फोटो सौजन्य: iStock
भारतीय मार्केटमध्ये टाटा मोटर्सने विविध सेगमेंटमध्ये उत्कृष्ट वाहनांची रेंज ऑफर केली आहे. कंपनी सध्या इलेक्ट्रिक वाहनांच्या उत्पादनावर विशेष भर देत असून, ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन टिकाऊ आणि कार्यक्षम ट्रक्स देखील बाजारात आणले आहेत. या ट्रक्सना देशभरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. अशातच आता टाटा ट्रक मालकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. यामुळे ट्रक मालकांचा अनुभव अधिक सुलभ, सुरक्षित आणि फायदेशीर होणार आहे. चला, या नव्या घडामोडीबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.
टाटा मोटर्सने त्यांच्या सर्व ट्रकमध्ये फॅक्टरी-फिटेड एअर कंडिशनिंग सिस्टम लाँच केली आहे. यामुळे आता ट्रक चालकांना केबिनमध्ये वेगळा एसी सिस्टम बसवावा लागणार नाही. आता टाटा मोटर्सच्या SFC, LPT, Ultra, Signa आणि Prima केबिनसह काऊल व्हर्जनचा देखील समावेश आहे. यामुळे ट्रक चालकांचा प्रवास आरामदायी होणार आहे.
भारतीय मार्केटमध्ये 2025 Suzuki V-Strom झाली लाँच, आता मिळणार ‘हे’ दमदार फीचर्स
टाटा मोटर्सच्या नवीन एसी सिस्टीममध्ये Eco आणि Heavy मोड मिळणार आहेत, ज्यामुळे ड्रायव्हर्स त्यांच्या सोयीनुसार आणि गरजेनुसार कूलिंग निवडू शकतात. ही सिस्टीम चांगलय एनर्जी एफिशियंसीसह येते, ज्यामुळे इंधनाची देखील बचत होते.
टाटा मोटर्सच्या नवीन रेंजमधील ट्रकमध्ये आता 320 एचपी पर्यंतचा पॉवर आउटपुट मिळेल, ज्यामुळे ते जड कामांसाठी अधिक सक्षम बनतील. यासोबतच, कंपनीने त्यांच्या ट्रकमध्ये काही स्मार्ट फीचर्स देखील दिले आहेत, ज्यात इंजिन आयडल ऑटो-शट ऑफ सिस्टम, रिअल-टाइम व्हॉइस मेसेजिंग अलर्ट, ड्युटी सायकल आधारित फ्युएल टेक्नॉलॉजीचा समावेश आहे. हे सर्व फीचर्स एकत्रितपणे केवळ ट्रक्सचा परफॉर्मन्स सुधारणार नाहीत तर फ्लीट मालकांसाठी खर्च देखील कमी करेल.
एकदाच टाकी फुल करून मिळेल 900 KM ची रेंज ! Tata च्या ‘या’ अफलातून कारवर मिळतोय जबरदस्त डिस्काउंट
टाटा मोटर्स कमर्शियल व्हेइकल्सचे ट्रक बिझनेसचे वाईस प्रेसिडेंट आणि बिझनेस हेड राजेश कौल म्हणाले की, एसी केबिन आणि काऊल्सची सुरुवात ही ड्रायव्हर्ससाठी आरामदायी कामाचे वातावरण निर्माण करण्याच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल आहे, ज्यामुळे त्यांची कार्यक्षमता देखील वाढेल. हे बदल केवळ सरकारी नियमांची पूर्तता करण्यासाठी नाहीत तर ग्राहकांच्या अभिप्राय आणि स्मार्ट इंजिनिअरिंगच्या मदतीने आम्ही अनेक सुधारणा केल्या आहेत ज्यामुळे लॉन्ग टर्म फायदे मिळतील. यामुळे ट्रकचा एकूण चालण्याचा खर्च कमी होईल आणि मालकांना अधिक नफा मिळेल.