फोटो सौजन्य: Pinterest
Ampere Nexus ही भारतातील अशी पहिली इलेक्ट्रिक दुचाकी आहे, जिने दक्षिण भारतातील अवघड मानल्या जाणाऱ्या Kolli Hills येथील 70 हेअरपिन वळणांचा प्रवास पूर्ण करून Asia Book of Records मध्ये नोंद मिळवली आहे. त्यामुळे डोंगराळ आणि आव्हानात्मक रस्त्यांसाठी ही स्कूटर सक्षम मानली जाते.
Renault India साठी फेब्रुवारी 2026 ठरला एकदम खास! विक्रीत थेट 31 टक्क्यांची वाढ; ‘ही’ Car ठरली लकी
नेपाळमधील उंचसखल रस्ते, तापमानातील बदल आणि वाहतुकीची परिस्थिती लक्षात घेऊन Ampere Nexus स्कूटर तयार करण्यात आली आहे. ही स्कूटर उतार-चढाव, खडबडीत रस्ते, उंचावरील हवामानातील बदल आणि शहरी वाहतुकीत सहज चालवता येईल, अशा प्रकारे डिझाइन करण्यात आली आहे.
यामध्ये LFP बॅटरी, मजबूत टॉर्क डिलिव्हरी आणि स्थिर राइड सेटअप देण्यात आले आहे. त्यामुळे चढावर सहज गाडी चढवणे, ट्रॅफिकमध्ये स्मूथ अॅक्सिलरेशन आणि विविध प्रकारच्या रस्त्यांवर चांगले नियंत्रण मिळते.
कंपनीच्या मते, या स्कूटरने 13,200 फूट उंचीवरील Shipki La Pass जिंकण्यासोबतच 3,900 फूट उंचीवरील Kolli Hills मार्गावरील 70 हेअरपिन वळणे पार केली आहेत. त्यामुळे कठीण भौगोलिक परिस्थितीतही तिची क्षमता सिद्ध झाली आहे.
Ampere Nexus स्कूटरमध्ये 7 इंच TFT टचस्क्रीन डिस्प्ले देण्यात आला आहे. यात Nex.io तंत्रज्ञानासह फुल-स्क्रीन मॅप मिररिंग, टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन, पुढील वळणाचे अंतर आणि ETA यांसारख्या सुविधा मिळतात.
याशिवाय स्कूटरमध्ये कॉल कनेक्टिव्हिटी, रिअल-टाइम व्हेईकल मॉनिटरिंग आणि म्युझिक कंट्रोल यांसारखी कनेक्टेड फीचर्स देण्यात आली आहेत. तसेच Ampere Connect Companion अॅपच्या मदतीने स्मार्ट पेअरिंग, वाहन ट्रॅकिंग, बॅटरी हेल्थ तपासणी यांसारख्या सुविधा उपलब्ध आहेत.
या विस्ताराबाबत बोलताना कंपनीचे एमडी आणि सीएफओ Vikas Singh यांनी सांगितले की, नेपाळमध्ये डोंगराळ भूप्रदेश, जास्त वापर आणि वाढणारी ईव्ही पायाभूत सुविधा यामुळे मजबूत आणि टिकाऊ इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढत आहे. Ampere Nexus ही स्कूटर त्या गरजा लक्षात घेऊन तयार करण्यात आली असून, ती नेपाळमधील स्वच्छ आणि शाश्वत मोबिलिटीला चालना देईल.
दरम्यान, कंपनी येत्या काळात नेपाळमधील इतर शहरांमध्येही आपला विस्तार करण्याची योजना आखत असून, इलेक्ट्रिक मोबिलिटीच्या वाढीसाठी दीर्घकालीन योगदान देण्याचा कंपनीचा मानस आहे.






