की आपल्याकडे रॉयल एन्फिल्डची बाईक असावी. हीच क्रेझ, लक्षात घेत कंपनी मार्केटमध्ये दमदार परफॉर्मन्स देणाऱ्या बाईक ऑफर करत असते. आता लवकरच कंपनी नवीन Himalayan 750 लाँच करण्याची तयारी करत आहे.
रॉयल एनफील्ड त्यांची सर्वात मोठी आणि सर्वात पॉवरफुल बाईक लाँच करण्याची तयारी करत आहे. रॉयल एनफील्डची ही बाईक रॉयल एनफील्ड हिमालयन 750 असणार आहे. कंपनीने त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर काही फोटो शेअर करून याची माहिती दिली आहे.
भारतातील रस्त्यांवर टेस्टिंग दरम्यान रॉयल एनफील्ड हिमालयन 750 बाईक अनेक वेळा दिसली आहे. कंपनी लडाखमध्ये त्याची टेस्टिंग करत आहे. नवीन रॉयल एनफील्ड हिमालयन 750 मध्ये काय नवीन दिसेल त्याबद्दल जाणून घेऊयात.
रॉयल एनफील्डने शेअर केलेल्या फोटोकडे पाहता, असे म्हणता येईल की ही बाईक लवकरच लाँच केली जाऊ शकते. यात ब्रेक केबल्स पुढच्या मडगार्डच्या वर आणि मागील ब्रेक केबलसह व्यवस्थित पॅक केलेले आहेत. तसेच याची विंडशील्ड बदलण्यात आली आहे. ज्यात या बाईकला पूर्वीपेक्षा लहान विंडशील्ड देण्यात आली आहे.
या बाईकमध्ये इंटरसेप्टर 650 सारखेच इंजिन असेल, परंतु हे इंजिन अधिक पॉवर आणि टॉर्क जनरेट करेल. यामुळे येणाऱ्या हिमालयनला हिमालयन 450 पेक्षा अधिक पॉवरफुल बनवले आहेच, परंतु ते बिग अॅडव्हेंचरला त्याच्या सेगमेंटमध्ये एक वेगळे स्थान देखील देईल. त्यात असलेले इंजिन सुमारे 55 पीएस पॉवर आणि 60 एनएम टॉर्क जनरेट करू शकते.
900 KM ची रेंज असणाऱ्या ‘या’ कारमागे पागल झाले आहेत ग्राहक, किंमत 5 लाखांपासून सुरु
यात 19/17-इंच स्पोक व्हील सेटअप पाहायला मिळू शकतो. त्यात ट्यूबलेस स्पोक व्हील सेटअप असेल की नाही हे अद्याप निश्चित झालेले नाही. यातील मोठ्या इंजिनमुळे, ही बाईक हिमालयन 450 पेक्षा खूपच जड असेल. यात समोर ड्युअल डिस्क आणि मागील बाजूला डिस्क ब्रेक असेल. त्यात ड्युअल-चॅनेल ABS देखील दिले जाऊ शकते.
2025 मध्ये इटलीतील मिलान येथे होणाऱ्या EICMA शो आणि २०२५ मोटोव्हर्स गोवामध्ये रॉयल एनफील्ड हिमालयन 750 सादर केली जाऊ शकते. नोव्हेंबर 2025 च्या आसपास भारतीय बाजारात ही बाईक लाँच केली जाऊ शकते. याची एक्स-शोरूम किंमत 4.5 लाख रुपयांपर्यंत असू शकते.