Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

टेस्लाची उडणारी कार पाहून जग थक्क! इलॉन मस्कच्या ‘रोडस्टर’ फ्लाइंग कारचा जलवा! १ सेकंदात गाठणार १०० किलोमीटर

टेस्लाच्या रोडस्टर 2 ने टेक्सासमध्ये हवेत झेप घेतल्याचा दावा करत ऑटोमोबाईल जगात खळबळ उडवली आहे. स्पेसएक्सच्या थ्रस्टर्समुळे कार उडू शकते, असा कंपनीचा दावा आहे. पण ही कार प्रत्यक्षात रस्त्यावर कधी धावणार आणि हवेत किती वेळ राहणार? जाणून घ्या तिची खास टेक्नोलॉजी, 3 व्हेरिएंट आणि 2028 चा प्रोडक्शन प्लॅन.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Oct 16, 2026 | 02:18 PM
टेस्लाची उडणारी कार पाहून जग थक्क! इलॉन मस्कच्या ‘रोडस्टर’ फ्लाइंग कारचा जलवा! १ सेकंदात गाठणार १०० किलोमीटर
Follow Us
Follow Us:
  • टेस्लाच्या रोडस्टर 2 ने टेक्सासमध्ये प्रात्यक्षिकादरम्यान हवेत झेप घेत सुरक्षित लँडिंग केल्याचे दाखवण्यात आले.
  • स्पेसएक्सच्या 10 थ्रस्टर्स आणि 600 लिटर कॉम्प्रेस्ड एअरच्या मदतीने कार उडत असल्याचा दावा करण्यात आला.
  • रोडस्टर 2 चे प्रोडक्शन 2028 मध्ये सुरू होण्याची शक्यता असून 3 व्हेरिएंट प्रस्तावित आहेत.
इलेक्ट्रिक कारच्या दुनियेत मोठी क्रांती घडवण्याच्या तयारीत असलेल्या एलॉन मस्क यांच्या टेस्लाने आपल्या बहुप्रतीक्षित रोडस्टर 2 चे खास प्रात्यक्षिक सादर केले आहे. या प्रात्यक्षिकात कारने हवेत झेप घेत काही सेकंद घिरट्या घातल्या आणि सुरक्षितपणे जमिनीवर लँडिंग केले. त्यामुळे आतापर्यंत केवळ सायन्स फिक्शन चित्रपटांमध्ये दिसणाऱ्या उडणाऱ्या कारची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.

15 ऑक्टोबर 2026 रोजी अमेरिकेतील टेक्सास राज्यातील स्पेसएक्सच्या रॉकेट डेव्हलपमेंट आणि टेस्टिंग सेंटरमध्ये हे प्रात्यक्षिक पार पडले. यावेळी रोडस्टर 2 ने मोठ्या वक्राकार रॅम्पवर उलट्या दिशेने प्रवास केला, हवेत पलटी घेतली आणि काही क्षण हवेत राहिल्यानंतर सुरक्षितपणे खाली उतरली. टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांनी या कामगिरीनंतर समाधान व्यक्त केले. कंपनीच्या व्हेईकल इंजिनिअरिंग विभागाचे प्रमुख लार्स मोरावी यांनीही या टेक्नोलॉजीला उडणाऱ्या कारच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल म्हटले.

स्पेसएक्सच्या थ्रस्टर्समुळे कार उडणार?

रोडस्टर 2 च्या उड्डाणामागे स्पेसएक्सचे थ्रस्टर टेक्नोलॉजी असल्याचे सांगण्यात आले आहे. टेकक्रंचच्या न्यूजनुसार, कारमध्ये 10 थ्रस्टर्स आणि 600 लिटर कॉम्प्रेस्ड एअरची सिस्टम वापरली जाते. या यंत्रणेच्या मदतीने कारला हवेत उचलणे आणि फिरवणे शक्य होते. टेस्लाच्या म्हणण्यानुसार, कारमध्ये जास्त कॉम्प्रेस्ड गॅस असल्यास हवेत राहण्याचा कालावधी वाढू शकतो.

टेस्लाने या कारसाठी 0 ते 60 mph वेग केवळ 1 सेकंदात गाठण्याचा दावाही केला आहे. प्रात्यक्षिकात कारने कंपनीच्या इतर वाहनांच्या वरून झेप घेत सायबरट्रकच्या वर हवेत तरंगल्याचेही दाखवण्यात आले. पण या कामगिरीचे प्रत्यक्ष रस्त्यावरील वापरात रूपांतर करण्यासाठी आणखी चाचण्या आणि तांत्रिक पडताळणी महत्त्वाची असेल.

कारचा ‘ऑटोपायलट मोड’ कसा काम करतो? गाडीच्या ‘सेल्फ ड्रायव्हींग’ सिस्टीम मधील या काही गोष्टी तुम्हाला माहित असायला हव्यात!

2028 मध्ये प्रोडक्शन; किंमत किती?

