
फोटो सौजन्य: Gemini
टाटा मोटर्स ही देशातील आघाडीची ऑटो कंपनी. कंपनीने आतापर्यंत अनेक सेगमेंटमध्ये दमदार कार्स ऑफर केल्या आहेत. कंपनी नेहमीच ग्राहकांना काय हवं आहे? यावर जास्त लक्षकेंद्रित करत असते. कंपनीने डिसेंबर 2025 मध्ये टाटा अल्ट्रोज, नेक्सॉन, हॅरियर, टियागो,आणि सफारी या सारख्या लोकप्रिय आणि बजेट कार्सवर डिस्काउंट ऑफर जाहीर केली आहे.
टाटा मोटर्सने डिसेंबर 2025 साठी वर्षाअखेरीच्या खास ऑफर्स आणि आकर्षक सवलती जाहीर केल्या आहेत. या ऑफर्स देशभरात 1 डिसेंबर ते 31 डिसेंबरदरम्यान MY24 आणि MY25 मॉडेल्ससाठी लागू असतील. टाटाच्या हॅचबॅक, सेडान आणि एसयूव्ही सेगमेंटमधील बहुतेक कार्सवर एक्सचेंज बोनस, ग्राहक सवलत, लॉयल्टी बेनिफिट्स आणि कॉर्पोरेट ऑफर्सचा समावेश करण्यात आला आहे.
MY24 मॉडेल्समध्ये टाटा टियागोवर एकूण 55,000 रुपयांपर्यंतचे फायदे मिळत आहेत. टिगोर सेडानवरही तेवढीच सवलत देण्यात येत आहे. अल्ट्रोजच्या पेट्रोल आणि डिझेल व्हेरिएंट्सवर (रेसर वगळता) कमाल 1.50 लाख रुपयांपर्यंत सूट जाहीर करण्यात आली आहे. अल्ट्रोज रेसर मॉडेलसाठी ही सवलत 1.85 लाख रुपयांपर्यंत जाते. पंच पेट्रोल आणि सीएनजी व्हेरिएंट्सवर 75,000 रुपयांपर्यंत, तर नेक्सॉनच्या सर्व इंधन प्रकारांवर 50,000 रुपयांपर्यंतची आकर्षक सवलत ग्राहकांना मिळणार आहे.
हॅरियर आणि सफारीच्या डिझेल व्हेरिएंट्सवर प्रत्येकी कमाल 1 लाख रुपयांपर्यंतची आकर्षक सवलत दिली जात आहे. कर्व्ह (Curvv) च्या MY24 मॉडेलवर थेट 50,000 रुपयांचा लाभ मिळणार आहे. MY25 मॉडेल्सबाबत बोलायचे झाल्यास, टियागो (XE वगळून) आणि टिगोर कारवर 35,000 रुपयांपर्यंतचे फायदे उपलब्ध आहेत. मात्र टियागो XE ट्रिमवर या महिन्यात कोणतीही ऑफर नाही. जुन्या अल्ट्रोज मॉडेल्सवर 85,000 रुपयांपर्यंत सूट देण्यात येत असून, नव्या पिढीच्या अल्ट्रोजवर केवळ 25,000 रुपयांपर्यंतचा बेनिफिट मिळतो.
कावासाकीची बम्पर ऑफर! खरेदी करा Kawasaki Versys-X300 आणि मिळवा २५ हजारांची सूट
टाटा पंच पेट्रोल आणि सीएनजी व्हेरिएंट्सवर लॉयल्टी बेनिफिटसह 50,000 रुपयांपर्यंतचा फायदा दिला जात आहे. तर नेक्सॉनच्या MY25 मॉडेल्समध्ये स्मार्ट आणि प्युअर ट्रिम्सवर कमाल 65,000 रुपयांची सवलत मिळेल, तर इतर ट्रिम्सवर 50,000 रुपयांपर्यंतचा लाभ देण्यात येत आहे. नेक्सॉन डिझेल व्हेरिएंटवरही 50,000 रुपयांची सूट लागू आहे. कर्व्ह MY25 मॉडेलसाठी 40,000 रुपयांची ऑफर, तर हॅरियर आणि सफारीच्या MY25 मॉडेल्सवर प्रत्येकी 75,000 रुपयांपर्यंतची सवलत जाहीर करण्यात आली आहे.
ही ऑफर तुमच्या जवळील शोरूमनुसार बदलू शकते. अधिक माहितीसाठी जवळील टाटा मोटर्सच्या डीलरशिपशी संपर्क साधा.