फोटो सौजन्य: @tvsiqube (X.com)
रस्त्यांवरील इलेक्ट्रिक वाहनांची वाढती संख्या हे दर्शविते की भारतीय मार्केटमध्ये त्यांची मागणी झपाट्याने वाढत आहे. हीच वाढती मागणी पाहता, अनेक ऑटो कंपन्या मार्केटमध्ये दमदार आणि अत्याधुनिक फीचर्स असणाऱ्या इलेक्ट्रिक कार, स्कूटर आणि बाईक लाँच करत आहे.
इलेक्ट्रिक कार्स व्यतिरिक्त, मार्केटमध्ये इलेक्ट्रिक स्कूटरला देखील मोठी मागणी मिळत आहे. Ola Electric सारख्या कंपन्या बाजारात बेस्ट इलेक्ट्रिक स्कूटर ऑफर करत आहे. पण याच कंपनीच्या स्कूटरला टक्कर देत TVS iQube ने विक्रीत बाजी मारली आहे.
भारतीय मार्केटमध्ये TVS iQube खूप लोकप्रिय इलेक्ट्रिक स्कूटर ठरली आहे. एप्रिल 2025 मध्ये 19 हजार 736 नवीन ग्राहकांनी ही परवडणारी स्कूटर खरेदी केली आहे. अशा परिस्थितीत, iQube ने विक्रमी सेल्ससह भारतीय इलेक्ट्रिक टू व्हीलर सेगमेंटमध्ये अव्वल स्थान मिळवले आहे. या स्कूटरने ओला इलेक्ट्रिक आणि बजाज चेतकलाही मागे टाकले आहे.
MG Windsor EV Pro मधील ‘या’ टेक्नॉलजीमुळे कॉफी मशीन, इंडक्शन कुकर सारखे उपकरणं होईल झटक्यात चार्ज
TVS iQube इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये बसवलेले मोटर 4.4 किलोवॅटची पीक पॉवर आणि 140 Nm चा पीक टॉर्क निर्माण करते. ही टीव्हीएस स्कूटर बाजारात तीन बॅटरी पॅकसह उपलब्ध आहे. यामध्ये 2.2 किलोवॅट प्रति तास, 3.4 किलोवॅट प्रति तास आणि 5.1 किलोवॅट प्रति तास बॅटरी पॅकचा समावेश आहे.
टीव्हीएस आयक्यूबचा 2.2 kWh क्षमतेचा बॅटरी पॅक एका चार्जिंगमध्ये 75 किमीची रेंज देतो. ही ईव्ही 0 ते 80 टक्के चार्ज होण्यासाठी 2 तास 45 मिनिटे लागतात. टीव्हीएस आयक्यूबचा 3.4 किलोवॅट क्षमतेचा बॅटरी पॅक 100 किलोमीटरची रेंज देतो.
या स्कूटरला चार्ज करण्यासाठी 4 तास 30 मिनिटे लागतात. इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये अनेक उत्तम आणि उत्कृष्ट सेफ्टी फीचर्स उपलब्ध आहेत. स्कूटरच्या बेस व्हेरियंटमध्ये 5-इंचाचा TFT डिस्प्ले आहे, तर ST व्हेरियंटमध्ये जॉयस्टिक नेव्हिगेशनसह 7-इंचाचा टचस्क्रीन डिस्प्ले देण्यात आला आहे. याशिवाय, टीव्हीएस स्मार्ट कनेक्ट तंत्रज्ञान आणि स्मार्टफोन कनेक्टिव्हिटीसह अनेक उत्तम फीचर्स उपलब्ध आहेत.
Tata च्या इलेक्ट्रिक कार खरेदी करण्यासाठी हीच ‘ती’ सुवर्णसंधी ! डिस्काउंट असे जे कधीच पाहिले नसतील
2.2 kWh बॅटरी पॅक असलेल्या TVS iQube स्कूटरची सुरुवातीची किंमत 94,434 रुपये आहे. iQube 3.4 kWh ची सुरुवातीची किंमत 1,08,993 रुपये झाली आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटर मोनोटोन आणि ड्युअल टोन अशा दोन्ही व्हेरियंटमध्ये येत आहे. या ईव्हीमध्ये 7 इंचाचा कलरफुल टीएफटी डिस्प्ले आहे. कंपनी या TVS इलेक्ट्रिक स्कूटरवर 3 वर्षांची किंवा 50,000 किलोमीटरपर्यंतची वॉरंटी देखील देते.