फोटो सौजन्य: @AutomobeIN/ X.com
भारतात एसयूव्ही विभागातील वाहनांना मोठ्या प्रमाणात मागणी मिळताना दिसते. आता लवकरच देशातील प्रमुख ऑटो कंपनी Tata Motors या सेगमेंटमध्ये नवीन कार आणण्याच्या तयारीत दिसत आहे. Tata Sierra असे या कारचे नाव असणार आहे. मात्र ही कार लाँच होण्यापूर्वी याचे टेस्टिंग होताना दिसत आहे. नुकतेच या टेस्टिंग दरम्यान कार स्पॉट देखील झाली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, लाँच होण्यापूर्वीच त्याचे फायनल प्रोडक्शन व्हर्जन पाहण्यात आले आहे.
Maruti S Presso साठी दरमहा द्यावा लागेल फक्त 5 हजारांपेक्षा कमी EMI, फॉलो करा ‘हा’ फायनान्स प्लॅन
अहवालांनुसार, अलीकडेच दिसलेले हे मॉडेल पूर्णपणे लपलेले होते आणि महाराष्ट्रात त्याची टेस्टिंग घेण्यात येत आहे. ही कार फोर्ड एंडेव्हर आणि नेक्सन सारख्या एसयूव्हींसोबत दिसले आहे. ते फोर्ड एंडेव्हरपेक्षा लहान आणि नेक्सनपेक्षा लक्षणीयरीत्या मोठे असल्याचे दिसून येते. ही कार सुमारे पाच मीटर लांबीसह ऑफर केली जाण्याची अपेक्षा आहे.
कंपनीकडून या SUV मध्ये अनेक आकर्षक फीचर्स दिले जाणार आहेत. यात ट्रिपल स्क्रीन सिस्टीम मिळू शकते, ज्यामध्ये पहिली स्क्रीन इन्स्ट्रुमेंट क्लस्टरसाठी, दुसरी स्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टीमसाठी आणि तिसरी स्क्रीन पॅसेंजर इन्फोटेन्मेंटसाठी दिली जाऊ शकते. याशिवाय यात LED हेडलाइट्स, पॅनोरॅमिक सनरूफ, हेड्स-अप डिस्प्ले, JBL ऑडिओ सिस्टीम, व्हेंटिलेटेड सीट्स, 540 डिग्री सराउंड कॅमेरा व्यू, वायरलेस Android Auto, Apple CarPlay, वायरलेस फोन चार्जर, Level-2 ADAS, ABS, EBD, हिल असिस्ट, ESC, ISOFIX चाइल्ड अँकरज, TPMS यांसारखी अनेक अत्याधुनिक फीचर्स दिली जाऊ शकतात.
‘या’ तीन चाकांच्या Electric Scooter ची ग्राहकांमध्ये जोरदार चर्चा, जाणून घ्या किंमत
निर्मात्याकडून ही SUV विविध इंजिन पर्यायांसह सादर केली जाणार आहे. ती पेट्रोल, डिझेल तसेच EV स्वरूपातही बाजारात आणली जाण्याची शक्यता आहे.
Tata Motors ने या SUV चा कॉन्सेप्ट वर्जन यापूर्वीच सादर केला होता. कंपनीने जानेवारी 2025 मध्ये झालेल्या Auto Expo दरम्यान या SUV चा एक वर्जन सर्वांसमोर प्रदर्शित केला होता.
कंपनीने अधिकृतपणे तपशील जाहीर केलेला नाही, परंतु नोव्हेंबरच्या अखेरीस ही कार भारतीय बाजारपेठेत अधिकृतपणे लाँच होण्याची अपेक्षा आहे.