फोटो सौजन्य: Instagram
युट्युबर आणि स्टॅन्ड अप कॉमेडियन समय रैना पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याने धनत्रयोदशीच्या दिवशी नवीन आलिशान कार खरेदी केली आहे. या कारची किंमत तब्बल एक कोटींपेक्षा जास्त आहे. चला या कार आणि त्याच्या दमदार फीचर्सबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
स्टँड-अप कॉमेडियन आणि युट्यूबर समय रैनाने धनत्रयोदशी 2025 च्या शुभ मुहूर्तवर स्वतःसाठी एक नवीन Toyota Vellfire एमपीव्ही खरेदी केली, ज्याची किंमत तब्बल 1.20 कोटी ते 1.50 कोटी रुपयांदरम्यान होती. समयने त्याच्या नवीन लक्झरी राईडचे फोटो आणि व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केले. एका फोटोमध्ये, समय रैना काळ्या वेलफायरसह हसताना दिसत आहे, तर दुसऱ्या फोटोमध्ये, त्याचे पालक देखील आनंदाने कारजवळ उभे असल्याचे दिसत आहे.
15 नाही तर 10,000 पगार असणारा व्यक्ती सुद्धा खरेदी करेल TVS Sport बाईक, असा असेल संपूर्ण हिशोब
टोयोटा वेलफायर भारतात दोन व्हेरिएंटमध्ये येते. याच्या एंट्री-लेव्हल हायब्रिड ऑटोमॅटिकची किंमत 1.38 कोटी रुपये आहे. तर याच्या टॉप व्हेरिएंटची किंमत 1.50 कोटी रुपये आहे. या दोन्ही व्हेरिएंटमध्ये हायब्रिड इंजिन आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्स (ई-सीव्हीटी) आहे.
टोयोटा वेलफायरचे इंटिरिअर दमदार आहे. त्यात रिक्लाइनिंग कॅप्टन सीट्स, मसाज फंक्शन, ऑटोमॅटिक फूटरेस्ट आणि अॅम्बियंट मूड लाइटिंग आहे, ज्यामुळे प्रत्येक प्रवास बिझनेस-क्लास अनुभव बनतो. ब्लॅक, सिल्व्हर मीका मेटॅलिक आणि नवीन पर्ल व्हाइट सारखे समृद्ध फिनिश त्याच्या प्रीमियम अपीलमध्ये भर घालतात.
टोयोटा वेलफायरमध्ये 2.5-लिटर पेट्रोल-हायब्रिड इंजिन आहे जे 190 एचपी निर्माण करते. ते ई-सीव्हीटी ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह जोडलेले आहे. मायलेजबद्दल बोलायचे झाले तर ते सुमारे 16 किमी/लीटर आहे, याचा अर्थ ते केवळ लक्झरीच नाही तर मायलेजच्या बाबतीत एक शहाणा पर्याय देखील आहे.
Diwali 2025 मध्ये Royal Enfield च्या ‘या’ 5 बाईक मार्केट गाजवणार, GST मुळे किंमत झाली स्वस्त
टोयोटा वेलफायर ही फक्त समय रैनाची आवडती गाडी नसून यापूर्वी, आमिर खान, अजय देवगण, अक्षय कुमार, कृती सेनन, कियारा अडवाणी आणि आयुष्मान खुराना यांसारख्या सेलिब्रिटींनीही ती त्यांच्या गॅरेजमध्ये जोडली आहे. म्हणूनच, या कारला बॉलीवूडची सर्वात आवडती लक्झरी एमपीव्ही म्हणून देखील ओळखले जाते.