(फोटो सौजन्य-AI एआय)
लेजंड सिरीजचा भाग म्हणून, प्युअर एल सिएराचा प्रीमियम केबिन अनुभव पूर्वीपेक्षा अधिक सुलभ बनवते. १३.७९ लाख रुपये* किंमत असलेली ही व्हेरियंट १७-इंच अलॉय व्हील्ससह सिएराच्या वैशिष्ट्यपूर्ण डिझाइनला अधिक आकर्षक बनवते; तर प्रीमियम लेदरेट इंटिरिअर्ससह ८-स्पीकर ऑडिओ सिस्टीम आणि २६.०३ सेमी एचडी इन्फोटेनमेंट सिस्टीम केबिनमध्ये अधिक अत्याधुनिक वातावरण निर्माण करतात. अतिरिक्त ५०,००० रुपयांमध्ये, प्युअर एल (ओ) सेगमेंटमधील सर्वात मोठ्या पॅनारोमॅक्स व्हॉइस असिस्टेड सनरूफसह खुल्या हवेतील लक्झरीचा अनुभव देते.
टाटा पंच EV झाली महाग! किंमतीत ₹20,000 पर्यंत वाढ, जाणून घ्या नवीन दर
आणखी आलिशान केबिन अनुभवाच्या शोधात असणाऱ्या ग्राहकांसाठी, १४.९९ लाख रुपये* किंमत असलेली प्युअर+ एल हवेशीर फ्रंट सीट्स, थाय सपोर्ट एक्स्टेंडरसह ६-वे पॉवर्ड ड्रायव्हर सीट आणि बॉस मोडची सुविधा देते. या सुधारणा प्रवाशांचा आराम आणि सोसीयुविधा नव्या उंचीवर नेतात.
या सुधारणांशिवाय, प्रत्येक सिएरा सर्वोत्तम वैशिष्ट्ये सातत्याने प्रदान करत आहे, ज्यांनी या एसयूव्हीला प्रीमियम मिड-एसयूव्ही सेगमेंटमधील सर्वात आकर्षक पर्याय बनवले आहे. ५-स्टार भारत एनसीएपी प्रमाणित बॉडी स्ट्रक्चरवर निर्मित या एसयूव्हीमध्ये प्रमाणित म्हणून ६ एअरबॅग्ज, २० फंक्शन्ससह ईएसपी आणि ऑल-व्हील डिस्क ब्रेक्स आहेत. ग्राहक तीन पॉवरट्रेन पर्यायांमधून निवड करू शकतात: १.५ लिटर हायपेरियन टीजीडीआय पेट्रोल, १.५ लिटर रेव्होट्रॉन पेट्रोल आणि १.५ लिटर क्रायोजेट डिझेल, जे मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन्समध्ये उपलब्ध आहेत.
लेजंड सिरीजच्या लाँचबाबत मत व्यक्त करत टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेडचे चीफ कमर्शियल ऑफिसर श्री. विवेक श्रीवत्स म्हणाले, “सिएराने प्रतिष्ठित डिझाइन, प्रगत तंत्रज्ञान, अद्वितीय सुरक्षितता, कार्यक्षमता आणि लक्झरीअस एसयूव्ही अनुभव एकत्र आणून प्रीमियम मिड-एसयूव्ही सेगमेंटची स्थापना केली, ज्याने ग्राहकांचे लक्ष वेधून घेतले. नवीन लेजंड सिरीजसह आम्ही सिएरा पोर्टफोलिओमधील अधिकाधिक ग्राहकांसाठी अधिक उत्साहवर्धक आणि आलिशान केबिन वातावरण उपलब्ध करून त्या यशाला पुढे नेत आहोत. ग्राहक सर्वाधिक महत्त्व देत असलेली वैशिष्ट्ये आणि आरामदायी सुविधा उपलब्ध करून आम्ही सिएराची मूळ वैशिष्ट्ये कायम राखत या एसयूव्हीला अधिक प्रासंगिक आणि सुलभ बनवत आहोत.”
Tata Curvv Series X लाँच! कमी व्हेरिएंट्समध्येही मिळणार प्रीमियम फीचर्स
या वाहनाच्या विविध व्हेरियंट्स आणि इंजिन-ट्रांसमिशन पर्यायांच्या एक्स-शोरूम किमती (लाख रुपयांमध्ये) खालीलप्रमाणे आहेत. स्मार्ट + एल व्हेरियंटच्या मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये रेव्होट्रॉन १.५ लिटर इंजिन ११.९९ लाख रुपये आणि क्रायोजेट १.५ लिटर इंजिन १३.४९ लाख रुपयांना उपलब्ध आहे. प्युअर एल व्हेरियंटमध्ये मॅन्युअल ट्रान्समिशनसह रेव्होट्रॉन १.५ लिटरची किंमत १३.७९ लाख रुपये आणि क्रायोजेट १.५ लिटरची किंमत १५.२४ लाख रुपये आहे, तर याचे ऑटोमॅटिक रेव्होट्रॉन १.५ लिटर मॉडेल १४.९९ लाख रुपयांना मिळते. प्युअर एल (ओ) व्हेरियंटच्या मॅन्युअल मॉडेलमध्ये रेव्होट्रॉन १.५ लिटर १४.२९ लाख रुपये आणि क्रायोजेट १.५ लिटर १५.७४ लाख रुपयांना उपलब्ध आहे, तर ऑटोमॅटिकमध्ये रेव्होट्रॉन १.५ लिटर १५.५९ लाख रुपये आणि क्रायोजेट १.५ लिटर १६.९९ लाख रुपयांच्या किमतीत येते. प्युअर + एल व्हेरियंटच्या मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये रेव्होट्रॉन १.५ लिटर १४.९९ लाख रुपये आणि क्रायोजेट १.५ लिटर १६.४४ लाख रुपयांना उपलब्ध आहे, तर ऑटोमॅटिक ट्रान्समिशनमध्ये रेव्होट्रॉन १.५ लिटर १६.२९ लाख रुपये आणि क्रायोजेट १.५ लिटर १७.७४ लाख रुपयांना मिळते. सर्वात प्रीमियम अॅडव्हेंचर + एल व्हेरियंटच्या मॅन्युअल पर्यायांमध्ये रेव्होट्रॉन १.५ लिटर १६.९९ लाख रुपये आणि क्रायोजेट १.५ लिटर १८.१९ लाख रुपयांना उपलब्ध आहे, तर याच्या ऑटोमॅटिक पर्यायांमध्ये रेव्होट्रॉन १.५ लिटर १८.२९ लाख रुपये, क्रायोजेट १.५ लिटर १९.४९ लाख रुपये आणि हायपेरियन १.५ लिटर इंजिन मॉडेल १८.९९ लाख रुपयांच्या किमतीत सादर करण्यात आले आहे.






