
Tata Motors: टाटा कार्सची मोठी घोषणा! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
एरिससह, टाटा.कार्स पारंपारिकपणे केवळ व्यावहारिकता, कार्यक्षमता आणि मूल्यावर आधारलेल्या श्रेणीमध्ये नवीन दृष्टिकोन घेऊन येत आहे, ज्यामुळे अधिक नाविन्यता, वैयक्तिकता आणि समकालीन अनुभवासह या क्षमतांना अधिक दृढ करण्यात आले आहे. असे करत एरिसने एकाच उत्पादनाच्या माध्यमातून फ्लीट आणि वैयक्तिक ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्याच्या उद्योगामधील परंपरेला मोडून काढले आहे आणि केवळ वैयक्तिक खरेदीदारांच्या गरजा व महत्त्वाकांक्षांना प्राधान्य देऊन विशेष पर्याय सादर केला आहे.
ऑल-न्यू एरिस (Aeris) या वाहनाची सुरुवातीची किंमत श्रेणी (एक्स-शोरूम दिल्ली, लाख रुपयांमध्ये) विविध ट्रान्समिशन आणि ट्रिम पर्यायांवर आधारित निश्चित करण्यात आली आहे.
पेट्रोल मॅन्युअल (MT) ट्रान्समिशनची सुरुवात ‘स्मार्ट’ ट्रिमसाठी ५.२९ लाख रुपयांपासून होते, त्यानंतर ‘प्युअर’ ६.१४ लाख, ‘प्युअर +’ ६.७४ लाख, ‘क्रिएटिव्ह’ ७.४९ लाख आणि अव्वल दर्जाचा ‘अकम्प्लिश्ड’ ट्रिम ८.१९ लाख रुपयांना उपलब्ध आहे. ऑटोमॅटिक सुविधेची निवड करणाऱ्या ग्राहकांसाठी पेट्रोल एएमटी (AMT) पर्याय ‘प्युअर’ ट्रिमपासून सुरु होतो ज्याची किंमत ६.६९ लाख रुपये आहे, तर ‘प्युअर +’ ७.२९ लाख, ‘क्रिएटिव्ह’ ८.०४ लाख आणि ‘अकम्प्लिश्ड’ व्हेरियंट ८.७४ लाख रुपयांना मिळतो.
Toyota Hiluxचं ‘रेस्क्यू व्हॅन’मध्ये रूपांतर! अहमदाबाद अग्निशमन दलाच्या ताफ्यात नवी भर
एरिस लाँच करत टाटा मोटर्स पॅसेंजर वेईकल्स लिमिटेडचे मॅनेजिंग डायरेक्टर व सीईओ श्री. शैलेश चंद्रा म्हणाले, “सेदान कारची कालातीत अभिव्यक्ती राहिली आहे, जेथे सेदानचे निष्ठावान ग्राहक आहेत, जे आरामदायीपणा, एैसपैस जागा, ड्रायव्हिंग डायनॅमिक्स आणि व्यावहारिकता यांच्या अनोख्या संगमाला प्राधान्य देतात. एरिसच्या माध्यमातून, आम्ही विविध बॉडी स्टाईल्स आणि पॉवरट्रेन पर्यायांमध्ये अर्थपूर्ण पर्याय उपलब्ध करून देण्याचे टाटा.कार्सचे तत्त्व प्रत्यक्षात आणत आहोत.
ज्यामध्ये ग्राहकांसाठी स्टायलिश नवीन सेदान सादर केली आहे, जे आपल्या कारला आपली प्रगती, यश आणि व्यक्तिमत्त्वाचे प्रतीक मानतात. डिझाइन आणि इंजिनिअरिंगपासून तंत्रज्ञान, सुरक्षितता आणि ड्रायव्हिंग अनुभवापर्यंत प्रत्येक निर्णयात ग्राहकाला केंद्रस्थानी ठेवून एरिसची निर्मिती वैयक्तिक मालकीसाठी करण्यात आली आहे. हा एकमेव दृष्टिकोन या कारला विशिष्ट उद्देश आणि अद्वितीय ओळख देतो, तसेच ग्राहकांना एरिसची निवड करण्याचे प्रत्येक प्रबळ कारण देतो.”
दीर्घकाळापासून वैयक्तिक कॉम्पॅक्ट सेदान ग्राहकांकडे लक्ष दिले गेले नाही. या सेगमेंटमध्ये जवळपास ६५ टक्के प्रमाण असून देखील ग्राहकांना प्रामुख्याने फ्लीट वापराच्या अत्यंत वेगळ्या गरजा लक्षात घेऊन डिझाइन केलेल्या उत्पादनांमधून निवड करावी लागत होती. फ्लीट ऑपरेटर्स हे ऑपरेटिंग इकॉनॉमिक्स, टिकाऊपणा आणि अपटाइम या गोष्टींना प्राधान्य देतात, तर वैयक्तिक वापर असणाऱ्या व्यक्तींना आकर्षक डिझाइन आणि वैशिष्ट्ये असलेल्या कारची अपेक्षा असते, ज्यामधून त्यांचे यश आणि महत्त्वाकांक्षा दिसून येतील.
