Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tata Aeris Compact Sedan Launch: टाटा एरिस कॉम्पॅक्ट सेडान भारतात लाँच; किंमत फक्त ₹5.30 लाखांपासून सुरु

10.25-इंच स्क्रीन, 360-डिग्री कॅमेरा, व्हेंटिलेटेड सीट्स आणि 6 एअरबॅग्ससारख्या फीचर्समुळे टाटा एरिसने फीचर लिस्टमध्ये मोठी झेप घेतली आहे. ₹9.75 लाखांपर्यंत जाणाऱ्या टॉप iCNG AMT मॉडेलमध्ये ग्राहकांना नेमके काय काय मिळते, हेही जाणून घेणे महत्त्वाचे ठरेल.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Sep 25, 2026 | 02:41 PM
Tata Aeris Compact Sedan Launch: टाटा एरिस कॉम्पॅक्ट सेडान भारतात लाँच; किंमत फक्त ₹5.30 लाखांपासून सुरु
Follow Us
Follow Us:
  • टाटा एरिसची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत ₹5.30 लाख असून टॉप iCNG AMT मॉडेल ₹9.75 लाखांचे आहे.
  • नवीन सेडानमध्ये 10.25-इंच टचस्क्रीन, 360-डिग्री कॅमेरा आणि व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स मिळतात.
  • पेट्रोल आणि CNG दोन्ही इंजिनसह मॅन्युअल आणि AMT गिअरबॉक्सचे पर्याय ग्राहकांना उपलब्ध आहेत.
टाटा मोटर्सने भारतात नवीन टाटा एरिस कॉम्पॅक्ट सेडान लाँच केली आहे. ही कार टाटा टिगोरची अपडेटेड आणि नव्या नावाने सादर केलेली आवृत्ती आहे. एरिसची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत ₹5.30 लाख असून, टॉप-स्पेक Accomplished iCNG AMT व्हेरिएंटची किंमत ₹9.75 लाखांपर्यंत जाते. ही कार Smart, Pure, Pure+, Creative आणि Accomplished अशा 5 व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे.

बाहेरून मिळाला नवा लूक

टाटा एरिसला X-ALFA प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आले आहे. कारच्या पुढील भागात शार्प LED हेडलॅम्प्स आणि DRLs, नवीन 15-इंच ड्युअल-टोन अलॉय व्हील्स आणि कनेक्टेड LED टेललॅम्प्स देण्यात आले आहेत. रुंद लोअर ग्रिल, C-शेप्ड हाउसिंग, व्हील-आर्च क्लॅडिंग आणि ड्युअल-टोन ब्लॅक रूफमुळे कारचा लूक आणखी आकर्षक दिसतो. एरिसला 6 एक्स्टिरियर रंगांचे पर्याय मिळतात.

टाटा सफारी EV मध्ये मिळणार Triple-Screen डॅशबोर्ड; 65 आणि 75 kWh बॅटरीचा पर्याय

केबिनमध्ये टेक्नोलॉजीचा तडका

इंटीरियरमध्ये 10.25-इंच HD टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, 5-इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि वायरलेस Apple CarPlay व Android Auto देण्यात आले आहेत. iRA कनेक्टिव्हिटीद्वारे 35 पेक्षा जास्त कनेक्टेड कार फंक्शन्स मिळतात. याशिवाय वायरलेस चार्जिंग, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, रिअर AC व्हेंट्स आणि 65W Type-C चार्जिंगची सुविधा आहे.

पेट्रोल आणि CNG दोन्ही पर्याय

टाटा एरिसमध्ये 1.2-लिटर Revotron पेट्रोल इंजिन मिळते. पेट्रोल व्हर्जन 86 PS पॉवर आणि 113 Nm टॉर्क देते. CNG व्हर्जनमध्ये 75.5 PS पॉवर आणि 96.5 Nm टॉर्क मिळतो. दोन्ही इंजिनसोबत 5-स्पीड मॅन्युअल आणि AMT गिअरबॉक्सचे पर्याय आहेत. CNG AMT पर्यायामुळे ही कार दैनंदिन वापरासाठी आणखी सोयीची ठरू शकते.

टाटा सिएरा Legend Series लाँच! किंमत ₹11.99 लाखांपासून; मिळणार प्रीमियम फीचर्स

सेफ्टीमध्येही दमदार फीचर्स

सेफ्टीसाठी 6 एअरबॅग्स, ESP, ABS, EBD, हिल-होल्ड कंट्रोल, ISOFIX आणि iTPMS स्टँडर्ड देण्यात आले आहेत. 360-डिग्री HD कॅमेरा, Blind View Monitor, HD रिव्हर्सिंग कॅमेरा आणि DashCam Recorder यांसारखी फीचर्सही मिळतात. CNG मॉडेलमध्ये गॅस लीक डिटेक्शन आणि थर्मल इन्सिडेंट प्रोटेक्शन देण्यात आले आहे. त्यामुळे टाटा एरिसचा थेट मुकाबला मारुती सुझुकी डिझायरसारख्या लोकप्रिय सेडानशी होणार आहे.

Web Title: Tata aeris compact sedan launched with petrol cng amt options auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 25, 2026 | 02:41 PM

Topics:  

  • automobile
  • cars
  • tata motors

संबंधित बातम्या

बजाज पल्सरचा ‘कमबॅक’ प्लॅन! 125 आणि 150 नव्या अवतारात, मार्केट शेअर परत मिळवणार
1

बजाज पल्सरचा ‘कमबॅक’ प्लॅन! 125 आणि 150 नव्या अवतारात, मार्केट शेअर परत मिळवणार

New Hyundai Tucson: ह्युंदाईची नवी SUV झाली मोठी आणि स्मार्ट! टक्सनमध्ये आले जबरदस्त अपग्रेड्स
2

New Hyundai Tucson: ह्युंदाईची नवी SUV झाली मोठी आणि स्मार्ट! टक्सनमध्ये आले जबरदस्त अपग्रेड्स

बेंटले टॉर्कल इलेक्ट्रिक कारचे मार्केटमध्ये दाखल! 600 km रेंज, 876 bhp पॉवर आणि 2.9 सेकंदात 0-100 kmph
3

बेंटले टॉर्कल इलेक्ट्रिक कारचे मार्केटमध्ये दाखल! 600 km रेंज, 876 bhp पॉवर आणि 2.9 सेकंदात 0-100 kmph

लक्झरी कार प्रेमींसाठी गुड न्यूज! ५ ऑक्टोबरला लाँच होणार नवीन मर्सिडीज-मेबॅक एस-क्लास
4

लक्झरी कार प्रेमींसाठी गुड न्यूज! ५ ऑक्टोबरला लाँच होणार नवीन मर्सिडीज-मेबॅक एस-क्लास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.