हेलमेट तयार करणारी प्रसिद्ध कंपनी ‘स्टड्स’ने भारतीय बाजारात आपली बहुप्रतिक्षित ‘नार्डो ग्रे’ लिमिटेड एडिशन सिरीज लाँच केली आहे. ही खास एडिशन कंपनीच्या सात प्रमुख हेलमेट मॉडेल्समध्ये उपलब्ध करून देण्यात आली असून, यात ग्लॉस आणि मॅट असे दोन्ही फिनिश ऑप्शन्स मिळतात. भारताच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून या सिरीजचे फक्त १,९४७ युनिट्स उत्पादित करण्यात आले आहेत. हे हेलमेट्स सध्या देशभरातील स्टड्सच्या अधिकृत डीलर्सकडे उपलब्ध असून लवकरच इतर रिटेल आऊटलेट्सवरही विक्रीसाठी उपलब्ध होतील.
नार्डो ग्रे रंगामागील इतिहास आणि महत्त्व
‘नार्डो ग्रे’ या रंगाची प्रेरणा दक्षिण इटलीमधील ‘नार्डो रिंग‘ या हाय-स्पीड टेस्ट ट्रॅकवरून घेण्यात आली आहे. हा रंग सर्वात पहिल्यांदा प्रसिद्ध ‘ऑडी आर८’ कारमध्ये वापरण्यात आला होता आणि पाहता पाहता तो युरोपियन परफॉर्मन्स कार कल्चरची ओळख बनला.
स्वातंत्र्यदिनानिमित्त हा रंग सादर करण्यामागे एक विशेष कारण आहे. ‘ग्रे’ हा रंग भारतीय संरक्षण दलांचा ऑपरेशनल रंग मानला जातो. त्यामुळे सैनिकांचे शौर्य आणि शिस्त यांना सन्मान देण्यासाठी कंपनीने ही विशेष एडिशन बाजारात आणली आहे.
ॲम्बेसेडर, जिप्सी ते महिंद्रा स्कॉर्पिओ! सैन्याची ताकद बनलेल्या ‘या’ स्वदेशी गाड्यांची रंजक गोष्ट
कंपनीचे संचालक काय म्हणाले?
या लाँचप्रसंगी बोलताना स्टड्स ॲक्सेसरीज लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक सिद्धार्थ भूषण खुराणा म्हणाले “आमचे सशस्त्र दल ताकद, शिस्त आणि कणखरतेचे उत्तम उदाहरण आहे. ‘#TheColourOfHonour’ च्या माध्यमातून आम्हाला हेच विचार सामान्य रायडर्सपर्यंत पोहोचवायचे होते. नार्डो ग्रे रेंज ही आपल्या सैनिकांच्या टॅक्टिकल एस्थेटिक्सला दिलेली एक श्रद्धांजली आहे आणि भारतातील प्रत्येक दुचाकीस्वाराला जागतिक दर्जाची सुरक्षा देण्याची आमची वचनबद्धता आहे.”
‘नार्डो ग्रे‘ सिरीजमधील हेलमेट्स आणि सेफ्टी फीचर्स
कंपनीने ही लिमिटेड एडिशन खालील सात प्रमुख मॉडेल्समध्ये उपलब्ध केली आहे:
सुरक्षा आणि वैशिष्ट्ये
ही सिरीज स्टड्सच्या “#TheColourOfHonour” या डिजिटल मोहिमेचा एक भाग आहे, जी इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूबवर चालवली जात आहे. या मोहिमेअंतर्गत बिहार ते नेपाळ प्रवास करणाऱ्या रायडर्सच्या एका ग्रुपलाही पाठिंबा दिला जात आहे.
तसेच, स्टड्सने अलीकडेच भारतीय बाजारात ट्रूपर ट्रेल- ₹२,१२५ आणि ट्रूपर लेगसी शिल्ड- ₹२,४२५ हे हेलमेट्स लाँच केले होते. यासोबतच हेलिओस इफेक्ट हे फुल-फेस हेलमेट ₹३,४४५ मध्ये सादर करण्यात आले आहे.