टेस्लाने रोडस्टर 2 ची घोषणा 2017 मध्ये केली होती. सुरुवातीला 2020 पर्यंत डिलिव्हरी सुरू करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. पण प्रोजेक्टला विलंब झाला. आता एलॉन मस्क यांनी 2028 मध्ये प्रोडक्शन सुरू होण्याची माहिती दिली आहे. त्यामुळे प्रात्यक्षिक झाले असले तरी ही कार लगेच कस्टमर्ससाठी अव्हेलेबल होणार नाही.

कंपनीने या कारसाठी Performance, Thrust आणि Rocket असे 3 व्हेरिएंट जाहीर केले आहेत. Performance व्हेरिएंट रस्त्यावर चालवण्यासाठी, तर Thrust व्हेरिएंट रेसिंगसाठी सज्ज असल्याचे वर्णन करण्यात आले आहे. सर्वात महागड्या Rocket व्हेरिएंटला हवेत उड्डाण करण्याच्या क्षमतेशी जोडण्यात आले असून, त्यासाठी निवडक ग्राहकांनाच निमंत्रण दिले जाणार आहे.

Performance व्हेरिएंटचे बुकिंग करण्यासाठी $50,000, तर Thrust व्हेरिएंटसाठी $250,000 आरक्षण रक्कम ठेवण्यात आली आहे. Rocket व्हेरिएंटसाठी सर्वसामान्य बुकिंगची सुविधा नाही. कारची अंतिम किंमत आणि प्रत्यक्ष व्यावसायिक वापरातील उड्डाणाची क्षमता याबाबत अजूनही अनेक प्रश्न आहेत. त्यामुळे रोडस्टर 2 प्रत्यक्षात ग्राहकांपर्यंत पोहोचल्यावरच टेस्लाच्या या महत्त्वाकांक्षी प्रोजेक्टचे खरे यश स्पष्ट होईल.

उत्तराखंडच्या पठ्ठ्याने बनवली इलेक्ट्रिक फ्लाईंग कार! पाहा या सिंगल सीटर हेलिकॉप्टर कम फ्लाईंग कारची झलक

Frequently Asked Questions

प्रश्न 1: टेस्ला रोडस्टर 2 हवेत कशी उडते?

उत्तर: वृत्तानुसार, या कारमध्ये स्पेसएक्सशी संबंधित 10 थ्रस्टर्स आणि 600 लिटर कॉम्प्रेस्ड एअरचा वापर करण्यात आला आहे. या यंत्रणेमुळे कार हवेत उचलणे आणि फिरवणे शक्य होते, असा दावा आहे.

प्रश्न 2: टेस्ला रोडस्टर 2 चे प्रोडक्शन कधी सुरू होणार?

उत्तर: एलॉन मस्क यांच्या घोषणेनुसार, रोडस्टर 2 चे प्रोडक्शन 2028 मध्ये सुरू होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे कारची प्रत्यक्ष विक्री आणि डिलिव्हरीसाठी अजून प्रतीक्षा करावी लागेल.

प्रश्न 3: टेस्ला रोडस्टर 2 च्या बुकिंगसाठी किती पैसे द्यावे लागतील?

उत्तर: दिलेल्या वृत्तानुसार, Performance व्हेरिएंटसाठी $50,000 आणि Thrust व्हेरिएंटसाठी $250,000 आरक्षण रक्कम आहे. Rocket व्हेरिएंटसाठी केवळ निमंत्रणाद्वारे प्रवेश दिला जाणार आहे. या रकमा आरक्षणासाठी आहेत; त्या कारच्या अंतिम किंमती असल्याचे समजू नये.

Web Title: Tesla roadster 2 flying car 2028 production auto news marathi ar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 16, 2026 | 02:18 PM

Topics:  

  • automobile
  • Tesla

संबंधित बातम्या

अँपिअरच्या ‘Built for Bharat’ची चर्चा! या आहेत अँपिअरच्या 3 इलेक्ट्रिक स्कूटर्स, कोणती ठरेल तुमच्यासाठी योग्य?
1

अँपिअरच्या ‘Built for Bharat’ची चर्चा! या आहेत अँपिअरच्या 3 इलेक्ट्रिक स्कूटर्स, कोणती ठरेल तुमच्यासाठी योग्य?

दक्षिण कोरियाला मागे टाकत भारत बनला ह्युंदाईचा जगातील दुसरा सर्वात मोठा मार्केट
2

दक्षिण कोरियाला मागे टाकत भारत बनला ह्युंदाईचा जगातील दुसरा सर्वात मोठा मार्केट

कारच्या धुरावरच नाही, ब्रेक-टायरच्या प्रदूषणावरही कडक नियम! BS-7 नियमांमुळे कार कंपन्यांची चिंता वाढणार?
3

कारच्या धुरावरच नाही, ब्रेक-टायरच्या प्रदूषणावरही कडक नियम! BS-7 नियमांमुळे कार कंपन्यांची चिंता वाढणार?

2029 पर्यंत जीप आणि सिट्रोएनचे 12 नवीन मॉडेल्स येणार भारतात! स्टेलांटिसची भारतात 4,000 कोटींची गुंतवणूक!
4

2029 पर्यंत जीप आणि सिट्रोएनचे 12 नवीन मॉडेल्स येणार भारतात! स्टेलांटिसची भारतात 4,000 कोटींची गुंतवणूक!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.