एरिससह टाटा.कार्स ही परंपरा मोडून काढत आहे, साध्या विश्वासाने या श्रेणीमध्ये अत्यंत आवश्यक नवीन दृष्टिकोन घेऊन येत आहे: वेगवेगळ्या गरजा असलेल्या ग्राहकांना स्वतंत्र आणि विशिष्ट पर्याय मिळाले पाहिजेत. एरिस वैयक्तिक आणि कौटुंबिक वापरासाठी कॉम्पॅक्ट सेदानला पसंती देणाऱ्या ग्राहकांकरिता डिझाइन व इंजीनिअर करण्यात आली आहे.
ई-स्कूटरच्या निर्यातीत ‘या’ कंपनीचा धुमाकूळ! TVS, Bajaj, Hero अन् Atherलाही टाकलं मागे
एरिस कधीही फ्लीट सेगमेंटमध्ये प्रवेश करणार नाही, ज्यामुळे या दोन भिन्न पर्यायांमध्ये स्पष्ट अंतर निर्माण होईल आणि एरिसला स्वतःची वेगळी व आकर्षक ओळख मिळेल. टाटा.कार्स आपल्या स्वतंत्र एक्सप्रेस-टी (Xpres-T) ब्रँडच्या माध्यमातून फ्लीटच्या गरजा पूर्ण करत राहील, ज्यामध्ये वेगळे डिझाइन आणि वेगळी उत्पादन ओळख असलेल्या वेईकल्सचा पुरवठा सुरू राहील.
एरिस डिफिट बोरिंग करण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहे; ज्यामध्ये डिफिट ऑर्डिनरी, डिफिट फंक्शनल, डिफिट स्ट्रेस आणि डिफिट कॉम्प्रोमाईज यांचे संयोजन आहे. व्यावहारिकता आणि उपयुक्ततेमध्ये पुन्हा एकदा व्यक्तिमत्त्व आणि स्टाईल आणण्यासाठी यामध्ये आकर्षक डिझाइन, प्रीमियम अनुभव, प्रगत तंत्रज्ञान, सर्वसमावेशक सुरक्षितता आणि वैविध्यपूर्ण पॉवरट्रेन पर्याय एकत्र आणण्यात आले आहेत.
डिफिट ऑर्डिनरी – आधुनिक अभिव्यक्तीसह आकर्षक डिझाइन
एरिस आकर्षक प्रमाण आणि समकालीन बारकाव्यांचा मेळ साधत सेदानमध्ये बोल्ड आणि अत्याधुनिक अनुभव घेऊन येते. या कारच्या रुंद आणि प्रबळ स्टान्सला पूरक सिग्नेचर एलईडी हेडलॅम्प्स, डीआरएल्स, रुंद लोअर ग्रिल आणि डायमंड-कट एरो अलॉय व्हील्स आहेत.
आकर्षक डेक लिड या सेदानच्या सिल्हूटला अधिक लक्षवेधक बनवते, तर इन्फिनिटी कनेक्टेड एलईडी टेल लॅम्प्स मागील बाजूस अत्यंत आकर्षक सिग्नेचर लूक तयार करतात. ड्युअल-टोन ब्लॅक रूफ, कॉस्मो ग्रेन टेक्स्चर्ड व्हील-आर्च क्लॅडिंग आणि क्रोम-लाइन डोअर हँडल्स या कारच्या विशिष्टतेमध्ये अधिक भर करतात.
डिफिट फंक्शनल – इंटेलिजंट तंत्रज्ञानासह उच्च दर्जाचा आरामदायीपणा
एरिस एरोलक्स व्हेंटिलेटेड लेदरेट सीट्स, ओपनव्ह्यू डॅशबोर्ड, विनासायास उपलब्ध होणारे ड्युअल स्क्रीन्स, २६.०३ सेमी एचडी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम आणि १२.७ सेमी डिजिटल आयलंड क्लस्टरने सुसज्ज प्रीमियम आणि तंत्रज्ञान-संपन्न केबिनसह दैनंदिन प्रवास अधिक सुखकर करते.
