(फोटो सौजन्य-AI एआय)
भारतातील अग्रगण्य वाहन उत्पादक कंपनी टाटा मोटर्सने ऑगस्ट २०२६ मध्ये विक्रमी विक्रीची नोंद केली आहे. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळून कंपनीने एकूण ६७,७५३ वाहनांची विक्री केली आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट २०२५ मधील ४३,३१५ युनिट्सच्या तुलनेत कंपनीच्या विक्रीत तब्बल ५६ टक्क्यांची घसघशीत वाढ झाली आहे. या मजबूत कामगिरीमुळे टाटा मोटर्सने मारुती सुझुकीनंतर देशातील दुसऱ्या क्रमांकाचे स्थान कायम ठेवले आहे.
टाटा Motors च्या देशांतर्गत पॅसेंजर व्हेइकल विभागाने ६५,२५३ युनिट्सची विक्री केली, जी गेल्या वर्षीच्या ४१,००१ युनिट्सपेक्षा ५९ टक्क्यांनी अधिक आहे. याशिवाय आंतरराष्ट्रीय बाजारात २,५०० गाड्या पाठवण्यात आल्या असून त्यात ८ टक्क्यांची वाढ झाली आहे. गेल्या सहा महिन्यांत भारतात टाटाच्या झिरो-एमिशन (इलेक्ट्रिक) वाहनांच्या बुकिंगमध्ये तब्बल तीन पटीने वाढ झाली आहे.
या विक्रीतील सर्वात मोठा वाटा इलेक्ट्रिक वाहनांचा राहिला आहे. ऑगस्ट २०२६ मध्ये टाटा Motors ने देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजार मिळून १६,५४९ इलेक्ट्रिक गाड्यांची विक्री केली. ऑगस्ट २०२५ मधील ८,५४० युनिट्सच्या तुलनेत ई-व्हीकल सेगमेंटमध्ये तब्बल ९४ टक्क्यांची प्रचंड वाढ नोंदवली गेली आहे. नेक्सॉन ईव्ही, पंच ईव्ही, टियागो ईव्ही आणि नुकतीच लाँच झालेली हॅरियर ईव्ही व सिएरा ईव्ही या गाड्यांनी या विक्रीत मुख्य योगदान दिले आहे.
Tata Motors: टाटा मोटर्सचा मोठा धमाका! २०२६-२७ पर्यंत भारतीय मार्केटमध्ये लाँच होणार ६ नव्या कार्स!
टाटा मोटर्सने गेल्या महिन्यात महिंद्रापेक्षा सुमारे ६,००० अधिक गाड्यांची विक्री करत अव्वल ६ ऑटो कंपन्यांमध्ये सर्वात जलद वार्षिक वाढ नोंदवली आहे. आगामी काळात कंपनी आपल्या लोकप्रिय मॉडेल सफारीची इलेक्ट्रिक आवृत्ती आणि पुढील पिढीची नेक्सॉन बाजारात आणण्याच्या तयारीत आहे.






