फोटो सौजन्य: iStock
टेस्ला भारतीय मार्केटमध्ये एंट्री करणार, असे नेहमीच बोलले जात होते. शेवटी, टेस्ला या आघाडीच्या इलेक्ट्रिक कार उत्पादक कंपनीने 15 जुलै 2025 रोजी टेस्ला मॉडेल वाय ही इलेक्ट्रिक एसयूव्ही मुंबईत लाँच केली. यावेळी कंपनीच्या पहिल्या शोरुमचे उद्घाटन मुंबईतील BKC येथे झाले. यावेळी राज्याचे मुखयमंत्री देवेंद्र फडणवीस आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक उपस्थित होते. आता कंपनी भारतात त्यांचे चार्जिंग स्टेशन सुद्धा सुरु करणार आहे.
जगातील प्रसिद्ध इलेक्ट्रिक कार उत्पादक कंपनी टेस्लाने भारतात त्यांचे पहिले चार्जिंग स्टेशन सुरू करण्याची तारीख जाहीर केली आहे. हे सुपरचार्जिंग स्टेशन मुंबईतील One BKC येथे असेल आणि सोमवार, 4 ऑगस्ट 2025 पासून अधिकृतपणे सुरू केले जाईल.
महागड्या किमतीसाठी ओळखली जाणारी Harley-Davidson सर्वात स्वस्त बाईक लाँच करणार, किती असेल किंमत?
टेस्लाच्या या पहिल्या चार्जिंग स्टेशनवर, ग्राहकांना फास्ट चार्जिंग आणि नियमित चार्जिंग अशा दोन्ही सुविधा प्रदान केल्या जातील. स्टेशनवर एकूण चार V4 सुपरचार्जिंग स्टॉल बसवण्यात आले आहेत, जे 250 किलोवॅट पर्यंत हाय-स्पीड डीसी चार्जिंग प्रदान करण्यास सक्षम असतील. या सुपरचार्जिंग सुविधेसाठी ग्राहकांना प्रति युनिट 24 दराने पैसे द्यावे लागतील. याशिवाय, चार एसी डेस्टिनेशन चार्जिंग स्टॉल देखील तेथे असतील. हे स्टॉल 11 किलोवॅट पर्यंत चार्जिंग स्पीड देतील आणि त्यांचा चार्जिंग दर प्रति युनिट 14 निश्चित करण्यात आला आहे.
टेस्लाने माहिती दिली आहे की मुंबईतील हे स्टेशन भारतात बांधल्या जाणाऱ्या आठ सुपरचार्जिंग स्टेशनपैकी पहिले असेल. या स्टेशनमध्ये बसवलेले V4 सुपरचार्जर इतके वेगवान आहेत की टेस्ला मॉडेल Y फक्त 15 मिनिटांत सुमारे 267 किमीचा प्रवास करू शकते. हे अंतर इतके आहे की तुम्ही मुंबई विमानतळ ते गेटवे ऑफ इंडिया पर्यंत पाच वेळा प्रवास करू शकता. टेस्लाच्या सुपरचार्जरमध्ये 99.95% अपटाइम आहे, म्हणजेच ते जवळजवळ सर्व वेळ काम करण्यास तयार असतात. याशिवाय, टेस्लाच्या कार चार्जिंग करण्यापूर्वी त्यांच्या बॅटरी स्मार्टपणे प्री-कंडिशन करतात, ज्यामुळे चार्जिंगचा वेग आणखी चांगला होतो.
Tesla चं नशीबच खराब ! ‘या’ फीचरमुळे लागला मोठा फटका, कोर्टाने ठोकला 370 कोटींचा दंड
चार्जिंग स्टेशनच्या लाँचिंगसह, टेस्लाने भारतातही त्यांचा डिझाईन स्टुडिओ सुरू केला आहे. या सुविधेद्वारे, ग्राहक आता देशाच्या कोणत्याही भागातून त्यांची कार ऑनलाइन कस्टमाइझ आणि बुक करू शकतात. सध्या, टेस्लाने त्यांची लोकप्रिय SUV मॉडेल Y बुकिंग सुरू केली आहे. त्याची डिलिव्हरी प्रथम मुंबई, पुणे, दिल्ली आणि गुरुग्राम सारख्या प्रमुख शहरांमध्ये केली जाईल. या शहरांमध्ये डिलिव्हरी 2025 च्या तिसऱ्या तिमाहीपासून, म्हणजे जुलै ते सप्टेंबर दरम्यान सुरू होईल. ग्राहकांना टेस्ला मोबाईल ॲपद्वारे फक्त त्यांच्या कारची बुकिंग आणि डिलिव्हरीची सद्यस्थिती तपासता येणार नाही तर चार्जिंग स्टेशनचे स्थान, चार्जिंगची प्रगती आणि पेमेंट डिटेल्सची माहिती सुद्धा एकाच ठिकाणी ट्रॅक करता येईल.