Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 31 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नशिबाचा काजवा चमकला! 6 वर्षाच्या मुलाने लकी ड्रॉ मध्ये जिंकली 50 लाखांची टोयोटा फॉर्च्युनर!

अवघ्या 200 रुपयांचे कूपन आणि बक्षीस थेट 50 लाखांची टोयोटा फॉर्च्युनर! मध्य प्रदेशातील 6 वर्षांच्या मेदांशच्या नावावर लकी ड्रॉमध्ये पहिला क्रमांक लागला. विशेष म्हणजे, हे कूपन त्याच्या आजीने गरबा कार्यक्रमात खरेदी केले होते.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Oct 31, 2026 | 04:00 PM
नशिबाचा काजवा चमकला! 6 वर्षाच्या मुलाने लकी ड्रॉ मध्ये जिंकली 50 लाखांची टोयोटा फॉर्च्युनर!
Follow Us
Follow Us:
  • मध्य प्रदेशातील 6 वर्षांच्या मेदांश रायकरने 200 रुपयांच्या कूपनवर 50 लाखांची फॉर्च्युनर जिंकली.
  • मेदांशच्या आजीने वर्षभरापूर्वी गरबा कार्यक्रमात लकी ड्रॉचे कूपन खरेदी केले होते.
  • विजयाची बातमी समजताच परिसरात ढोल-ताशांच्या गजरात आनंदोत्सव आणि कुटुंबीयांकडून कारची पूजा करण्यात आली.
नशिबाचं पण कस अगदी काजव्यासारखं असत, कधी चमकेल काही सांगता येत नाही! मध्य प्रदेशातील बुरहानपूर येथे राहणाऱ्या अवघ्या 6 वर्षांच्या मेदांश रायकर या चिमुरड्याच्या बाबतीत असाच काहीसा प्रकार घडला आहे. केवळ 200 रुपयांच्या लकी ड्रॉ कूपनमुळे त्याच्या कुटुंबाला तब्बल 50 लाख रुपये किमतीची टोयोटा फॉर्च्युनर एसयूव्ही मिळाली आहे. या अनोख्या बक्षिसामुळे संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मेदांश हा बुरहानपूरमधील सीलमपुरा परिसरातील रहिवासी आहे. त्याची आजी किरण रायकर यांनी जवळपास वर्षभरापूर्वी अभापुरी येथील श्री सरकार धाममध्ये आयोजित गरबा कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी 200 रुपयांचे लकी ड्रॉ कूपन खरेदी केले होते. विशेष म्हणजे, या कूपनवर त्यांनी स्वतःचे नाव न देता आपल्या नातवाचे म्हणजेच मेदांशचे नाव नोंदवले होते.

Toyota Innova Hycross Facelift 26 नोव्हेंबरला होणार लाँच! नवीन डिझाइनसह फ्लेक्स-फ्युएल हायब्रिड मिळण्याची शक्यता

त्यानंतर 2026 मध्ये या लकी ड्रॉचा निकाल जाहीर करण्यात आला. यामध्ये पहिल्या बक्षिसासाठी मेदांश रायकर याच्या नावाची निवड झाली. त्याला सुमारे 50 लाख रुपये किमतीची टोयोटा फॉर्च्युनर मिळाली. कुटुंबाला गेल्या 2 वर्षांपासून स्वतःची कार घेण्याची इच्छा होती. पण एका छोट्याशा कूपनमुळे त्यांचे हे स्वप्न अनपेक्षितपणे पूर्ण झाले.

