'या' तीन चाकांच्या Electric Scooter ची ग्राहकांमध्ये जोरदार चर्चा
भारतीय ऑटो बाजारात इलेक्ट्रिक कारसोबतच इलेक्ट्रिक दुचाक्यांना सुद्धा चांगली मागणी मिळताना दिसत आहे. अनेक दुचाकी उत्पादक कंपन्या उत्तम रेंज आणि फीचर्स असणाऱ्या इलेक्ट्रिक बाईक आणि स्कूटर ऑफर करत आहे, ज्या ग्राहकांच्या बजेटमध्ये सुद्धा येतात. नुकतेच कोमकी कंपनीने दोन नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केले आहेत.
इलेक्ट्रिक वाहनांच्या दुनियेत आणखी एक मोठं पाऊल टाकत Komaki ने आपले दोन नवे इलेक्ट्रिक फॅमिली स्कूटर्स FAM1.0 आणि FAM2.0 लाँच केले आहेत. हे स्कूटर्स खास फॅमिली रायडसाठी डिझाइन करण्यात आले असून, कंपनीचा दावा आहे की हे देशातील पहिले SUV स्कूटर आहेत. या स्कूटर्सचा वापर घरगुती आणि कमर्शियल दोन्ही कामांसाठी सहज करता येईल.
लागा तयारीला! भारतात Maruti Suzuki ची पहिली Electric Car ‘या’ महिन्यात होणार लाँच
Komaki च्या या नव्या स्कूटर्समध्ये एकदा फुल चार्ज केल्यानंतर लांब अंतर पार करण्याची क्षमता आहे.
दोन्ही स्कूटर्समध्ये Lipo4 बॅटरी वापरली गेली आहे, जी त्यांची सर्वात मोठी ताकद आहे. या बॅटरी 3000 ते 5000 चार्ज सायकलपर्यंत टिकतात, म्हणजेच दीर्घकाळ वापरात राहतात. स्कूटरमध्ये पर्याप्त लेग स्पेस, आरामदायक सीट, आणि मजबूत ग्रॅब रेल दिली आहे, ज्यामुळे संपूर्ण कुटुंबासाठी सुरक्षित आणि आरामदायी प्रवास शक्य होतो.
आता 5 सेफ्टी रेटिंग मिळवण्यासाठी ऑटो कंपन्यांना जास्त कसरत करावी लागणार, Euro NCAP ने बदलले नियम
Komaki FAM स्कूटर्समध्ये खालील आधुनिक फीचर्स दिले आहेत:
इलेक्ट्रिक असल्यामुळे या स्कूटर्सचा मेंटेनन्स खर्च खूपच कमी आहे आणि ते पर्यावरणपूरक देखील आहेत. कंपनीने या स्कूटर्सची किंमत मध्यमवर्गीय कुटुंबांच्या बजेटमध्ये ठेवली आहे, त्यामुळे हे वॅल्यू-फॉर-मनी पर्याय ठरतात.
आजच्या काळात, जेव्हा पेट्रोलचे दर वाढले आहेत आणि प्रदूषण गंभीर समस्या बनले आहे, अशा वेळी Komaki FAM1.0 आणि FAM2.0 हे स्कूटर्स एक स्मार्ट, सुरक्षित आणि टिकाऊ पर्याय ठरत आहेत. हे स्कूटर्स अशा कुटुंबांसाठी बेस्ट आहेत जे किफायतशीर, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक ट्रान्सपोर्ट शोधत आहेत.