Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘पुन्हा तोच सागर, पुन्हा त्याच लाटा’ने रंगली कवितांची मैफल! नभांत नाट्य संस्थेच्या ‘अक्षर अक्षर तुझेच आहे’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

नभांत नाट्य संस्था, तासगाव आयोजित ‘अक्षर अक्षर तुझेच आहे’ या कवितांच्या मैफलीला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अविनाश काठवटे यांच्या ‘पुन्हा तोच सागर, पुन्हा त्याच लाटा’ने कार्यक्रमाची सुरेल सुरुवात झाली.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Oct 07, 2026 | 09:03 PM
‘पुन्हा तोच सागर, पुन्हा त्याच लाटा’ने रंगली कवितांची मैफल! नभांत नाट्य संस्थेच्या ‘अक्षर अक्षर तुझेच आहे’ला उत्स्फूर्त प्रतिसाद
Follow Us
Follow Us:
  • तासगावमध्ये रंगलेल्या कवितांच्या मैफलीला सांगली, सातारा आणि कोल्हापूरमधील रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
  • ‘पुन्हा तोच सागर, पुन्हा त्याच लाटा’ या कवितेने कार्यक्रमाची भावपूर्ण सुरुवात केली.
  • प्रेम, विरह, आठवणी आणि नात्यांच्या भावनांचा काव्यात्मक आविष्कार रसिकांसाठी विशेष आकर्षण ठरला.
तासगाव (सांगली) : शब्द, भावना आणि कवितेच्या सुगम सुरांनी तासगाव शहरातील साने गुरुजी नाट्यगृह याक्षणी अक्षरशः भारावून गेले. ३ ऑक्टोबर रोजी पार पडलेल्या नभांत नाट्य संस्था, तासगाव यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘अक्षर अक्षर तुझेच आहे’ या स्वरचित कवितांच्या बहारदार मैफलीला तासगाव शहरासह सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील रसिक प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. प्रेम आणि नात्यांमधील विविध छटा कवितांच्या माध्यमातून अनुभवताना रसिक अगदी मंत्रमुग्ध झाले.

‘पुन्हा तोच सागर, पुन्हा त्याच लाटा’ने सुरुवात

या अविस्मरणीय-अभूतपूर्व अशा मैफलीची सुरुवात प्रसिद्ध ‘पुन्हा तोच सागर, पुन्हा त्याच लाटा’ या कवितेने झाली. कवी आणि गायक अविनाश काठवटे यांच्या सादरीकरणाने कार्यक्रमाला सुरुवातीलाच भावनिक उंची मिळाली. त्यांच्या आवाजातील भावपूर्ण सादरीकरण आणि कवितेतील आशय यामुळे उपस्थित रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली. नाट्यगृहातील वातावरण काही क्षणांतच कवितेच्या भावविश्वात रंगून गेले.

साताऱ्याच्या शिलेदारांचा सन्मान! आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदकविजेत्यांची भव्य गौरव रॅली; साहिल, ऋतुजा अन् सुदेष्णाचा भव्य सत्कार

नऊ रसांमधील प्रेमभावनांचा सुरेल आविष्कार

कार्यक्रमात कवी अपूर्व राजपूत, सारंग पंपटवार आणि नैनेश तांबे यांनीही

 

आपल्या स्वरचित कवितांचे प्रभावी सादरीकरण केले. मानवी मनातील प्रेम, विरह, आनंद, आठवणी आणि नात्यांमधील हळवे क्षण अशा विविध भावनांना कवितांमधून सुंदर शब्दरूप देण्यात आले. नऊ रसांमधील प्रेमभावनांचा हा काव्यात्मक आविष्कार रसिकांसाठी विशेष आकर्षण ठरला. प्रत्येक कवितेनंतर मिळणारी टाळ्यांची दाद कलाकारांचा उत्साह वाढवत होती.

तीन जिल्ह्यांमधून रसिकांची उपस्थिती

‘अक्षर अक्षर तुझेच आहे’ या कार्यक्रमासाठी सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातूनही मोठ्या संख्येने रसिक तासगावमध्ये दाखल झाले होते. तासगाव नगरपरिषदेच्या विद्यमान नगराध्यक्षा विजयाताई पाटील, उपनगराध्यक्ष प्रसाद भैय्या पैलवान, तसेच बाबासो पाटील आणि किशोर गायकवाड यांचीही उपस्थिती होती.

Kolhapur : कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर नवरात्रासाठी सज्ज; स्वच्छता मोहिमेला सुरुवात

नभांत नाट्य संस्थेच्या टीमचे नियोजन

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नभांत नाट्य संस्थेचे पियुष मिर्लेकर, सई येडेकर, प्रतिक गोसावी, श्रीकुमार माळी, ओमकार वजरिणकर, चैतन्य कदम, अंकित स्वामी, गायत्री नांदवडेकर, प्रतिक मिर्लेकर, अभिषेक माळी, अथर्व जोशी आणि गणेश इंगवले यांनी नियोजनबद्ध मेहनत घेतली. तसेच डॉ. प्रतिक जाधव, आनंदबाबू औताडे, अभिजीत पवार, सुधीर पाटील, चेतन माळी, सागर जगताप, आयुब येणापुरे, राणा दादा उर्फ आदित्य पवार, राहुल चव्हाण आणि विघ्नहर्ता नाश्ता सेंटरचे रोहितकुमार मोरे यांचे सहकार्य लाभले. उत्कृष्ट कविता, भावपूर्ण सादरीकरण आणि टीमच्या नियोजनामुळे ‘अक्षर अक्षर तुझेच आहे’ ही मैफल तासगावच्या सांस्कृतिक विश्वात लक्षात राहणारा अनुभव ठरली.

Web Title: Tasgaon marathi poetry event akshar akshar tujhech aahe ar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 07, 2026 | 09:03 PM

Topics:  

  • LIFESTYLE

संबंधित बातम्या

Good Morning Quotes: सकाळची सुरुवात करा गोड शब्दांनी! नातेवाईक आणि प्रियजानांना पाठवा ‘शुभ सकाळ’ मराठी सुविचार
1

Good Morning Quotes: सकाळची सुरुवात करा गोड शब्दांनी! नातेवाईक आणि प्रियजानांना पाठवा ‘शुभ सकाळ’ मराठी सुविचार

फोन उचलताच आपण ‘हॅलो’ का म्हणतो? या एका शब्दामागे आहे रंजक इतिहास! जाणून घ्या
2

फोन उचलताच आपण ‘हॅलो’ का म्हणतो? या एका शब्दामागे आहे रंजक इतिहास! जाणून घ्या

LGBTQ+ ची सुरुवात L नेच का होते? जाणून घ्या यामागची संघर्षमय कथा
3

LGBTQ+ ची सुरुवात L नेच का होते? जाणून घ्या यामागची संघर्षमय कथा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.