Maruti S Presso साठी फक्त दरमहा द्यावा लागेल 5 हजारांपेक्षा कमी EMI, फक्त फॉलो करा 'हा' फायनान्स प्लॅन
भारतीय ऑटो मार्केटमध्ये मध्यम वर्गीय कार खरेदी नेहमीच बजेट फ्रेंडली कारच्या शोधात असतात, जी त्यांना स्वस्त किमतीत चांगला परफॉर्मन्स देईल. जर तुम्ही सुद्धा Diwali 2025 मध्ये स्वस्तात मस्त कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर Maruti S Presso ही तुमच्यासाठी एक परफेक्ट कार ठरू शकते.
Maruti Suzuki भारतीय मार्केटमध्ये अनेक विभागांमध्ये वाहने विकते. कंपनीने हॅचबॅक विभागात मारुती एस-प्रेसो ऑफर केली आहे. जर तुम्ही या कारचा बेस व्हेरिएंट खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. फक्त 1 लाख रुपयांचे डाउन पेमेंट केल्यानंतर तुम्हाला दरमहा या कारसाठी किती ईएमआय भरावा लागेल? त्याबद्दल आपण जाणून घेऊयात.
मारुती एस-प्रेसोचा बेस व्हेरिएंट, STD , 3.50 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत देते. जर ही हॅचबॅक राजधानी दिल्लीमध्ये खरेदी केली असेल, तर तुम्हाला आरटीओसाठी अंदाजे 38 हजार रुपये तर विम्यासाठी 23 हजार आणि फास्टॅगसाठी 600 द्यावे लागतील. याचा अर्थ मारुती एस-प्रेसो एसटीडी ऑन-रोड किंमत अंदाजे 4.08 लाख रुपये होईल.
जर तुम्ही Maruti S-Presso चा बेस व्हेरिएंट खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर बँक साधारणपणे या कारच्या एक्स-शोरूम किंमतीवर कर्ज देईल. अशा परिस्थितीत तुम्ही ₹1 लाख रुपये डाउन पेमेंट केल्यानंतर, उर्वरित ₹3.08 लाख रुपये बँकेकडून कर्ज म्हणून घ्यावे लागेल.
जर बँक तुम्हाला 9% व्याजदराने 7 वर्षांसाठी 3.08 लाखांचे कर्ज देते, तर तुम्हाला दरमहा सुमारे 4,962 रुपयांइतका EMI भरावा लागेल. ही रक्कम तुम्हाला पुढील सात वर्षे नियमितपणे द्यावी लागेल.
जर तुम्ही हे कार लोन 9% व्याजदराने आणि 7 वर्षांच्या कालावधीसाठी घेतले, तर तुम्हाला सात वर्षांत दरमहा 4,962 रुपयांचा ईएमआय द्यावा लागेल. या कालावधीत तुम्ही सुमारे 1.08 लाख रुपये व्याज म्हणून भराल.
म्हणजेच, एक्स-शोरूम किंमत, ऑन-रोड खर्च आणि व्याज या सर्वांचा मिळून विचार केला तर Maruti S-Presso STD व्हेरिएंट तुमच्यासाठी साधारण 5.16 लाख रुपयांत पडेल.
Maruti S-Presso ही एक कॉम्पॅक्ट हॅचबॅक कार आहे. भारतीय बाजारात या कारची थेट स्पर्धा Maruti Alto K10, Renault Kwid, आणि Hyundai Grand i10 Nios यांसारख्या लोकप्रिय कार मॉडेल्ससोबत होते.