Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

टेस्ट ड्राईव्ह पडली महागात! 20 फूट खोल खड्ड्यात कोसळली Tata Sierra; आता नुकसान भरपाई कोण देणार?

जिथे टेस्ट ड्राइव्ह दरम्यान टाटा सिएरा (Tata Sierra क्रॅश) २० फूट खोल खड्ड्यात पडली. कारमधील प्रवाशांना गंभीर दुखापत झाली नसली तरी, कारचं मोठं नुकसान झाले आहे. या कारच्या दुरुस्तीचा खर्च कोण देणार?

  • By Ankita Karangutkar
Updated On: Mar 13, 2026 | 03:01 PM
(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • टेस्ट ड्राइव्हचे रूपांतर भयानक अपघातात झालं तर?
  • Tata Sierra कार बांधकाम सुरु असलेल्या खड्ड्यात पडली
  • या घटनेनंतर लोकांना पडलेला प्रश्न
Tata Sierra Test Drive Accident: कार खरेदी करण्यापूर्वी प्रत्येकजण टेस्ट ड्राइव्ह घेतं. यामुळे लोकांना कारचा अनुभव घेता येतो. यामुळे त्यांना कारचे फिचर्स कळतात, ड्रायव्हिंग आणि मायलेंज सारख्या गोष्टींबाबत चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत होते. पण जर टेस्ट ड्राइव्हचे रूपांतर भयानक अपघातात झालं तर काय होईल? हो, महाराष्ट्रातील ठाण्यात अशीच एक दुर्घटना समोर आली आहे, जिथे टेस्ट ड्राइव्ह दरम्यान टाटा सिएरा (Tata Sierra क्रॅश) २० फूट खोल खड्ड्यात पडली. कारमधील प्रवाशांना गंभीर दुखापत झाली नसली तरी, कारचं मोठं नुकसान झाले आहे. या अपघातामुळे आता हा प्रश्न उपस्थित होत आहे की या कारच्या दुरुस्तीचा खर्च कोण देणार?

BMW पासून Mercedes पर्यंत, बॉलर्सचे छक्के सोडवणाऱ्या Ishan Kishanच्या ताफ्यात ‘या’ अलिशान गाड्या

अपघात कुठे आणि कसा झाला?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ठाणे पश्चिमेकडील पाचपाखाडी भागात ही घटना घडली. टेस्ट ड्राइव्ह दरम्यान, Tata Sierra कारचा ताबा सुटला आणि ती बांधकाम सुरु असलेल्या खड्ड्यात पडली. एका महिला ग्राहकाची टेस्ट ड्राइव्ह सुरू असताना अचानक गाडीचा ताबा सुटला. खड्ड्यात पडण्यापूर्वी, कारने रस्त्यावर उभ्या असलेल्या एका ऑटो रिक्षा आणि दोन मोटारसायकलना धडक दिली. त्यानंतर ती बॅरिकेड्स तोडून सुमारे २० फूट खोल खड्ड्यात पडली.

गाडीत कोण होतं?

वृत्तानुसार, अपघातावेळी कारमध्ये तीन जण होते. यामध्ये कार चालवणारी महिला, तिच्यासोबत असलेली एक नातेवाईक आणि शोरूममधील एक कर्मचारी यांचा समावेश होता. ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन पथकाने घटनास्थळी पोहोचून तिघांनाही बाहेर काढलं आणि जवळच्या रुग्णालयात दाखल केले. कार इतक्या खोल दरीत कोसळली तरी कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही हे दिलासादायक आहे.पण त्यांना दुखापत झाली आहे. सध्या सर्वांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या घटनेनंतर लोकांना पडलेला प्रश्न

या अपघातानंतर, लोकांना प्रश्न पडला आहे की कारच्या दुरुस्तीचा खर्च कोण देईल. हा प्रश्न उद्भवतो कारण ती महिला गाडी चालवताना टेस्ट ड्राइव्ह घेत होती. तिने कार खरेदी केली नव्हती आणि म्हणूनच तिचा विमा नसण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत, तिला संपूर्ण दुरुस्तीचा खर्च द्यावा लागेल का?

दुरुस्तीचा खर्च कोण देणार?

गाडीच्या दुरुस्तीसाठी महिला एक पैसाही देणार नाही. गाडीच्या दुरुस्तीचा संपूर्ण खर्च कंपनीला करावा लागेल. कारण ती महिला फक्त गाडीची टेस्ट ड्राइव्ह घेत होती. ती गाडीची मालकीण नव्हती किंवा तिने गाडीचा विमाही काढला नव्हता. त्यामुळे, टेस्ट ड्राइव्ह दरम्यान गाडीला झालेल्या कोणत्याही नुकसानीचा संपूर्ण खर्च कंपनीला करावा लागेल. कंपनी थर्ड-पार्टी इन्शुरन्सद्वारे गाडीला झालेल्या नुकसानाची भरपाई करते. त्यामुळे, कंपनीला कोणताही खर्च स्वतःहून करावा लागत नाही.

किंमत 50000 पेक्षा कमी!TVS ची सर्वात स्वस्त Orbiter V1 इलेक्ट्रिक स्कूटर मार्केटमध्ये, पाहा जबरदस्त फीचर्स

Web Title: Tata sierra accident during test drive in thane know now who pay for repairing

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 13, 2026 | 03:01 PM

Topics:  

  • Accident
  • Insurance Claim
  • tata sierra

संबंधित बातम्या

मोबाईलने केला घात! लक्ष भरकटलं अन् थेट छतावरून खाली कोसळला तरुण; अंगाचा थरकाप उडवणारा Video Viral
1

मोबाईलने केला घात! लक्ष भरकटलं अन् थेट छतावरून खाली कोसळला तरुण; अंगाचा थरकाप उडवणारा Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.