Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Royal Enfield Shotgun 650 लिमिटेड एडिशनची अवघ्या 3 मिनिटांत सर्व विक्री; भारतातील सर्व 25 युनिट्स सोल्ड आउट!

रॉयल एनफील्डच्या 'Shotgun 650 Limited Edition' बाइकचे भारतीय बाजारासाठीचे सर्व २५ युनिट्स ऑनलाइन बुकिंग सुरू होताच अवघ्या ३ मिनिटांत पूर्णपणे सोल्ड आऊट झाले आहेत. 'रफ क्राफ्ट्स'च्या सहकार्याने बनवलेल्या या सुपर-एक्सक्लुझिव्ह बाइकसाठी जगभरातून ९,००० हून अधिक शौकिनांनी नोंदणी केली होती.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Jul 31, 2026 | 05:39 PM
Royal Enfield Shotgun 650 लिमिटेड एडिशनची अवघ्या 3 मिनिटांत सर्व विक्री; भारतातील सर्व 25 युनिट्स सोल्ड आउट!
Follow Us
Follow Us:
  • भारतातील २५ युनिट्ससाठी ५.७५ लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत ३० जुलै रोजी बुकिंग सुरू होताच अवघ्या ३ मिनिटांत विक्री पूर्ण झाली.
  • जगभरात केवळ १०० युनिट्स मर्यादित असलेल्या या खास व्हेरिएंटसाठी युरोप, अमेरिका आणि आशियामध्ये टप्प्याटप्प्याने यशस्वी ऑनलाइन विक्री पार पडली.
  • या बाइकमध्ये ग्लॉस जेट ब्लॅक रंगासोबत इंधन टाकीवर स्पेशल क्रमांक, गोल्ड लीफ स्ट्राइप आणि स्वाक्षरीयुक्त स्केच आर्टवर्क देण्यात आले आहे.

रॉयल एनफील्डने १५ जुलै २०२६ रोजी लाँच केलेल्या Shotgun 650 Limited Edition बाइकला भारतीय ग्राहकांकडून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आहे. भारतीय बाजारासाठी निश्चित करण्यात आलेली सर्व २५ वाहने बुकिंग सुरू झाल्यानंतर अवघ्या ३ मिनिटांत सोल्ड आऊट  झाली आहेत. ही बुकिंग प्रक्रिया रॉयल एनफील्डच्या अधिकृत अ‍ॅप आणि वेबसाइटवर पार पडली.

कंपनीने प्रसिद्ध ‘रफ क्राफ्ट्स’ कस्टम बिल्डरच्या सहकार्याने ही खास बाइक तयार केली आहे. जगभरात या व्हेरिएंटच्या फक्त १०० युनिट्सची विक्री केली जाणार असून, त्यापैकी २५ युनिट्स भारतीय बाजारासाठी राखीव ठेवण्यात आले होते. या बाइकची भारतातील एक्स-शोरूम किंमत ५.७५ लाख रुपये ठेवण्यात आली आहे.

जागतिक स्तरावर प्रचंड उत्सुकता रॉयल एनफील्डने दिलेल्या माहितीनुसार, या १०० खास बाइक्स खरेदी करण्यासाठी जगभरातून ९,००० हून अधिक बाइकप्रेमींनी नोंदणी केली होती. या विक्रीत सहभागी होण्यासाठी ग्राहकांना १५ जुलै २०२६ ते ३० जुलै २०२६ दरम्यान कंपनीच्या अ‍ॅप किंवा वेबसाइटवरील ‘ड्रॉप झोन’मध्ये नोंदणी करणे कंपल्सरी करण्यात आले होते.

Royal Enfield Interceptor 650 vs Continental GT 650: एकाच इंजिनचे दोन वेगवेगळे अवतार! कोण आहे कोणापेक्षा वरचढ?

