रॉयल एनफील्डने आर्थिक वर्ष २०२७ च्या पहिल्या तिमाहीत (एप्रिल ते जून २०२६) उत्तम कामगिरी करत ३,०१,१७४ दुचाकींची विक्री केली आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत झालेल्या २,२८,७७९ युनिट्सच्या विक्रीच्या तुलनेत यंदा ३२ टक्क्यांची मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे. कंपनीच्या इतिहासातील ही दुसरी सर्वात मोठी तिमाही विक्री ठरली असून, याआधी ऑक्टोबर ते डिसेंबर २०२५ दरम्यान ३,००,४२६ युनिट्सची विक्री झाली होती.
बाईकची सीट मॉडीफाय करायची आहे? या आहेत काही बेस्ट आयडिया आणि जरुरी गोष्टी
३५० सीसी सेगमेंटवर ५० टक्क्यांहून अधिक वर्चस्व
कंपनीच्या एकूण विक्रीत ३५० सीसी इंजिन असलेल्या दुचाकींचा वाटा सर्वाधिक म्हणजेच तब्बल ९३ टक्के राहिला आहे. क्लासिक ३५०, बुलेट ३५०, हंटर ३५० आणि मिटिओर ३५० या चार मॉडेल्सची मिळून २,८०,१३६ युनिट्स विक्री झाली. यासह संपूर्ण देशातील ३५० सीसी बाइक सेगमेंटमध्ये रॉयल एनफील्डने ८५ टक्के बाजारावर कब्जा मिळवला आहे. याच सेगमेंटमध्ये बजाज ऑटो ७ टक्के म्हणजे २३,८४४ युनिट्स, होंडा ६ टक्के म्हणजे १८,२४८ युनिट्स आणि टीव्हीएस मोटार उर्वरित २ टक्के बाजारासह खूप मागे राहिल्या आहेत.
४५० सीसी आणि मध्यम वजनाच्या बाइक्समध्येही अग्रस्थान
३५० ते ५०० सीसी श्रेणीमध्ये देखील रॉयल एनफील्डचे वर्चस्व कायम आहे. कंपनीच्या गुरिल्ला ४५० आणि हिमालयन ४५० या दोन बाइक्सची मिळून ९,८८३ युनिट्स विक्री झाली असून गेल्या वर्षीच्या तुलनेत यात २५ टक्क्यांची वाढ झाली आहे. या श्रेणीतील एकूण विक्रीत या दोन बाइक्सचा ५९ टक्के वाटा आहे. तसेच ५०० ते ८०० सीसी सेगमेंटमध्ये ११,१५५ बाइक्सची विक्री झाली असून, या श्रेणीमध्ये वार्षिक विक्रीत ९ टक्क्यांची घसरण झाली असली तरी ९७ टक्के बाजारावर रॉयल एनफील्डचेच नियंत्रण आहे, असे म्हणायला हरकत नाही.
गाडी चालवताना बॅटरी नेमकी कशी चार्ज होते? जाणून घ्या सोप्या भाषेत
नवीन वार्षिक विक्रमाकडे वाटचाल
एप्रिल ते जून या तिमाहीतील कामगिरी पाहता रॉयल एनफील्ड चालू आर्थिक वर्षात पुन्हा एकदा नवीन वार्षिक विक्रम नोंदवण्याच्या मार्गावर आहे. चालू आर्थिक वर्षात भारतातील एकूण विक्री १२ लाख युनिट्सचा टप्पा पार करेल असा अंदाज आहे, जो आर्थिक वर्ष २०२६ मधील ११,०७,३४३ युनिट्सच्या विक्रमी विक्रीला मागे टाकेल. आगामी काळात कंपनी ४५० सीसी, ६५० सीसी, ७५० सीसी आणि इलेक्ट्रिक मध्ये अनेक नवीन मॉडेल्स आणण्याच्या तयारीत आहे.






