फोटो सौजन्य: @carandbike(X.com)
भारतात ज्या कंपनीच्या बाईक्सची एक वेगळीच क्रेझ पाहायला मिळते, तीच कंपनी आता आता इलेक्ट्रिक बाईक सेगमेंटमध्ये प्रवेश करणार आहे. ही कंपनी म्हणजे रॉयल एनफील्ड. कंपनीने त्यांची पहिली इलेक्ट्रिक बाईक Flying Flea C6 लाँच करण्याची घोषणा केली आहे. ही बाईक भारतात जानेवारी ते मार्च 2026 दरम्यान लाँच केली जाईल. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
रॉयल एनफील्डने “फ्लाइंग फ्ली” नावाच्या नवीन सब-ब्रँड अंतर्गत त्यांचा इलेक्ट्रिक व्हेईकल सेगमेंट सादर केला आहे. फ्लाइंग फ्ली सी६ ही या सिरीजमधील पहिली इलेक्ट्रिक बाईक असेल आणि यानंतर फ्लाइंग फ्ली एस६ देखील लवकरच बाजारात आणली जाईल. परंतु, कंपनीने अद्याप स्पष्ट केलेले नाही की या बाईक्स सध्याच्या डीलरशिप नेटवर्कमधून उपलब्ध असतील की त्यांच्यासाठी नवीन ईव्ही शोरूम उघडले जातील.
TVS च्या ‘या’ स्कूटरमागे ग्राहक पागल ! एका झटक्यात विकले जातात हजारो युनिट्स
Flying Flea C6 आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे आणि ते विशेषतः शहरातील लोकांसाठी डिझाइन केलेले आहे. यामध्ये रॉयल एनफील्डने विकसित केलेले इंटेलिजेंट व्हेईकल कंट्रोल युनिट (VCU) समाविष्ट आहे, जे बाईकचे थ्रॉटल, ब्रेकिंग आणि रिजनरेटिव्ह ब्रेकिंग हुशारीने नियंत्रित करते. या इलेक्ट्रिक बाईकमध्ये 5 प्रीसेट रायडिंग मोड आहेत, जे रायडर्स ट्रॅफिक, हायवे किंवा खराब रस्ते यासारख्या परिस्थितीनुसार कस्टमाइझ करू शकतात. स्मार्टफोन कनेक्टिव्हिटीच्या सुविधेमुळे, बाईक अनलॉक करता येते आणि मोबाईलवरूनच सुरू करता येते, ज्यामुळे ती एक स्मार्ट बाईक बनते.
या बाईकच्या चार्जिंगसाठी तीन-पिन प्लगचा सपोर्ट आहे, त्यामुळे ते सामान्य घरगुती प्लगने सहजपणे चार्ज केले जाऊ शकते आणि त्यासाठी हेव्ही चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चरची आवश्यकता नाही.
या बाईकमध्ये कॉर्नरिंग एबीएस, क्रूझ कंट्रोल, ट्रॅक्शन कंट्रोल, एलईडी लाईट्स आणि पूर्णपणे डिजिटल डिस्प्ले सारखी डिजिटल फीचर्स देखील आहेत, ज्यामुळे ती तांत्रिकदृष्ट्या ॲडव्हान्स इलेक्ट्रिक बाईक बनते.
MG Windsor EV Pro मधील ‘या’ टेक्नॉलजीमुळे कॉफी मशीन, इंडक्शन कुकर सारखे उपकरणं होईल झटक्यात चार्ज
कंपनीने फ्लाइंग फ्ली प्रकल्पावर 200 हून अधिक अभियंते तैनात केले आहेत आणि आतापर्यंत 45 हून अधिक पेटंट दाखल केले आहेत. तसेच रॉयल एनफील्डने पहिल्यांदाच 10 लाख युनिट्सच्या वार्षिक विक्रीचा विक्रमही ओलांडला आहे.
Flying Flea C6 नंतर, कंपनी लवकरच Flying Flea C6 लाँच करणार आहे. ही संपूर्ण सिरीज ग्लोबल स्टँडर्ड्स लक्षात घेऊन तयार केली जात आहे. ही भारतीय बाजारात आधीच अस्तित्वात असलेल्या Ola, Ather आणि Ultraviolette सारख्या इलेक्ट्रिक बाईक ब्रँडशी स्पर्धा करेल.