Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 21 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Car Care Tips: उन्हाच्या तडाख्यामुळे तुमची कार ठरू शकते ‘खर्चाचा बॉम्ब’; ही छोटी चूक पडेल महागात, जाणून घ्या महत्त्वाच्या टिप्स

उन्हाळ्यात कार उन्हात उभी केल्याने इंजिन, बॅटरी आणि पेंटचे मोठे नुकसान होऊ शकते. कारचा रंग फिका पडण्यापासून आणि दुरुस्तीचा मोठा खर्च वाचवण्यासाठी या महत्त्वाच्या टिप्स नक्की वाचा.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Apr 23, 2026 | 04:01 PM
उन्हाच्या तडाख्यामुळे तुमची कार ठरू शकते ‘खर्चाचा बॉम्ब’; ही छोटी चूक पडेल महागात (Photo Credit- X)

उन्हाच्या तडाख्यामुळे तुमची कार ठरू शकते ‘खर्चाचा बॉम्ब’; ही छोटी चूक पडेल महागात (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

  • उन्हाच्या तडाख्यामुळे तुमची कार ठरू शकते ‘खर्चाचा बॉम्ब’
  • ही छोटी चूक पडेल महागात
  • जाणून घ्या महत्त्वाच्या टिप्स
Summer Car Care Tips: सध्या राज्यासह देशभरात उन्हाचा कडाका वाढला असून पारा 40 अंशांच्या पार गेला आहे. अशा परिस्थितीत माणसांप्रमाणेच तुमच्या लाडक्या वाहनांनाही उन्हाचा मोठा फटका बसत आहे. पार्किंगसाठी शेड किंवा बेसमेंटची सुविधा नसल्यास अनेकदा आपण कार उन्हात उभी करतो, मात्र ही छोटीशी निष्काळजी तुमच्या खिशाला मोठी कात्री लावू शकते. अवघ्या काही मिनिटांत कारचे केबिन गरम झाल्यामुळे त्याचा परिणाम केवळ आरोग्यावरच नाही, तर गाडीच्या कार्यक्षमतेवरही होतो.

कार बनतेय ‘हीट बॉक्स’

ऑटोमोबाईल तज्ज्ञांच्या मते, प्रखर उन्हात उभी केलेली कार एखाद्या ‘हीट बॉक्स’प्रमाणे काम करते. बाहेरील तापमान कितीही असले, तरी बंद कारच्या आतील तापमान त्यापेक्षा 20 ते 30 अंश सेल्सिअसने अधिक वाढू शकते. या अतिउष्णतेमुळे कारचे इंटिरिअर, आधुनिक इलेक्ट्रॉनिक सिस्टिम आणि इंजिनमधील नाजूक भागांवर प्रचंड ताण येतो, ज्यामुळे तांत्रिक बिघाड होण्याची शक्यता वाढते.

बाह्य सौंदर्यावर उन्हाचा घाला

दीर्घकाळ उन्हात उभ्या राहणाऱ्या कारच्या बाह्य भागावर (Exterior) गंभीर परिणाम होतात. सूर्याच्या प्रखर अल्ट्राव्हायोलेट (UV) किरणांमुळे कारच्या पेंटचे थरांचे नुकसान होते. परिणामी, कारचा मूळ रंग फिका पडू लागतो आणि तिची चमक नाहीशी होते. अनेकदा पेंटचा वरचा संरक्षक थर (Clear Coat) निघून गेल्यामुळे नवीन गाडीही जुनी आणि निस्तेज दिसू लागते.

नवीन कार घ्यायचा विचार करताय? थोडं थांबा ! 2026 मध्ये लाँच होत आहेत 5 जबरदस्त कार

इंटिरिअरचे सर्वाधिक नुकसान

कारमधील डॅशबोर्ड सामान्यतः प्लास्टिक किंवा विनाइलचा बनलेला असतो. अतिउष्णतेमुळे हा भाग कोरडा पडतो आणि त्याला तडे (Cracks) जाऊ लागतात. लेदर सीट्स कडक होऊन फाटण्याची भीती असते, तर फॅब्रिक सीट्सचा रंग उडतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, उन्हात बंद असलेल्या कारमध्ये प्लास्टिकमधून निघणाऱ्या उत्सर्जनामुळे हवा विषारी आणि दमघोंटू होऊ शकते, जी श्वसनासाठी अत्यंत घातक ठरते.

बॅटरी आणि इंजिनच्या आयुष्यावर परिणाम

वाढत्या तापमानाचा थेट फटका कारच्या बॅटरीला बसतो. उष्णतेमुळे बॅटरीमधील द्रव पदार्थांचे बाष्पीभवन वेगाने होते, ज्यामुळे बॅटरीचे आयुष्य घटते. याव्यतिरिक्त, इंजिन ऑईल आणि कूलंटच्या कार्यक्षमतेवरही परिणाम होतो. रबरपासून बनवलेले भाग जसे की, वायपर ब्लेड्स, डोअर सील आणि टायर उन्हात कडक होऊन लवकर निकामी होतात.

कार आणि पैसे कसे वाचवाल?

तुमची कार दीर्घकाळ सुरक्षित आणि नवीन ठेवायची असेल, तर पार्किंगसाठी नेहमी सावलीची जागा निवडा किंवा कार कव्हरचा वापर करा. जर उन्हात पार्किंग करणे अनिवार्य असेल, तर खिडक्या थोड्या उघड्या ठेवा जेणेकरून गरम हवा बाहेर पडेल. ही छोटीशी खबरदारी तुम्हाला भविष्यातील हजारो रुपयांच्या दुरुस्ती खर्चापासून वाचवू शकते.

हिरो बनण्याच्या नावाखाली कारमध्ये ‘हे’ बदल कराल तर हमखास रद्द होईल RC, जाणून घ्या RTO चे नियम

Web Title: Summer car care tips how to protect your car from extreme heat marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 23, 2026 | 04:01 PM

Topics:  

  • automobile
  • Car
  • car care tips

संबंधित बातम्या

China नंतर आता भारत बनणार जगाचा नवा ‘ऑटो हब’? Tata Technologies चा मोठा दावा
1

China नंतर आता भारत बनणार जगाचा नवा ‘ऑटो हब’? Tata Technologies चा मोठा दावा

Car Stuck in Water: पाण्यात कार बंद पडलीये? घाबरू नका! ‘या’ ५ गोष्टी लक्षात ठेवा
2

Car Stuck in Water: पाण्यात कार बंद पडलीये? घाबरू नका! ‘या’ ५ गोष्टी लक्षात ठेवा

Jeep ची गोल्डन ऑफर! जॉर्ज वॉशिंगटन नाव असणाऱ्यांना मोफत मिळणार Wrangler SUV… ही आहे अट
3

Jeep ची गोल्डन ऑफर! जॉर्ज वॉशिंगटन नाव असणाऱ्यांना मोफत मिळणार Wrangler SUV… ही आहे अट

‘हे’ टॉप ५ मराठी  स्टार्स चालवतात करोडोंच्या आलिशान गाड्या! जाणून घ्या
4

‘हे’ टॉप ५ मराठी स्टार्स चालवतात करोडोंच्या आलिशान गाड्या! जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.