फोटो सौजन्य: @MGMotorIn (X.com)
भारतात अनेक उत्तम इलेक्ट्रिक कार्स ऑफर केल्या जात आहे. वाढत्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींना कंटाळून ग्राहक देखील या नव्या इलेक्ट्रिक वाहनांना दमदार प्रतिसाद देताना दिसत आहे. भारतात अनेक उत्तम इलेक्ट्रिक कार उपलब्ध आहेत. यातीलच एक उत्तम कार म्हणजे MG Windsor EV.
भारतीय मार्केटमध्ये MG Windsor EV ला दमदार प्रतिसाद मिळाला आहे. ग्राहकांचे हेच प्रेम पाहून एमजी मोटर्सने या कारचे अपडेटेड व्हर्जन MG Windsor EV Pro लाँच केले. हे मॉडेल विशेषतः प्रगत तंत्रज्ञानाने आणि पॉवरफुल बॅटरी पॅकने सुसज्ज आहे, जे लांब पल्ल्याच्या प्रवासाच्या आणि आधुनिक वापराच्या गरजा पूर्ण करते.
ही कार 52.9 kWh क्षमतेच्या बॅटरी पॅकने सुसज्ज आहे, जी एकदा चार्ज केल्यावर तुम्ही लांब पल्ल्याचे अंतर सहज गाठू शकता. तसेच, त्यात एक इलेक्ट्रिक टेल गेट आहे, जो फक्त बटण दाबून उघडता आणि बंद करता येतो.
सेफ्टी फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, एमजी विंडसर ईव्ही प्रो मध्ये ADAS लेव्हल-2 (अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टम्स) टेक्नॉलजी देण्यात आले आहे. या सिस्टीममध्ये ऑटोमॅटिक इमर्जन्सी ब्रेकिंग, लेन असिस्ट आणि ब्लाइंड स्पॉट डिटेक्शन सारख्या अॅडव्हान्स सेफ्टी फीचर्सचा समावेश आहे, ज्यामुळे ड्रायव्हिंग अधिक सुरक्षित आणि स्मार्ट बनते. याशिवाय, कारच्या चाकांची रचना एमजी हेक्टरच्या अलॉय व्हील्ससारखीच बनवण्यात आली आहे, ज्यामुळे या कारचा लूक आणखी प्रीमियम बनतो.
जर आपण किंमतीबद्दल बोललो तर, एमजी विंडसर ईव्ही प्रो ची सुरुवातीची किंमत 17.49 लाख रुपये ठेवण्यात आली होती. परंतु, जर ग्राहकांनी ही कार बॅटरी-अॅज-अ-सर्व्हिस मॉडेल अंतर्गत घेतली तर तिची किंमत 12.49 लाख रुपयांपर्यंत कमी होते. ही ऑफर मर्यादित 8000 युनिट्ससाठी होती आणि सर्व बुकिंग फक्त 24 तासांत संपली. आता कंपनीने त्याची किंमत 60,000 रुपयांनी वाढवली आहे.
Yamaha : ‘या’ बाईक आणि स्कूटरना मिळणार १० वर्षांची वॉरंटी, कंपनीने आणली शानदार ऑफर
V2L म्हणजेच Vehicle-to-Load. ही एक अॅडव्हान्स टेक्नॉलजी आहे, ज्याद्वारे तुम्ही तुमच्या इलेक्ट्रिक कारच्या बॅटरीचा वापर करून इतर इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस चालवू शकता. या तंत्रज्ञानाअंतर्गत, तुम्ही या कारमधून फक्त तुमचा मोबाईल फोन किंवा लॅपटॉप चार्ज करू शकत नाही तर इंडक्शन कुकर, कॉफी मशीन आणि मायक्रोवेव्ह सारखे डिव्हाइसेस देखील चालवू शकता. एवढेच नाही तर तुम्ही कारच्या बॅटरीने कॅमेरे आणि ड्रोन देखील चार्ज करू शकता.
ही टेक्नॉलजी विशेषतः ज्यांना बाहेरच्या ट्रिप्स, आणि कॅम्पिंगची आवड आहे त्यांच्यासाठी उपयुक्त आहे. V2L फीचर्सच्या मदतीने, तुम्ही कोणत्याही अतिरिक्त जनरेटरशिवाय कुठेही वीज वापरू शकता आणि गरज पडल्यास दुसरे इलेक्ट्रिक वाहन देखील चार्ज करू शकता.