
फोटो सौजन्य: Gemini
Kawasaki च्या ‘या’ बाईक्स वर छपरफ़ाड डिस्काउंट, कोणत्या मॉडेलवर किती डिस्काउंट? जाणून घ्या
2026 Hayabusa Special Edition चे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याचे ब्लू-व्हाईट कलर थीम. हे डिझाइन सुजुकीच्या रेसिंग बाईक्सपासून प्रेरित असून सुपरबाइक वर्ल्डमध्ये त्यांना विशेष ओळख मिळते. फ्युअल टँकवर दिलेले Special Edition badge, ब्लॅक 3D Suzuki लेटरिंगसह येते. ड्युअल-शेड पेंट, शार्प बॉडी लाइन्स आणि मोठा फ्रेम यामुळे बाईक पूर्वीपेक्षा अधिक आकर्षक दिसते. एकूणच, हे अपडेट्स स्पष्ट करतात की ही एक साधी बाईक नसून सुपरस्पोर्ट प्रेमींसाठी खास तयार केलेला एडिशन आहे.
2026 Suzuki Hayabusa Special Edition मध्ये तांत्रिकदृष्ट्या अनेक सुधारणांचा समावेश करण्यात आला आहे. यात राइडिंग अनुभव आणि परफॉर्मन्स अधिक चांगला करण्यावर विशेष भर आहे. एक्झॉस्ट सिस्टम जुन्या मॉडेलप्रमाणे ट्विन स्टेनलेस-स्टील सायलेंसरसह येते, पण यावेळी ब्लॅक अॅनोडाइज्ड एंड कॅप्स आणि ब्लॅक हीट शील्ड्स देण्यात आले आहेत, ज्यामुळे लुक अधिक स्पोर्टी दिसतो.
ग्राहकांनी फिरवली ‘या’ 10 गाड्यांकडे पाठ! ऑक्टोबरमध्ये 0 विक्री, यादी पाहून धक्काच बसेल
नवीन अपडेट्सनुसार या बाईकमध्ये आता क्रूज कंट्रोल देण्यात आले आहे, जो गिअर बदलल्यानंतरही सक्रिय राहतो. रीट्यून थ्रॉटल मॅपमुळे लो-एंड टॉर्क अधिक सुधारला आहे. अपडेटेड लाँच कंट्रोल सिस्टम जलद आणि स्थिर स्टार्ट देते. या बाईकमध्ये लिथियम-आयन बॅटरी वापरली आहे, जी आधीच्या बॅटरीपेक्षा हलकी असल्याने वजन कमी करण्यास मदत करते.
किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास 2026 Hayabusa Special Edition ची आंतरराष्ट्रीय किंमत 18,999 यूरो (सुमारे 22.15 लाख रुपये) ठेवण्यात आली आहे. स्टँडर्ड मॉडेलची किंमत 18,599 यूरो (सुमारे 21.67 लाख रुपये) आहे. सध्या भारतात उपलब्ध Hayabusa ची एक्स-शोरूम किंमत 18.06 लाख रुपये आहे.असा अंदाज व्यक्त केला जात आहे की, भारतात 2026 चा स्टँडर्ड मॉडेल पुढील वर्षाच्या सुरुवातीला लाँच केला जाऊ शकतो आणि त्याच्या किंमतीत जवळपास 30,000 रुपयांपर्यंत वाढ होऊ शकते.