
‘सिम्पल एनर्जी’ कंपनीने आपल्या पहिल्या फॅमिली इलेक्ट्रिक स्कूटरच्या अनावरणाची तारीख जाहीर केली आहे. ही स्कूटर २ सप्टेंबर २०२६ रोजी सादर केली जाणार असून तिचे नाव ‘सिम्पल अराईव्ह’ असण्याची शक्यता आहे. बेंगळुरूस्थित या कंपनीने आपल्या इन-हाऊस संशोधन आणि विकास कार्यक्रमांतर्गत ही स्कूटर विकसित केली आहे. दैनंदिन प्रवासासाठी अत्यंत व्यावहारिक आणि आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज अशी ही ई-स्कूटर डिझाइन करण्यात आल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.
डिझाइन आणि वैशिष्ट्ये
मार्च २०२६ मध्ये ही स्कूटर पहिल्यांदा टेस्टिंगदरम्यान रस्त्यावर दिसली होती, ज्यावरून तिच्या डिझाइनची पहिली झलक पाहायला मिळाली होती:
आकर्षक डिझाइन: ‘सिम्पल वन’च्या तुलनेत ‘सिम्पल अराईव्ह’ची रचना अधिक पारंपरिक आणि साधी ठेवली आहे.
लाइटिंग आणि बॉडी: फ्रंट ॲप्रनमध्ये LED हेडलॅम्प आणि त्यावर लहान वायझर दिसेल, तर मागील बाजूस स्लिम LED टेल लॅम्प देण्यात आला आहे.
आरामदायी राइड: रोजच्या वापरासाठी यात लांब सिंगल-पीस सीट आणि सपाट फ्लोअरबोर्ड दिला आहे, ज्यामुळे सामान ठेवणे सोपे जाईल.
हार्डवेअर: या प्रोटोटाइप मॉडेलमध्ये १२-इंच ॲलॉय व्हील्स, ट्विन रिअर शॉक ॲब्जॉर्बर्स, तसेच पुढे डिस्क ब्रेक आणि मागे ड्रम ब्रेकचे कॉम्बिनेशन पाहायला मिळाले आहे.
स्टोरेज आणि डिस्प्ले: सीटखाली दोन हाफ-फेस हेल्मेट बसतील एवढी मोठी जागा असू शकते. याशिवाय TFT इन्स्ट्रुमेंट डिस्प्ले आणि पुढे लहान स्टोरेज कंपार्टमेन्ट मिळण्याची शक्यता आहे.
Simple Energy : भारतातील पहिली ई-स्कूटर लाँच, ४०० किमी रेंज देणारी ‘ही’ स्कूटर ठरू शकते गेमचेंजर
बॅटरी, रेंज आणि स्पर्धा
कंपनीने अद्याप या स्कूटरच्या तांत्रिक तपशिलांची किंवा किमतीची अधिकृत माहिती दिलेली नाही.