Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जर्मनीच्या कृषी तंत्रज्ञान प्रदर्शनात भारतीय कंपनीचा डंका! सादर केले इलेक्ट्रिक आणि हायब्रीड ट्रॅक्टर्स

जर्मनीतील अ‍ॅग्रीटेक्निया 2025 या जागतिक कृषी-तंत्रज्ञान प्रदर्शनात “ट्रॅक्टर ऑफ द इयर”च्या अंतिम फेरीत TAFE च्या EV ट्रॅक्टर्सची वर्णी लागली आहे. चला याबद्दल जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Nov 11, 2025 | 05:29 PM
जर्मनीच्या कृषी तंत्रज्ञान प्रदर्शनात भारतीय कंपनीचा डंका!

जर्मनीच्या कृषी तंत्रज्ञान प्रदर्शनात भारतीय कंपनीचा डंका!

Follow Us
Follow Us:
  • जर्मनीत अ‍ॅग्रीटेक्निया 2025 या जागतिक कृषी-तंत्रज्ञान प्रदर्शन
  • “ट्रॅक्टर ऑफ द इयर”च्या अंतिम फेरीत TAFE च्या EV ट्रॅक्टर्सची वर्णी
  • भारतीय कंपनी TAFE-Tractors and Farm Equipment Ltd. ने सादर केले दमदार ट्रॅक्टर्स
जर्मनीतील अ‍ॅग्रीटेक्निया 2025 या जागतिक कृषी-तंत्रज्ञान प्रदर्शनात भारतीय कंपनी TAFE-Tractors and Farm Equipment Ltd. ने आपल्या अत्याधुनिक इलेक्ट्रिक आणि हायब्रिड ट्रॅक्टर्सचे दमदार प्रदर्शन केले. कंपनीचा TAFE EV28 हा इलेक्ट्रिक ट्रॅक्टर “ट्रॅक्टर ऑफ द इयर (TOTY) 2026” च्या सस्टेनेबल कॅटेगरीमध्ये अंतिम टप्प्यात पोहोचला असून, हा टॉप 5 स्पर्धकांपैकी एक ठरला आहे.

याच कार्यक्रमात TAFE ने पुढील पिढीचा हायब्रिड ट्रॅक्टर EVX75 चे अनावरण केले. EVX75 मध्ये 75 HP हायब्रिड पावरट्रेन, EU Stage-V डिझेल इंजिन आणि 400V इलेक्ट्रिक बॅटरी सिस्टम देण्यात आली आहे. हे मॉडेल शून्य उत्सर्जन मोडमध्ये चालू शकते आणि इंधन कार्यक्षमतेसह ऑपरेशन खर्चात बचत करण्याची क्षमता ठेवते.

TAFE ने 100 HP युटिलिटी, 65 HP कॉम्पॅक्ट आणि 74 HP फळ-बागायती विभागांसाठी तीन नवीन ट्रॅक्टर श्रेणीही दाखवल्या. यात TAFE 1015 (100+ HP), TAFE 6065 (65 HP) आणि TAFE 7515 GE (74 HP, ऑर्चर्ड ट्रॅक्टर) यांचा समावेश आहे.

आमच्या राज्यात प्लांट उभारा! ‘या’ राज्याच्या सरकारने Tesla दिले आमंत्रण, पूर्ण सहयोगाची दिली हमी

कंपनीचे उपाध्यक्ष डॉ. लक्ष्मी वेणू यांनी सांगितले की TAFE ने गेल्या 65 वर्षांत गुणवत्ता, अभियांत्रिकी कौशल्य आणि विश्वासार्हतेच्या बळावर जागतिक स्तरावर मजबूत स्थान निर्माण केले आहे. तर, अध्यक्षा मल्लिका श्रीनिवासन यांनी सब-100 HP श्रेणीत जागतिक नेतृत्व मिळवण्याच्या TAFE च्या धोरणावर भर देत, अ‍ॅग्रीटेक, ऑटोमेशन, इलेक्ट्रिफिकेशन आणि पर्यायी ऊर्जा तंत्रज्ञानात मोठ्या गुंतवणुकीची माहिती दिली.

TAFE च्या Terra 2.0 या मार्गदर्शन प्रणाली आणि Terra Vista या डिजिटल प्लॅटफॉर्मचेही प्रदर्शन करण्यात आले, जे स्मार्ट आणि परवडणारे शेती-तंत्रज्ञान उपाय उपलब्ध करून देतात.

अखेर दिवस ठरला! Maruti E-Vitara ‘या’ दिवशी भारतात लाँच होण्यास सज्ज, Windsor आणि Curvv ला मिळणार जोरदार टक्कर

TAFE ची स्थापना 1960 मध्ये चेन्नई येथे झाली असून, कंपनी दरवर्षी 200,000 हून अधिक ट्रॅक्टर्सची जागतिक विक्री करते. 2023 पासून कंपनीने EU Stage V, इलेक्ट्रिक आणि हायड्रोजन संकल्पना ट्रॅक्टर्ससह युरोपियन बाजारपेठेत दमदार प्रवेश केला आहे. TAFE चे दोन मॉडेल्स, TAFE 7515 CAB (TOTY 2025 Utility Finalist) आणि EV28 (TOTY 2026 Finalist) जागतिक शेतकऱ्यांसाठी उच्च गुणवत्ता, कार्यक्षमता आणि भविष्यकालीन उपाययोजनांची खात्री देतात.

Web Title: Tafe ev28 tracktor in final of tracktor of the year in agritechnica 2025 in germany

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 11, 2025 | 05:29 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • Germany

संबंधित बातम्या

लहान डोक्याच्या लोकांसाठी स्पेशल हेल्मेट लॉंच! फक्त ₹1,395 मध्ये घ्या Studds Raider Youth चे Looney Tunes एडिशन हेल्मेट
1

लहान डोक्याच्या लोकांसाठी स्पेशल हेल्मेट लॉंच! फक्त ₹1,395 मध्ये घ्या Studds Raider Youth चे Looney Tunes एडिशन हेल्मेट

रेंज रोव्हर स्पोर्टचा इलेक्ट्रिक अवतार पाहिलात का? 609 km रेंज, 550 PS पॉवरसह जबरदस्त एन्ट्री
2

रेंज रोव्हर स्पोर्टचा इलेक्ट्रिक अवतार पाहिलात का? 609 km रेंज, 550 PS पॉवरसह जबरदस्त एन्ट्री

बजाज चेतकची ‘Festive Five’ ऑफर; 0% व्याज, ₹1,00,000 पर्यंत कॅशबॅकसह मिळणार 5 फायदे!
3

बजाज चेतकची ‘Festive Five’ ऑफर; 0% व्याज, ₹1,00,000 पर्यंत कॅशबॅकसह मिळणार 5 फायदे!

मर्सिडीज-बेंझ GLC इलेक्ट्रिक 4 नोव्हेंबरला होणार भारतात लाँच; 715 km रेंजसह येणार ही लक्झरी SUV कार!
4

मर्सिडीज-बेंझ GLC इलेक्ट्रिक 4 नोव्हेंबरला होणार भारतात लाँच; 715 km रेंजसह येणार ही लक्झरी SUV कार!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.