मेदांशच्या विजयाची बातमी समोर येताच परिसरातील नागरिकांनी आनंदोत्सव साजरा केला. ढोल-ताशांच्या गजरात त्याचे स्वागत करण्यात आले. कुटुंबीयांनी नवीन कारची पूजा करून देवाचे आभार मानले. या घटनेची सोशल मीडियावरही चर्चा सुरू झाली असून, केवळ 200 रुपयांच्या कूपनवर एवढे मोठे बक्षीस मिळाल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

दरम्यान, टोयोटा फॉर्च्युनर ही भारतातील लोकप्रिय फुल-साइज 7-सीटर एसयूव्ही आहे. तिच्या मजबूत बॉडी स्ट्रक्चर, लॅडर-फ्रेम चेसिस आणि ऑफ-रोड क्षमतेसाठी ती ओळखली जाते. या एसयूव्हीमध्ये 2.7L पेट्रोल आणि 2.8L डिझेल इंजिनचे ऑप्शन मिळतात. 4×4 ड्राइव्ह, हाय ग्राउंड क्लिअरन्स आणि प्रीमियम इंटिरियर ही तिची वैशिष्ट्ये आहेत. त्यामुळे 6 वर्षांच्या मेदांशला मिळालेली ही कार त्याच्या कुटुंबासाठी आयुष्यभर लक्षात राहणारी भेट ठरली आहे.

नवी टोयोटा फॉर्च्युनरचा डिसेंबरमध्ये होणार ग्लोबल प्रीमियर! या दमदार SUV च्या नव्या अवताराची उत्सुकता वाढली

💡 Frequently Asked Questions

प्रश्न 1: 6 वर्षांच्या मेदांश रायकरने कोणती कार जिंकली?

उत्तर: मेदांश रायकरने लकी ड्रॉमध्ये सुमारे 50 लाख रुपये किमतीची टोयोटा फॉर्च्युनर एसयूव्ही जिंकली.

प्रश्न 2: मेदांशच्या लकी ड्रॉचे कूपन कोणी खरेदी केले होते?

उत्तर: मेदांशची आजी किरण रायकर यांनी अभापुरी येथील श्री सरकार धाममध्ये आयोजित गरबा कार्यक्रमात 200 रुपयांचे कूपन खरेदी केले होते. त्यावर त्यांनी मेदांशचे नाव नोंदवले होते.

प्रश्न 3: टोयोटा फॉर्च्युनरची कोणती वैशिष्ट्ये आहेत?

उत्तर: टोयोटा फॉर्च्युनर ही 7-सीटर एसयूव्ही असून यात 2.7L पेट्रोल आणि 2.8L डिझेल इंजिनचे ऑप्शन मिळतात. मजबूत लॅडर-फ्रेम चेसिस, 4×4 ड्राइव्ह आणि ऑफ-रोड क्षमता ही तिची वैशिष्ट्ये आहेत.

Web Title: Six year old boy wins toyota fortuner lucky draw 200 rupees auto news marathi ar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 31, 2026 | 04:00 PM

Topics:  

  • automobile
  • madhya pradesh
  • Toyota Fortuner

संबंधित बातम्या

बजाजचा डबल धमाका! 125cc ते 250cc मध्ये आणणार 2 नवीन बाईक ब्रँड; पल्सरपेक्षा असणार वेगळे?
1

बजाजचा डबल धमाका! 125cc ते 250cc मध्ये आणणार 2 नवीन बाईक ब्रँड; पल्सरपेक्षा असणार वेगळे?

रॉयल एनफिल्डच्या Flying Flea ची पुण्यात एन्ट्री! शहरात सुरू केले 10 सेल्स & सर्व्हिस सेंटर
2

रॉयल एनफिल्डच्या Flying Flea ची पुण्यात एन्ट्री! शहरात सुरू केले 10 सेल्स & सर्व्हिस सेंटर

हिरो डेस्टिनी 110 क्लासिक एडिशन लाँच; नवीन ड्युअल-टोन रंगांसह किंमत फक्त 76,400 रुपये!
3

हिरो डेस्टिनी 110 क्लासिक एडिशन लाँच; नवीन ड्युअल-टोन रंगांसह किंमत फक्त 76,400 रुपये!

JSW मोटर्सच्या 3 नवीन SUV भारतात येणार! कॉम्बॅट, J5 आणि V23 ची तयारी; जाणून घ्या सविस्तरपणे
4

JSW मोटर्सच्या 3 नवीन SUV भारतात येणार! कॉम्बॅट, J5 आणि V23 ची तयारी; जाणून घ्या सविस्तरपणे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.