या सेगमेंटमधील पहिले वायरलेस चार्जिंगसह ड्युअल स्मार्टफोन डेक, वायरलेस अॅपल कारप्ले® आणि अँड्रॉइड ऑटो®, ३५ पेक्षा जास्त कनेक्टेड फीचर्ससह आयआरए, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, रिअर एसी व्हेंट्स, ६५ वॅट टाइप-सी फास्ट चार्जर्स आणि ४१९ लिटर बूट स्पेस अधिक आरामदायीपणा, कनेक्टिव्हिटी आणि दैनंदिन सोयीसुविधांची खात्री देतात.
डिफिट स्ट्रेस – दैनंदिन ड्रायव्हिंगमध्ये आत्मविश्वास
टाटा मोटर्स पॅसेंजर वेईकल्सच्या सेफ्टी डोम संकल्पनेवर आधारित एरिसमध्ये अल्ट्रा हाय स्ट्रेंथ स्टीलचा वापर करण्यात आला आहे आणि ३६०-डिग्री इम्पॅक्ट प्रोटेक्शनसाठी डिझाइन करण्यात आली आहे. यामध्ये ६ एअरबॅग्ज स्टँडर्ड (प्रमाणित) आहेत, तसेच इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी प्रोग्राम, ईबीडी आणि सीएससीसह एबीएस, हिल होल्ड कंट्रोल आणि आयएसओफिक्स (ISOFIX) अँकर्स आहेत.
ड्रायव्हरचे नियंत्रण व सुरक्षितता वाढवण्यासाठी या सेगमेंटमधील पहिला ब्लाइंड व्ह्यू मॉनिटर आणि मल्टिव्ह्यू डिजिटल व्हिडिओ रेकॉर्डर, मल्टिपल २डी आणि ३डी व्ह्यूजसह ३६०-डिग्री एसव्हीएस एचडी कॅमेरा, ऑटो हेडलॅम्प्स, रेन-सेन्सिंग वायपर्स, रिअर डिफॉगर आणि अधिक शक्तिशाली रिअर इम्पॅक्ट प्रोटेक्शन देण्यात आले आहे.
आयसीएनजी व्हेरिएंट्समध्ये गॅस लिक डिटेक्शन, प्रगत लिक-प्रूफ मटेरिअल्स, थर्मल इन्सिडेंट प्रोटेक्शन आणि रिअर क्रॅश प्रोटेक्शन यांसारख्या समर्पित सुरक्षा सोल्यूशन्सचा समावेश आहे.
डिफिट कॉम्प्रोमाईज – प्रत्येक प्रवासासाठी पॉवरट्रेनचे पर्याय
एरिस ग्राहकांना पेट्रोल आणि सीएनजी पॉवरट्रेन्समधून निवड करण्याचे स्वातंत्र्य देते, ज्यामध्ये वेगवेगळ्या ड्रायव्हिंग प्राधान्यांचा आणि दैनंदिन गरजांचा विचार करून मॅन्युअल आणि एएमटी पर्याय डिझाइन करण्यात आले आहेत. १.२-लिटर रेव्होट्रॉन पेट्रोल इंजिन ५-स्पीड मॅन्युअल आणि एएमटी ट्रान्समिशन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे, जे परफॉर्मन्स, कार्यक्षमता आणि सुलभ ड्रायव्हिंगचे उत्तम संतुलन देते.
सीएनजीला पसंती देणाऱ्या ग्राहकांसाठी एरिस आयसीएनजी तंत्रज्ञानाची कार्यक्षमता ऑटोमॅटिक ट्रान्समिशनच्या सोयीसह एकत्र आणते. आयसीएनजी एएमटी सीएनजीच्या फायद्यांना सहज, विनासायास ऑटोमॅटिक ड्रायव्हिंगशी जोडते, तर ड्युअल-सिलिंडर आयसीएनजी तंत्रज्ञान बूट स्पेसचे कार्यक्षम नियोजन करते आणि सेदानचे व्यावहारिक फायदे कायम ठेवते. एकत्रित, ही पॉवरट्रेन लाइन-अप ग्राहकांना दैनंदिन उपयुक्ततेबाबत कोणतीही तडजोड न करता अधिक पर्याय उपलब्ध करून देते.
केवळ नवीन नावापलीकडे जाऊन, एरिस आधुनिक सेदानची नव्याने केलेली डिझाइन सादर करते, जी दैनंदिन उपयुक्ततेला अधिक आकर्षक डिझाइन, प्रगत तंत्रज्ञान, अधिक सुरक्षितता आणि विस्तृत पॉवरट्रेन पर्यायांसोबत जोडते. एरिससह टाटा.कार्स उपयुक्ततेमध्ये पुन्हा एकदा व्यक्तिमत्त्व आणि स्टाईल आणत असून ग्राहकांना दैनंदिन कंटाळवाणा प्रवास दूर करण्यासाठी (‘डिफिट बोरिंग’) डिझाइन केलेली सेदान सादर करत आहे