जगभरात टप्प्याटप्प्याने २७ ते ३० जुलै दरम्यान ही ऑनलाइन विक्री पार पडली,

  • २७ जुलै २०२६: युरोप, मध्य पूर्व आणि आफ्रिका- २५ युनिट्स
  • २८ जुलै २०२६: अमेरिका- २५ युनिट्स
  • २९ जुलै २०२६: आशिया-पॅसिफिक – २५ युनिट्स
  • ३० जुलै २०२६: भारत- २५ युनिट्स
रॉयल एनफील्ड शॉटगन ६५० X रफ क्राफ्ट्स: काय आहे खास?

‘कॅलिबर रॉयल’ या कस्टम मोटरसायकलवर आधारित असलेल्या या स्पेशल एडिशनचे उद्घाटन  EICMA 2025 मध्ये करण्यात आले होते. त्यानंतर गोव्यात पार पडलेल्या ‘मोटोव्हर्स २०२५’ मध्येही ही बाइक प्रदर्शित करण्यात आली होती.

रॉयल एनफिल्डचा जलवा! पहिल्या तिमाहीत पुन्हा ओलांडला ३ लाख विक्रीचा टप्पा; 350cc बाईक्सचा दबदबा कायम

आकर्षक डिझाइन आणि प्रीमियम फीचर्स,

  • कलर थीम: या बाइकला ग्लॉस जेट ब्लॅक आणि मॅट स्टेल्थ ब्लॅक या ड्युअल-टोन रंगाचा आकर्षक लुक देण्यात आला आहे. यासोबतच बॉडी पॅनेलवर गोल्ड लीफ स्टाईल पट्टी आणि राखाडी रंगाचे शेडिंग देण्यात आले आहे.
  • लिमिटेड एडिशन नंबर: बाइकच्या पेट्रोल टाकीवर या स्पेशल एडिशनचा खास नंबर आणि एक पितळेचे कोलॅबोरेशन बॅज देण्यात आला आहे.
याशिवाय, ब्लॅक बार-एंड मिरर्स, क्विल्टेड लेदर सीट्स, कॉन्ट्रास्ट-कट अलॉय व्हील्स आणि गोल्ड फॉर्क इनर ट्युब्स यांमुळे बाइकला अधिक प्रीमियम आणि स्पोर्टी लुक मिळतो.

या बाइकच्या खरेदीदारांना ‘रफ क्राफ्ट्स’चे संस्थापक विन्स्टन येह यांची स्वाक्षरी असलेले आणि क्रमांकासह दिलेले ‘कॅलिबर रॉयल’चे गोल्ड-ऑन-ब्लॅक स्केच आर्टवर्क भेट म्हणून दिले जाणार आहे.

Web Title: Royal enfield shotgun 650 limited edition sold out in 3 minutes auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 31, 2026 | 05:39 PM

Topics:  

  • automobile
  • Bikes
  • royal enfield

संबंधित बातम्या

सणासुदीच्या सीझनमध्ये येणार 7 नवीन कार; SUV, EVपासून CNG मॉडेलपर्यंत पर्याय! पाहा कोणकोणत्या असतील
1

सणासुदीच्या सीझनमध्ये येणार 7 नवीन कार; SUV, EVपासून CNG मॉडेलपर्यंत पर्याय! पाहा कोणकोणत्या असतील

घरातील कोणती उपकरणे जास्त वीज वापरतात? आयर्न, ओव्हनपासून एअर फ्रायरपर्यंत जाणून घ्या
2

घरातील कोणती उपकरणे जास्त वीज वापरतात? आयर्न, ओव्हनपासून एअर फ्रायरपर्यंत जाणून घ्या

टाटा सिएरा Legend Series लाँच! किंमत ₹11.99 लाखांपासून; मिळणार प्रीमियम फीचर्स
3

टाटा सिएरा Legend Series लाँच! किंमत ₹11.99 लाखांपासून; मिळणार प्रीमियम फीचर्स

2026 TVS Ronin vs Royal Enfield Hunter 350: किंमत, फीचर्स आणि इंजिनमध्ये कोण ठरेल रावडी रापचिक बाईक? जाणून घ्या
4

2026 TVS Ronin vs Royal Enfield Hunter 350: किंमत, फीचर्स आणि इंजिनमध्ये कोण ठरेल रावडी रापचिक बाईक? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.