
सकाळची सुरुवात करा गोड शब्दांनी! नातेवाईक आणि प्रियजानांना पाठवा सुंदर 'शुभ सकाळ’ मराठी सुविचार
Good Morning Quotes: सकाळी उठल्यानंतर दिवसाची सुरुवात आंनद आणि उत्साहाने व्हावी, असे सगळ्यांना कायमच वाटत असते. सकारात्मक विचार, प्रेम, आनंद आणि प्रेरणादायी शब्द जीवन जगताना फायदेशीर ठरतात. दिवसाची सुरुवात आनंदी, सकारात्मक आणि प्रेरणादायी विचारांनी झाल्यास संपूर्ण दिवस चांगलाच जातो. शरीरात वाढलेला तणाव कमी करण्यासाठी चांगल्या लोकांच्या सानिध्यात राहण्यासोबतच चांगले आणि मन आनंदी करणारे विचार वाचणे किंवा ऐकणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे. दैनंदिन जीवनातील ताणतणाव, चिंता आणि नकारात्मक भावना दूर करण्यासाठी कमी करण्यासाठी चांगले विचार वाचणे आणि आत्मसात करणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे. सकाळची सुरुवात करताना हे सुविचार नक्कीच वाचा.(फोटो सौजन्य – istock)
आनंदी आणि तणावमुक्त जीवनाचं सीक्रेट; जपानी जीवनशैलीच्या ६ सवयी ठरतीय फायदेशीर
“सकाळच्या या पहिल्या किरणांसोबत, तुझ्या प्रेमाचा आशीर्वाद मिळाल्याचा अनुभव होतो, तुझ्या आठवणीने माझे दिवस सजतात. सुप्रभात!”
“आनंद नेहमी चंदनासारखा असतो, दुसऱ्यांच्या कपाळावर लावला तरी, आपलीही बोटे सुगंधित करून जातो. आपला दिवस आनंदी जावो!”
चालणारे दोन पाय किती विसंगत,
एक मागे असतो, एक पुढे असतो
पुढच्याला अभिमान नसतो
मागच्याचा अपमान नसतो,
कारण त्यांना माहित असतं,
क्षणात हे बदलणारं असतं,
याचच नाव जीवन असतं….!!!
Good Morning
हशा, प्रेम आणि सुंदर क्षणांनी भरलेल्या रविवारच्या तुम्हाला शुभेच्छा. हा दिवस तुम्हाला तुमच्या स्वप्नांच्या जवळ घेऊन जावो आणि तुम्हाला समाधानाने भरलेल्या अंतःकरणाने जावो.”
एक आस एक विसावा तुमचा
संदेश रोज दिसावा….!!
तुमची आठवण न यावी तो दिवस नसावा….!!
हृदयाच्या प्रत्येक कोपऱ्यात
तुमच्या सारख्या जिवलग
माणसांचा सहवास असावा…!!
शुभ सकाळ
आयुष्य दर दिवशी आपल्याला
नवे कोरे २४ तास देते.
त्यात आपण भुतकाळाशी
झगडत बसायचे कि
भविष्याचा विचार करत बसायचे कि
आलेला क्षण जगायचे हे आपण ठरवायचे.
Good morning
प्रकाश के देवता सूर्यनारायण
की कृपा से आपका और आपके
परिवार का जीवन सदैव प्रकाशीत
रहे…
शुभ सकाळ!!
वेळ ही बदलणारी असते चांगली
असो वा वाईट आज वाईट आहे तर
उद्या चांगली येणारच नशिबापेक्षा जास्त
आणि वेळेच्या आधी
कोणालाच काही मिळत नाही.
शुभ सकाळ!!
नाजूक पाकळ्या
किती सुंदर असतात…
रंगीत कळ्या रोजचं उमलत असतात…
नजरेत भरणारी सर्वच असतात…
पण हृदयात राहणारी तुमच्यासारखी
माणसं, फारच कमी असतात.
शुभ सकाळ.
उजेडणारी प्रत्येक सकाळ तुम्हाला
दोन पर्याय देऊन जाते
झोपून स्वप्न पाहत राहा,
किंवा उठून स्वप्नांचा पाठलाग करा.
शुभ सकाळ
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा…!
आठवडाभराचा थकवा दूर होतो, जेव्हा रविवार कुटुंबासोबत साजरा करतो. आनंदाचा जावो तुमचा आजचा दिवस!
“नवीन सकाळ तुम्हाला नवीन आनंद आणि नवी ऊर्जा देवो, तुमचा हा रविवार खूप छान जावो!”
“मैदानात हरलेला माणूस पुन्हा जिंकू शकतो, पण मनातून हरलेला माणूस कधीच जिंकू शकत नाही. शुभ सकाळ!”