फोटो सौजन्य: @volklub (X.com)
भारतीय ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक ऑटो कंपन्या दमदार फीचर्स आणि उत्तम रेंज देणाऱ्या कार मार्केटमध्ये लाँच करत असतात. मात्र, नवीन कार लाँच करून फक्त ग्राहकांचे लक्ष वळवता येते. त्यांना जर कारकडे आकर्षित करायचे असेल तर दमदार ऑफर्स हा एक महत्वचा मार्ग आहे. अशीच एक भन्नाट आणि बचतीची ऑफर टाटा मोटर्स देत आहे.
भारतीय मार्केटमध्ये टाटा मोटर्सच्या कार्सना खूप मागणी आहे. या भागात, कंपनी जून 2025 मध्ये त्यांच्या स्वस्त Tata Tiago वर मोठी सूट देत आहे. ही कार त्याच्या परवडणाऱ्या किमतीसाठी, मजबूत सुरक्षिततेसाठी आणि उत्कृष्ट मायलेजसाठी ओळखली जाते. या कारच्या डिस्काउंट ऑफरबद्दल आपण जाणून घेऊयात.
14000 च्या किमतीत लाँच झाली होती भारतातील पहिली कार, आज किंमत सातव्या आसमंतात
दिल्ली-एनसीआरच्या स्थानिक डीलरशिपनुसार, टियागो खरेदीवर जास्तीत जास्त 35 हजार रुपये वाचवता येतील. ही ऑफर टियागोच्या MY24 मॉडेलसाठी आहे, ज्यामध्ये कॅश डिस्काउंट, एक्सचेंज बोनस आणि कॉर्पोरेट डिस्काउंट समाविष्ट आहे. ही ऑफर मर्यादित काळासाठी आहे.
टाटा टियागोची सुरुवातीची किंमत 5 लाख रुपये आहे, जी टॉप एंड व्हेरियंटसाठी एक्स-शोरूम 8.45 लाख रुपयांपर्यंत जाते. टियागो 12 व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे, ज्यामध्ये पेट्रोल आणि सीएनजी दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत.
टाटा टियागो 1199 सीसी 1.2-लिटर रेव्होट्रॉन पेट्रोल इंजिनसह सुसज्ज आहे. कारमधील हे इंजिन 6,000 आरपीएमवर 86 पीएस पॉवर आणि 3,300 आरपीएमवर 113 एनएम टॉर्क देते.
लाँच होण्याअगोदर Vida च्या Electric Scooter चा टिझर सोशल मीडियावर जारी, मिळाली ‘ही’ महत्वाची माहिती
टाटा टियागो सीएनजीमध्ये देखील उपलब्ध आहे. टियागो सीएनजीमधील इंजिन 6,000 आरपीएमवर 75.5 पीएस पॉवर आणि 3,500 आरपीएमवर 96.5 एनएम टॉर्क देते. ही कार 242 लिटरच्या बूट-स्पेससह येते. टाटा टियागोचा ग्राउंड क्लिअरन्स 170 मिमी आहे. या टाटा कारच्या पुढच्या बाजूला डिस्क ब्रेक आणि मागील बाजूला ड्रम ब्रेक आहेत.
टाटा टियागोचा पेट्रोल मॅन्युअल व्हेरियंट 20.09 किमी प्रति लिटर मायलेज देतो. त्याच वेळी, ऑटोमॅटिक ट्रान्समिशन असलेली ही टाटा कार 19 kmpl मायलेज देते. यासोबतच, टाटा टियागो कार सीएनजी मोडमध्ये चांगले मायलेज देते.
जर तुम्ही या चर्च दोन्ही टॅंक फुल्ल केल्या तर तुम्ही सहजपणे 900 किमी पर्यंत प्रवास करू शकता. टियागो सीएनजी मॅन्युअल ट्रान्समिशनसह 26.49 किमी/किलो आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह 28.06 किमी/किलो मायलेज देते.